Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! अनैतिक संबंधातून प्रियकराने केली महिलेची हत्या; शॉकचा रचला बनाव अन् नंतर…

पोलिसांनी हत्येच्या दिशेने तपास सुरू केला. घटनेच्या वेळी कविताचा पती गणेश हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत असल्याने भंडारा येथील मूळ गावी होता. त्याच्या चौकशीत काहीही संशयास्पद आढळले नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 14, 2026 | 12:10 PM
धक्कादायक ! अनैतिक संबंधातून प्रियकराने केली महिलेची हत्या; शॉकचा रचला बनाव अन् नंतर...

धक्कादायक ! अनैतिक संबंधातून प्रियकराने केली महिलेची हत्या; शॉकचा रचला बनाव अन् नंतर...

Follow Us
Follow Us:
  • महिलेचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाल्याचा संशय
  • पळून गेलेल्या प्रियकराला जळगावातून अटक
  • इलेक्ट्रिशियन असल्याचा घेतला फायदा
नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वानाडोंगरी येथील मातोश्री ले-आऊटमध्ये महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी काही तासांत पर्दाफाश केला आहे. सुरुवातीला महिलेचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाल्याचा संशय होता. परंतु, प्राथमिक शवविच्छेदन अहवालात तिची हत्या झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी वेगाने तपास करत पळून गेलेल्या प्रियकराला जळगावातून अटक केली आहे. अनैतिक संबंधांमधून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव जावेद शेख शाहिद मन्यार (वय ३३, रा. शिव कॉलनी, जळगाव) असे आहे.

मातोश्रीनगर येथील रहिवासी कविता गणेश पिंपळशेंडे (वय ३८) या सोमवारी सकाळी ८ वाजता घरात मृतावस्थेत आढळल्या. स्वयंपाकघरात हीटरवर पाणी गरम केले जात होते. कविता यांच्या शरीरावर विजेचा धक्का लागल्याच्या आणि भाजल्याच्या खुणा होत्या. त्यामुळे विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करत सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली. परंतु, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी कविताचा मृत्यू डोक्यावर झालेल्या जोरदार आघातामुळे झाल्याचे निश्चित केल्यानंतर प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले. मृताच्या अंगावर विजेचा शॉक लागल्याचे भासवण्यासाठी आरोपीने हीटरचा वापर करून बनाव रचला होता.

इलेक्ट्रिशियन असल्याचा घेतला फायदा

आरोपी जावेद व्यवसायाने इलेक्ट्रशियन आहे. कविताचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे भासवण्यासाठी त्याने हीटरने शरीराला विजेचे झटके दिले आणि नंतर हीटरवर पाणी गरम ठेवल्याचे नाटक केले. सोमवारी सकाळी पती गणेशने फोन न उचलल्यामुळे नातेवाईकांना मुलांना घरी पाठवण्यास सांगितले, तेव्हा हा प्रकार उजेडात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कोठेवाड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मंगळवारी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 17 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

कॉल जावेदला केल्याचे निष्पन्न

पोलिसांनी हत्येच्या दिशेने तपास सुरू केला. घटनेच्या वेळी कविताचा पती गणेश हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत असल्याने भंडारा येथील मूळ गावी होता. त्याच्या चौकशीत काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यानंतर पोलिसांनी कविताच्या मोबाईलचा सीडीआर तपासला असता बहुतेक कॉल जावेदला केल्याचे निष्पन्न झाले. घटनेच्या वेळी त्याचे मोबाईल लोकेशन वानाडोंगरी येथेच होते तर सोमवारी सायंकाळी त्याचे लोकेशन जळगाव येथे आढळले. पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) एस. ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाबुराव राऊत यांच्या पथकाने जळगावला पोहोचून जावेदला घरातून जेरबंद केले.

💡 Frequently Asked Questions

अनैतिक संबंधातून महिलेची हत्या कुठे झाली?

– ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वानाडोंगरी येथे घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हत्या का केली? कारण काय?

– प्राथमिक तपासानुसार अनैतिक संबंधातून वाद झाला. संबंध उघडकीस येण्याच्या भीतीने हत्या केल्याचा संशय आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

आरोपी कोण आहे?

– मृत महिलेचा प्रियकर असलेल्या जावेद शेख शाहिद मन्यार याने ही हत्या केल्याचा आरोप आहे. तो शिव कॉलनी, जळगाव येथील रहिवासी आहे.

वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश

Web Title: Lover murders woman following illicit affair nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • crime news
  • Nagpur News
  • Woman Murder

संबंधित बातम्या

वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश
1

वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश

Maharashtra Live Breaking News in Marathi: आशुतोष रांका, सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: आशुतोष रांका, सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी

राज्य सरकारी विभागांत मोठा घोटाळा; तब्बल 700 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी चौघांना अटक, CBI ची कारवाई
3

राज्य सरकारी विभागांत मोठा घोटाळा; तब्बल 700 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी चौघांना अटक, CBI ची कारवाई

पिंपळवंडीत पुलावर तरुणाला मारहाण, जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू; नेमकं काय घडलं?
4

पिंपळवंडीत पुलावर तरुणाला मारहाण, जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.