फोटो सौजन्य - Social Media
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अर्ज अप्रेन्टिस पदांसाठी मागवण्यात आले आहे तसेच उमेदवारांना जुनिअर इंजिनिअर पदांसाठीदेखील अर्ज करता येणार आहे. ज्युनिअर इंजिनिअर पदांसाठी १२ सप्टेंबरपासून अर्ज करता येणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. अप्रेन्टिस पदांसाठीदेखील १२ सप्टेंबरपासून अर्ज करता येणार असून अर्ज ११ ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे असून अर्ज करण्यासाठी उमेदवारांना IOCL च्या iocl.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
उमेदवारांना अर्ज करताना काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. ज्युनिअर इंजिनिअर पदांसाठी ही रक्कम ₹400 रुपये निश्चित करण्यात आली आहे. SC / ST / PwBD या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची रक्कम भरावी लागणार नाही आहे. तर अप्रेन्टिस पदांसाठी अर्ज करताना एकही रुपया आकारला जाणार नाही. अगदी निशुल्क अर्ज भरता येणार आहे.
अर्ज करताना उमेदवारांना काही निकष पात्र करावे लागणार आहेत. हे निकष शैक्षणिक असून Junior Engineer (Chemical) पदांसाठी उमेदवार Diploma in Chemical/ Petrochemical/ Refinery & Petrochemical Engg. हवा. Junior Engineer (Mechanical) पदांसाठी उमेदवार Diploma in Mechanical Engg. हवा. तर अप्रेन्टिस पदांसाठी 10th Pass + ITI/ Degree/Trade/Technician उमेदवार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादे संदर्भात असणाऱ्या अटी शर्ती पाहिल्या की लक्षात येईल की 26 ते ३१ वर्षे आयु असणारे उमेदवार या ज्युनिअर इंजिनीअर पदांसाठी अर्ज करू शकतात. तर अप्रेन्टिस पदांसाठी १८ वर्षे ते २४ वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. ज्युनिअर इंजिनीअर पदांसाठी तीन टप्प्यांची निवड प्रकिया पात्र करावी लागेल: संगणकावर आधारित परीक्षा, संघ संवाद आणि वैयक्तिक मुलाखत. तर अप्रेन्टिस पदांसाठी अर्ज करतानादेखील उमेदवारांना तीन टप्प्यांना पात्र करावे लागेल: मेरिट लिस्ट, दस्तऐवजांची पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा.