Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News Updates : कोथरूड पोलिसांकडून तीन तरूणींना रिमांड रूममध्ये मारहाण

Crime News Live Updates Marathi : राज्यासह देश-विदेशातील गुन्हेगारी संदर्भातल्या ताज्या घडामोडींचे अपडेट वाचा फक्त एका क्लिकवर

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 04, 2025 | 06:24 PM
Crime News Live Updates

Crime News Live Updates

Follow Us
Close
Follow Us:

कोथरुड पोलिसांकडून तीन मुलींना मारहाण केल्याचा, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याच्या आरोपांनी पुण्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करत पिडीत मुलींनी पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. मात्र 12 तासांपासून अधिककाळ त्यांच्या मागणीची दाद घेतली जात नसल्याचे समोर आहे. याठिकाणी वंचितचे नेते सुजात आंबेडकर, आमदार रोहित पवार यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली, तसेच तक्रार घेण्यासाठी ठिय्या आंदोलनही केले.

The liveblog has ended.
  • 04 Aug 2025 06:10 PM (IST)

    04 Aug 2025 06:10 PM (IST)

    महिलेसोबत बोलण्याच्या कारणावरून तरुणावर चाकूने वार

    महिलेसोबत बोलल्याच्या कारणावरून वाद घालून एकाने तरुणावर चाकूने हल्ला केला. ही घटना शनिवारी (२ ऑगस्ट) रोजी दुपारी नखातेनगर, थेरगाव येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दिलीप हुलराम सुर्यवंशी (वय २४, थेरगांव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सेलवराज अंहंडी थेवर (वय ५१, थेरगांव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 04 Aug 2025 05:55 PM (IST)

    04 Aug 2025 05:55 PM (IST)

    कटरने वार करत दोघांवर जीवघेणा हल्ला

    लोखंडी कटरने वार करत एकाने दोघांना गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (३ ऑगस्ट) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास लांडेवाडी, भोसरी येथे घडली. या प्रकरणात ऋषिकेश शदर कुबल (३८, मांजरी, हडपसर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल बबन घोलप (५०, चऱ्होली आळंदी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 04 Aug 2025 05:40 PM (IST)

    04 Aug 2025 05:40 PM (IST)

    गोल्ड लोन घेण्याचा प्रयत्न उधळला

    खऱ्या सोन्याच्या नावाखाली खोट्या सोन्याच्या अंगठ्या गहाण ठेवून कर्ज उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा पर्दाफाश करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (२ ऑगस्ट) दुपारी चाकण येथील तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत घडली. याप्रकरणी रोहित मिलिंद थोरात (वय २७, रा. रासे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जब्बार करीम शेख (वय ४०, रा. थेरगाव) या आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

  • 04 Aug 2025 05:20 PM (IST)

    04 Aug 2025 05:20 PM (IST)

    वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोठा निर्णय

    पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहनांच्या संख्येमुळे आणि परिणामी निर्माण होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांच्या प्रवेशबंदीच्या वेळेत दोन तासांची वाढ केली आहे. यापूर्वी सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत लागू असलेली बंदी आता सकाळी आठ ते बारा आणि दुपारी चार ते रात्री नऊ या कालावधीत लागू करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश वाहतूक विभागाचे उपायुक्त विवेक पाटील यांनी दिले आहेत.

  • 04 Aug 2025 05:05 PM (IST)

    04 Aug 2025 05:05 PM (IST)

    बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्याला ठोकल्या बेड्या

     बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराइत गुन्हेगाराला मुंढवा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले आहे. राहुल संजय नेटके (वय २३, रा. म्हसोबा वस्ती, विजयनगर, मांजरी बुद्रुक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजू महानोर, उपनिरीक्षक युवराज पोमण, सहायक फौजदार राजू कदम, हवालदार विनोंद साळुंके, शिवाजी धांडे, अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर, रुपेश तोडकर यांनी केली.

  • 04 Aug 2025 04:50 PM (IST)

    04 Aug 2025 04:50 PM (IST)

    अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक गंभीर जखमी

    शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी परिसरातील शिवण्या हॉटेलसमोरून लहू वाघोले हा युवक त्याच्या ताब्यातील एम एच १२ वाय सि ७०५२ या दुचाकीहून कान्हूर मेसाईकडे चालेलला असताना समोरून विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या छोटा हत्ती टेम्पोची लहूच्या दुचाकीला धडक बसून अपघात होऊन लहू गंभीर जखमी होऊन त्याच्या पायाच्या मांडीला गंभीर दुखापत झाली असून याबाबत लहू संतोष वाघोले यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार बापू हाडगळे हे करत आहे.

