Crime News Live Updates
12 Sep 2025 03:12 PM (IST)
आशिया कप २०२५ स्पर्धेतील तिसरा सामना काल बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात कर्णधार लिटन दास (३९ चेंडूत ५९ धावा) च्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशने हाँगकाँगचा ७ विकेट्सने पराभव केला. या विजयासह बांगलादेशने पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय विजय मिळवला आहे. हा सामना गुरुवारी शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला तर हाँगकाँग संघाने प्रथम फलदाजी केली. हाँगकाँग संघाने ७ विकेट्स गमावून बांगलादेशसमोर १४३ धावा उभ्या केल्या. हाँगकाँगकडून निजाकत खानने सर्वाधिक ४२ धावांचे योगदान दिले. बांगलादेशकडून तन्झिम हसन साकिबने शानदार गोलंदाजी करत २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात कर्णधार लिटन दासच्या ३९ चेंडूत ५९ धावांच्या जोरावर बांगलादेशने हाँगकाँगचा ७ विकेट्सने विजय मिळवला.
12 Sep 2025 03:11 PM (IST)
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अर्ज अप्रेन्टिस पदांसाठी मागवण्यात आले आहे तसेच उमेदवारांना जुनिअर इंजिनिअर पदांसाठीदेखील अर्ज करता येणार आहे. ज्युनिअर इंजिनिअर पदांसाठी १२ सप्टेंबरपासून अर्ज करता येणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. अप्रेन्टिस पदांसाठीदेखील १२ सप्टेंबरपासून अर्ज करता येणार असून अर्ज ११ ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे असून अर्ज करण्यासाठी उमेदवारांना IOCL च्या iocl.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
12 Sep 2025 03:00 PM (IST)
धुळे: साक्री तालुक्यातील गणेशपूर निवासी आश्रम शाळेतून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. थंडी, ताप, खोकला, सर्दीच्या आजाराची अचानक लागण झाल्याचं समोर आलं आहे. ६१ विध्यार्थी, विद्यार्थिनींना साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर उपचारादरम्यान सोनाली सुनील पावरा या २१ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. ती (खरवड तालुका, धडगाव जिल्हा, नंदुरबार) येथील रहिवासी आहे.
12 Sep 2025 02:30 PM (IST)
पुण्यात गुन्हेगारी आणि महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. आता पुण्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका महिलेवर तिच्याच सासऱ्याकडून शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा समोर आलं आहे. धक्कदायक बाब म्हणजे आरोपी हा निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहे.
12 Sep 2025 02:15 PM (IST)
धुळे शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती सोनल शिंदे यांचा मुलगा विराज शिंदे याने आयुष्य संपवल्याचं समोर आलं आहे. त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्याचा वाढदिवस (9 सप्टेंबर) मंगळवारी साजरा करण्यात आला. त्याच्या दोन दिवसांनी त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली असून, शहरात एकच खळबळ उडाली आहे.
12 Sep 2025 01:55 PM (IST)
कणकवलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याचे समोर आले आहे. ८० वर्षीय प्रभावती सोराफ असे मृत्यू झालेल्या महिलेच नाव आहे. ही हादरवून टाकणारी घटना कणकवली तालुक्यातील वारगाव येथील सोरफ-सुतारवाडी येथे रात्रीच्या सुमारास राहत्या घरी घडली. पोलिसांनी मुलगा रवींद्र सोरफ याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येमुळे कणकवली मध्ये एकच खळबळ उडाली आहे.
12 Sep 2025 01:50 PM (IST)
पाणी भरण्यावरून दोन कैद्यांमध्ये वाद सुरू होता. नेमकं याचदरम्यान तिसऱ्याच एका कैद्याची ‘एंट्री’ झाली. सिनेस्टाईल त्याने दादागिरी दाखवत एकाची बाजू घेत दुसऱ्या कैद्याला बेदम मारहाण केली. तसेच त्याला ठार मारण्याची धमकी दिली. कर्तव्यावर असलेले कारागृह रक्षक धावले. मध्यस्थी करून वाद सोडवला. ही घटना नागपूर कारागृहातील बडी गोल बरॅक एकच्या मागच्या भागात घडली.
