Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पत्नीने पतीसोबत सर्वत्र जाणे गरजेचे नाही’; १६ वर्षे वेगळ्या राहणाऱ्या दाम्पत्यावर उच्च न्यायालयाचा निर्णय

High Court : पती-पत्नीच्या नात्यातील एका प्रकरणावर मद्रास उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. १६ वर्षांपासून वेगळे राहणाऱ्या दाम्पत्याच्या प्रकरणात न्यायालयाने वैवाहिक नात्यातील दुराव्यावर भाष्य केले.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 04, 2026 | 03:30 PM
‘पत्नीने पतीसोबत सर्वत्र जाणे गरजेचे नाही’; १६ वर्षे वेगळ्या राहणाऱ्या दाम्पत्यावर उच्च न्यायालयाचा निर्णय

‘पत्नीने पतीसोबत सर्वत्र जाणे गरजेचे नाही’; १६ वर्षे वेगळ्या राहणाऱ्या दाम्पत्यावर उच्च न्यायालयाचा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • पतीच्या नोकरीमुळे पत्नीने प्रत्येक ठिकाणी त्याच्यासोबत जाणे आवश्यक नसल्याचे न्यायालयाने म्हटले.
  • दाम्पत्यामध्ये दीर्घकाळापासून कटुता आणि मोठी दरी निर्माण झाल्याचे समोर आले.
  • पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नसल्यास दीर्घकाळ वेगळे राहण्याचा मुद्दा वैवाहिक क्रौर्याच्या कक्षेत येऊ शकतो, असे निरीक्षण नोंदवण्यात आले.
पत्नीने पतीच्या मागे व्होडाफोनच्या जाहिरातीतील पग कुत्र्यासारखे सतत फिरत राहावे, अशी अपेक्षा करता येणार नाही. नोकरी किंवा अन्य कारणांमुळे पती ज्या ठिकाणी जाईल, त्या प्रत्येक वेळी पत्नीने त्याच्यासोबत जाणे आवश्यक नसल्याचे मत मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी मांडले, हे प्रकरण सुमारे १६ वर्षांपासून वेगळे राहत असलेल्या दाम्पत्याशी संबंधित आहे. पतीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती जी. आर. स्वामीनाथन आणि न्यायमूर्ती एम. डी. सुमती यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दोघांचे लग्न सप्टेंबर १९९२ मध्ये झाले होते. त्यांना ४ मुले आहेत. सध्या पतीचे वय ६७वर्षे आहे. न्यायालयाने म्हटले की, पती-पत्नीमध्ये मोठी कटुता निर्माण झाली असून पुन्हा एकत्र येण्याची कोणतीही शक्यता उरलेली नाही.

Navi Mumbai Crime News: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पोलिसांचा थरारक पाठलाग; दुचाकीस्वाराला पकडताच उघडकीस आला चोरीचा खेळ

पतीने पत्नीला मुंबईला नेले नाही, ही त्याचीच चूक

पतीने याचिकेत म्हटले होते की, नोकरीसाठी तो तमिळनाडूतील शिवगंगाहून मुंबईला गेला; मात्र पत्नी त्याच्यासोबत आली नाही. २०१४ मध्ये त्याने शिवगंगा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. त्याने पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोपही केला. सप्टेंबर २०२१ मध्ये कौटुंबिक न्यायालयाने पतीची घटस्फोटाची याचिका फेटाळली. पती स्वतः नोकरीसाठी मुंबईला गेला आणि त्याने पत्नीला सोबत नेले नाही. त्यामुळे स्वतःच्या चुकीचा फायदा घेत पती घटस्फोट मागू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.

Crime News: तीन महिने माहेरी होती अश्विनी; तरीही फोनवरून होत होता कथित मानसिक छळ? वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं

नात्यात मोठी दरी निर्माण झाली आहे

  • पती-पत्नी सुमारे १६ वर्षांपासून वेगळे राहत होते. पत्नीने पतीकड़े परत जाण्यासाठी कोणतेही औपचारिक प्रयत्न केल्याचेही समोर आले नाही.
  • दोघांमध्ये समझोता होण्याची शक्यता तपासण्यासाठी उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूशी चर्चा केली; मात्र त्यातून तोडगा निधाला नाही. त्यांच्या वैवाहिक नात्यात मोठी दरी निर्माण झाली आहे आणि पुन्हा एकत्र येण्याची शक्यता उरलेली नाही.
  • खंडपीठाने म्हटले की, दीर्घकाळ वेगळे राहणे, वैवाहिक जीवन संपुष्टात येणे आणि नाते पूर्णपणे तुटणे, परिस्थितीनुसार मानसिक क्रौर्याच्या कक्षेत येऊ शकते.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Madras high court wife not required to follow husband everywhere marriage case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • High court
  • Husband and wife
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Nagpur News: वर्षभरात केवळ ३,५५३ मराठा बंधूंचे कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज
1

Nagpur News: वर्षभरात केवळ ३,५५३ मराठा बंधूंचे कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज

Latur News: रानभाज्यांच्या विक्रीसाठी महिलांची गर्दी! लातूर जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार!
2

Latur News: रानभाज्यांच्या विक्रीसाठी महिलांची गर्दी! लातूर जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार!

Chandrapur News: गावातच रोजगार, स्थलांतराला आळा! सामूहिक वनहक्कासाठी ब्रह्मपुरीतील २६ ग्रामसभांची एकजूट
3

Chandrapur News: गावातच रोजगार, स्थलांतराला आळा! सामूहिक वनहक्कासाठी ब्रह्मपुरीतील २६ ग्रामसभांची एकजूट

Raigad News: महाडमध्ये दहीहंडीचा थरार! १ लाख ५१ हजारांच्या बक्षिसासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगणार जोरदार चुरस
4

Raigad News: महाडमध्ये दहीहंडीचा थरार! १ लाख ५१ हजारांच्या बक्षिसासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगणार जोरदार चुरस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.