  • 04 Aug 2025 04:35 PM (IST)

    04 Aug 2025 04:35 PM (IST)

    रांजणगावातील जुगार अड्ड्यावर पोलिसांकडून छापा

    रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील पाण्याच्या टाकी जवळ एक इसम नागरिकांकडून पैसे घेऊन चिमणी पाखरे नावाचा जुगाचा खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यांनतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस हवलदार संतोष औटी, उमेश कुतवळ यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्यांना एक इसम नागरिकांकडून पैसे घेऊन चिमणी पाखरे नावाचा जुगार खेळवत असल्याचे दिसले, दरम्यान पोलिसांनी त्याला जुगाराच्या साहित्य व काही रकमेसह ताब्यात घेतले.

  • 04 Aug 2025 04:25 PM (IST)

    04 Aug 2025 04:25 PM (IST)

    अमेरिकेत पुन्हा अपघात; उत्तर कॅरोलिनच्या समुद्रात कोसळले विमान

    अमेरिकेत (America) पुन्हा एक विमान अपघात घडला आहे. (US Plane Crash) यामुळे संपर्ण देशात भीतीचे वातावरण पसरले आहे. अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिनमध्ये ओक बेटाजवळ ही घटना घडली आहे. एक छोटे विमान अचानक समुद्रात कोसळले. यावेळ अनेक लोक बेटाच्या किनाऱ्यावर होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु या अपघातानंतर समुद्रकिनाऱ्यावर लोकांमध्ये घबराट पसरली होती.

  • 04 Aug 2025 04:20 PM (IST)

    04 Aug 2025 04:20 PM (IST)

    भोंग्याविरोधात किरीट सोमय्या यांनी घेतली पोलिस अधिकाऱ्यांची भेट

    मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी २०२५ मध्ये भोंग्याच्या संदंर्भाने आदेश दिले आहेत. ५० डेसिबलपेक्षा आवाज जास्त नसावा असे म्हंटले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील 'भोंगे चालणार नाही', असे म्हंटले आहे. मुंबई भोंगे मुक्त झाली, पण पुण्यात ते होत नाही. त्यासाठी मी पुण्यात आलो आहे. त्यासंदंर्भाने पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना कारवाई संदंर्भाने पत्र दिले, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. पुण्यातील फरासखाना व विश्रामबाग पोलिस ठाण्यात दुपारी किरीट सोमय्या यांनी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. तर, मशिदीवर लावलेले अनधिकृत भोंगे काढण्याबाबतच्या मागणीचे पत्र दिले. त्यांनी यासंदंर्भाने अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

  • 04 Aug 2025 03:58 PM (IST)

    04 Aug 2025 03:58 PM (IST)

    मृत्यूस कारणीभूत दुचाकी, चारचाकी चालकाविरोधात गुन्हा

    एका वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी सह चारचाकी चालका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दि. २८ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास करंजे नाका ते मोळाचा ओढा रस्त्यावर मधुकर कृष्णा गाडे (रा. कोंडवे, ता. सातारा) यांना एका अज्ञात मोपेड आणि एर्टिगा कारवरील (एमएच १२ व्हीएल ७८८९) चालकांनी भरधाव वेगात धडक दिल्याने गाडे यांचा मृत्यू झाला आहे. या अपघात प्रकरणी मोपेड आणि चारचाकी चालका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.

  • 04 Aug 2025 03:38 PM (IST)

    04 Aug 2025 03:38 PM (IST)

    दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

    रस्ता ओलांडणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाचा भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश हरिप (वय ७८, रा. ग्रीन एकर सोसायटी, बिबवेवाडी ) असे मृत्यू झालेल्या पादचारी ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत पोलिस हवालदार संजय आंग्रे यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

  • 04 Aug 2025 03:20 PM (IST)

    04 Aug 2025 03:20 PM (IST)

    दिवसाढवळ्या युवकाची हत्या

    बुलढाणा शहरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. प्रेम प्रकरणातून दिवसाढवळ्या चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.

  • 04 Aug 2025 03:00 PM (IST)

    04 Aug 2025 03:00 PM (IST)

    बायकोसमोरच भाऊजींनी मेहुणीवर केला बलात्कार

    मुंबई़त नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली. मोठ्या बहीणच्या नवऱ्यानेच मेहुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. मुंबईत एका ४० वर्षीय आरोपीने मेहुणीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. शनिवारी पोलिसांनी आरोपीच्या पत्नीलाही अटक केली. पत्नीवर पतीचा गुन्हा लपवण्याचा आणि घरी बहिणीची प्रसूती केल्याचा आरोप आहे. मुलीला रुग्णालयात दाखल करावे लागल्यावर हे प्रकरण उघडकीस आले.