12 Sep 2025 01:40 PM (IST)
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ताहाराबाद – अंतापूर मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यात मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅन आणि टाटा कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, १० ते १२ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी (11 सप्टेंबर) रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
12 Sep 2025 01:05 PM (IST)
एक धक्कादायक प्रकार अकलूजमधून उघडकीस आला आहे. अकलुज पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गंभीर प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अकलुज येथील पीडित महिलेने आपल्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात शारीरिक व मानसिक छळ, धमक्या, बरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचे धक्कादायक आरोप केले आहेत. या घटनेमुळे अकलुज, सातारा व रायगड परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी आरोपींविरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
12 Sep 2025 12:40 PM (IST)
पुणे-सोलापूर महामार्गावर गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला लोणी काळभोर पोलिसांनी चारचाकी गाडीसह ताब्यात घेतले आहे. तर एकजण पोलिसांची चाहूल लागताच त्या ठिकाणावरून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. त्याला पकडण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली. मंगळवारी (ता.०९) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास आंद्रे वस्ती,सार्वजनीक रोडचे कडेला, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर,ता.हवेली) परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. गणेश रावसाहेब गोडसे,(वय २५,रा.आंद्रे वस्ती, लोणी काळभोर पुणे,मुळगाव सोनेवाडी, ता.सांगोला,जि.सोलापुर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. तर अक्षय रवि पवार (रा.लोणी काळभोर,ता.हवेली)असे फरार आरोपीचे नाव आहे. आरोपी गणेश गोडसे याच्या ताब्यातुन पोलिसांनी २२ हजार रुपये किमतीचा ११०४ ग्रॅम गांजा व गुन्ह्यात वापरलेली २ लाखांची चारचाकी गाडी असा एकूण २ लाख २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
12 Sep 2025 12:20 PM (IST)
माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकर या १९ वर्षांच्या तरुणाच्या झालेल्या खून प्रकरणात गुन्हे शाखा व समर्थ पोलिसांनी आंदेकर टोळीप्रमुख बंडू आंदेकर याच्यासह ४ जणांना सोमवारी रात्री बुलढाणा येथून जेरबंद केले. टोळी प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (६८, रा. नाना पेठ) हा देखील पोलिसांच्या हाती लागला आहे. आयुषच्या खुनाप्रकरणी पोलिसांनी १३ जणांवर गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत ८ जणांना अटक केली आहे. आंदेकर टोळीवर पुणे पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली असून, आंदेकरच्या ताबेमारी अथवा अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून महापालिकेला लवकरच पत्र पाठवले जाणार आहे.
12 Sep 2025 11:56 AM (IST)
मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसाखाली ओबीसी समाजाने बारामतीत मोर्चा काढला होता. विनापरवानगी मोर्चा काढल्यामुळे पोलिसांनी लक्ष्मण हाके यांच्यासह १५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश लागू केल्याने, या अध्यादेशामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप करत ओबीसींच्या वतीने प्रा. लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली बारामती शहरातून निषेध मोर्चा प्रांत कार्यालयावर काढण्यात आला होता. दरम्यान ईद-ए-मिलाद व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर लागणार असल्याने, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी या आंदोलनाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. या संदर्भात पोलीस प्रशासनाने आंदोलकांना पत्र देखील दिले होते. मात्र पोलीस प्रशासनाचा आदेश डावलून बारामती शहरात मोर्चा काढण्यात आला. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात प्रा. लक्ष्मण हाके यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड अमोल सातकर, भाजपचे ॲड जी. बी गावडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य सचिव काळुराम चौधरी, पांडुरंग मेरगळ, बापुराव सोलनकर, नवनाथ पडळकर, चंद्रकांत वाघमोडे, बापुराव सोलनकर, राष्ट्रवादीचे किशोर मासाळ, गोविंद देवकाते, ॲड मंगेश ससाणे, किशोर हिंगणे, विठ्ठल देवकाते, बापू कवले यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
12 Sep 2025 11:36 AM (IST)
सातारा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. माण तालुक्यातील राणंद गावच्या हद्दीतील हेळकर पठारावर सोमवारी (दि. ८) रात्री एका वृद्ध महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हिराबाई दाजी मोटे (वय अंदाजे ७५) यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. सोमवारी रात्री उशिरा घरी आल्यानंतर हिराबाई घरात न आढळल्याने संगिता खाशाबा कोळेकर यांनी त्यांच्या भावाला दत्तात्रय दाजी मोटे यांना साडेदहा वाजता ही माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता संगिता आणि त्यांचा मुलगा संतोष रानात गेले असता, त्यांना हिराबाई यांचा मृतदेह पडलेला दिसला. या घटनेनंतर राणंद गावात खळबळ उडाली. जमिनीच्या वादातून हा खून घडल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
12 Sep 2025 11:16 AM (IST)
हक्क सोड पत्राची दस्तावर नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपयाची लाच घेणाऱ्या बोरगाव (तालुका कोरेगाव) येथील तलाठी रणजीत अर्जुन घाटेराव (वय ३२, सध्या राहणार श्री अपार्टमेंट, अहिरे कॉलनी, लक्ष्मीनगर, सातारा) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
दारूच्या नशेमध्ये मुलानेच आपल्या आईचा खून केल्याची घटना कणकवली तालुक्यातील वारगाव, सोरफ-सुतारवाडी येथे रात्रीच्या सुमारास राहत्या घरी घडली. प्रभावती सोरफ (वय 80 वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलगा रवींद्र सोरफ याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येमुळे कणकवलीत एकच खळबळ उडाली आहे. तसेच वृद्ध महिलेल्या मृत्युविषयी सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.