Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपळवंडीत पुलावर तरुणाला मारहाण, जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू; नेमकं काय घडलं?

पुणे-नाशिक महामार्गावरील पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील कुकडी नदीच्या पुलावर अडवून मारहाण केल्यानंतर घाबरून पळताना पुलावरून खाली पडल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 14, 2026 | 12:30 AM
पिंपळवंडीत पुलावर तरुणाला मारहाण, जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू; नेमकं काय घडलं?

पिंपळवंडीत पुलावर तरुणाला मारहाण, जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • पिंपळवंडीत पुलावर तरुणाला मारहाण
  • जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू
  • नेमकं काय घडलं?
आळेफाटा : पुणे-नाशिक महामार्गावरील पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील कुकडी नदीच्या पुलावर अडवून मारहाण केल्यानंतर घाबरून पळताना पुलावरून खाली पडल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी (दि. ९) मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुर्गाकुमार दिनेशप्रसाद गुप्ता (वय २४, मूळ रा. बिहार, सध्या रा. कांदळी, ता. जुन्नर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

 

आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गाकुमार हा मैत्रिणीला भेटून कांदळी येथील खोलीकडे पायी जात होता. पिंपळवंडी येथील एचपी पेट्रोल पंपासमोरील कुकडी नदीच्या पुलावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याला अडवून विचारपूस केली. यावेळी झालेल्या वादातून त्याच्या कानशिलात मारण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मारहाणीनंतर घाबरलेला दुर्गाकुमार रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी पळत असताना पुलावरून खाली पडला. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला.

हे सुद्धा वाचा : अजितदादांच्या ‘ग्राउंडवर्क’चा राष्ट्रवादीला मोठा फायदा! सोमेश्वरच्या निवडणुकीत विरोधकांना रोखण्यात सुनेत्रा पवारांना यश

या प्रकरणी सोहम दत्तात्रेय कुऱ्हाडे (वय २१, रा. लवणवाडी, आळे) आणि एका १६ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. किरकोळ वादातून घडलेल्या या घटनेत तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषिकेश तिटमे करीत आहेत.

१८ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार

पार्टी देण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितल्याचा राग मनात धरून मित्रानेच १८ वर्षीय तरुणाच्या छातीत चाकू खुपसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर उपचारासाठी घाटीत नेण्याचा बहाणा करून त्याला हमालवाड्यातील मोकळ्या मैदानात नेले. तेथे त्याच्या डोळ्यात चाकू खुपसत पाठ व शरीरावर वार करुन गंभीर जखमी केले आहे. रक्तबंबाळ अवस्थेत तरुणाने दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेवून घाटी रुग्णालय गाठले. ही घटना १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अल्पवयीन यश हिवराळे आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध हर्सल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात सय्यद इम्रान सय्यद गफूर (३७, रा. जहांगीर कॉलनी, हसुल) यांनी फिर्याद दिली आहे.

Web Title: A shocking incident of a young man being assaulted on a bridge has occurred in pimpalvandi nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Death

संबंधित बातम्या

Nashik Crime : नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन संशयित ताब्यात
1

Nashik Crime : नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन संशयित ताब्यात

Jalgaon News: घरफोड्यांचा खेळ अखेर संपला! मध्य प्रदेशातील संशयितांना अमळनेर पोलिसांनी पकडलं
2

Jalgaon News: घरफोड्यांचा खेळ अखेर संपला! मध्य प्रदेशातील संशयितांना अमळनेर पोलिसांनी पकडलं

IIT भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी हायटेक जुगाड; गोवा विमानतळावर दोन ‘मुन्नाभाई’ अटकेत
3

IIT भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी हायटेक जुगाड; गोवा विमानतळावर दोन ‘मुन्नाभाई’ अटकेत

पुण्यात घरफोडी करणाऱ्या जोडप्यासह तिघांना अटक; सीसीटीव्हीच्या मदतीने लावला गुन्ह्याचा छडा
4

पुण्यात घरफोडी करणाऱ्या जोडप्यासह तिघांना अटक; सीसीटीव्हीच्या मदतीने लावला गुन्ह्याचा छडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.