  • 04 Aug 2025 02:40 PM (IST)

    04 Aug 2025 02:40 PM (IST)

    हडपसर पोलिसांची विनयभंगप्रकरणी मोठी कारवाई

    नोकरदार तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करत अवघ्या २४ तासात आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांच्या या तत्परतेने तरुणीने तसेच नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सुमीत पांडुरंग चाबुकस्वार (वय ३६, रा. मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत २९ वर्षीय पिडीत तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक निलेश जगदाळे, अश्विनी जगताप, सहायक निरीक्षक हसीना शिकलगार, विनोद शिर्के यांनी ही कामगिरी केली आहे.

  • 04 Aug 2025 02:35 PM (IST)

    04 Aug 2025 02:35 PM (IST)

    कबुतरखाना धान्य टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा

    मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने शहरातील कबुतरखान्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. दादर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असणारा कबुतरखाना पालिकेकडून जमीनदोस्त करण्यात येणार होता. त्यासाठी शुक्रवारी रात्री मुंबई महानगरपालिकेचे एक पथक त्याठिकाणी तोडकामासाठी गेले होते. मात्र, काही लोकांनी याठिकाणी एकत्र जमत पालिकेच्या कारवाईला विरोध केला होता. या जमावाने हा रस्ता अडवून धरला होता. त्यामुळे पालिकेच्या पथकाला कबुतरखाना तोडता आला नव्हता. या सगळ्या प्रकारानंतर आता मुंबई महानगरपालिका अधिक आक्रमक झाली असून कारवाईला सुरुवात झाली आहे. शनिवारी संध्याकाळपासून महापालिकेने ताडपत्री लावून संपूर्ण कबूतरखाना बंद केला आहे. स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असूनही प्रशासनाने कारवाई थांबवलेली नाही. याठिकाणी धान्य घालण्यास बंदी घालण्यात आली असून परिसरात फलक लावून सूचना देण्यात आल्या आहेत. कोणी धान्य टाकताना आढळल्यास त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही पालिकेकडून देण्यात आला आहे.

  • 04 Aug 2025 02:20 PM (IST)

    04 Aug 2025 02:20 PM (IST)

    जिथे दहशत माजवली तिथेच काढली धिंड

    मालेगावच्या गुलशेर नगर परिसरात गोळीबार व प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात ‘रब्बानी दादा’ टोळीविरोधात पवारवाडी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. टोळीप्रमुख शेख रब्बानी शेख कादीर उर्फ रब्बानी दादा व त्याच्या तीन साथीदारांना अटक करून संपूर्ण परिसरातून धिंड काढण्यात आली. यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबाबत विश्वास वाढला असून दहशतीला चाप बसला आहे.

  • 04 Aug 2025 02:12 PM (IST)

    04 Aug 2025 02:12 PM (IST)

    १३ लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

    भोंदूगिरी करून १३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, जुलै २०१८ ते एप्रिल २०१९ च्या दरम्यान संतोष श्रवण लोखंडे रा. सातारा याने स्मशानी शक्तींचा वापर करून पैशांचा पाऊस पाडतो, पैसे डबल करून देतो, असे सांगून जहीर अब्बास मनचेकर (रा. विलये, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) यांच्याकडून १३ लाख रुपये घेऊन त्यांची तसेच त्यांच्या मित्रांची आर्थिक फसवणूक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिर्के करीत आहेत.

  • 04 Aug 2025 02:00 PM (IST)

    04 Aug 2025 02:00 PM (IST)

    वयोवृद्ध महिलेस ट्रकने चिरडले

    नाशिक शहरातून भीषण अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील बळी मंदिर चौफुलीवर काल (3 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. यात बळी मंदिरात पारायण जाणाऱ्या राधाबाई गायकवाड या 70 वर्षीय वयोवृद्ध महिलेस भरधाव ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात राधाबाई गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक सोडून पलायन केले. मात्र या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

  • 04 Aug 2025 01:50 PM (IST)

    04 Aug 2025 01:50 PM (IST)

    जितेंद्र आव्हाडांना मारण्यासाठी गोट्या गित्तेनं मुंबईत रेकी केली

    धनंजय मुंडेंना संपवून त्यांच्याजागी आमदारकीचे स्वप्न वाल्मिक कराड पाहात असल्याचा दावा करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. गोट्या गित्ते आणि तांदळे नामक युवकाने मुंबईत जाऊन जितेंद्र आव्हाड यांना मारण्यासाठी रेकी केली होती, असे विजयसिंह बांगर म्हटले आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून गोट्या गित्ते हा मला धमकी देण्याचे काम करतोय, असे आव्हाड यांनी म्हटले होते. वाल्मिक कराड प्रकरणावरुन सध्या बीड जिल्हा चर्चेत असून महादेव मुंडे हत्याप्रकरणावरुनही कारवाईला वेग आला आहे. विजयसिंह बांगर यांनी महादेव मुंडे हत्याप्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचा हात असल्याचे सांगत काही पुरावे देखील समोर आणले होते. त्यानंतर, मनोज जरांगे पाटील यांनीही याप्रकरणात लक्ष घातल्यानंतर पोलीस कारवाईला वेग आला.

  • 04 Aug 2025 01:35 PM (IST)

    04 Aug 2025 01:35 PM (IST)

    पुण्यात टोळक्याचा तरुणावर हल्ला

    सिंहगड रस्त्यावरील (नरवीर तानाजी मालुसरे रोड) हिंगणे खुर्द येथील खोराडवस्तीत गुरुवारी मध्यरात्री एका टोळक्याने रस्त्यावर राडा घालत तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. लोखंडी रॉड आणि कोयते घेऊन टोळक्याने गाड्यांची तोडफोड केली आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. या हल्ल्यात एक जण जखमी झाला असून, सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रामकिसन गोरोबा टापरे (वय ४९, रा. खोराड वस्ती) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून मोहन गोरे आणि त्याचे पाच ते सहा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 04 Aug 2025 01:15 PM (IST)

    04 Aug 2025 01:15 PM (IST)

    सहा महिन्यात पुण्यातून 989 वाहने गेली चोरीला

    दुचाकींच्या शहरातील भयावह चित्र दिवसेंदिवस आणखीनच गडद होत चालले असून, पुणेकर आता पोलिसांना आता तरी वाहन चोरांना "आवरा" अशी आर्त हाक मारू लागले आहेत. दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असताना त्या उघड करण्यातही पोलिसांना म्हणावे, तसे यश येत नसल्याचे वास्तव आहे. गेल्या सहा महिन्यात तब्बल ९८९ वाहने चोरीस गेली आहेत. त्यातील केवळ २४२ वाहने शोधण्यात यश आले आहे.

  • 04 Aug 2025 01:05 PM (IST)

    04 Aug 2025 01:05 PM (IST)

    दारु पार्टीनंतर मित्रानेच केला मित्राचा खून

    दारु पार्टी झाल्यानंतर आई बहिणीवरुन शिव्या दिल्याच्या रागातून झोपलेल्या मित्राचा मित्रानेच डोक्यात लोखंडी पहार घालून खून केल्याची घटना घडली आहे. खून करुन आरोपीने बनाव रचल्याची माहिती समोर आली आहे. पण पोलिसांनी त्याचा बनाव काही तासातच उघडकीस आणून त्याला अटक केली आहे. रविकुमार शिवशंकर यादव (वय ३३, रा. साईगंगा सोसायटीसमोरील पत्र्याची शेड, हांडेवाडी रोड) असे खुन झालेल्याचे नाव आहे. तर किसन राजमंगल सहा (वय २०, रा. हांडेवाडी रोड, मुळ रा़ मोतीहारी, बिहार) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विलास सुतार, रत्नदिप गायकवाड, अमित शेटे, पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर व त्यांच्या पथकाने केली आहे.

  • 04 Aug 2025 12:45 PM (IST)

    04 Aug 2025 12:45 PM (IST)

    सेनापती बापट रस्त्यावर टोळक्याचा तरुणावर हल्ला

    पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सेनापती बापट रस्त्यावरील वेताळबाबा चौकाजवळच भररस्त्यात गाडीला साईड देण्यावरून वाद घालत कारमधील तिघांनी एका तरुणाच्या खूनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेदम मारहाण करून त्याच्यावर शस्त्रानेही सपासप वार केले आहे. नंतर टोळके पसार झाले आहे. केवळ साईड देण्यावरून तरुणाच्या खूनाचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने शहरात भितीदायक वातावरण असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. पृथ्वीराज कुमार नरवडे (वय १९, रा. भोसलेनगर) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी महेश प्रमोद पवार (वय २९), रोहित अशोक धोत्रे (वय २४), आकाश विलास कुसाळकर (वय ३४, रा. वडारवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली असून, याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 04 Aug 2025 12:30 PM (IST)

    04 Aug 2025 12:30 PM (IST)

    ऑनलाइन लिंकवर क्लिक करणं पडलं महागात

    कोथरूडमध्ये ज्येष्ठ नागरिक भाड्याने गाडी बुक करण्याची प्रक्रिया करत असताना सायबर चोरट्यांनी २ लाख ९० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदाराच्या क्रेडिट कार्डची माहिती मिळवून संशयितांनी रक्कम स्वतःच्या खात्यात वळवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी उत्तम गायकवाड (वय ६१, रा. त्रिमूर्ती गुजरात कॉलनी, कोथरूड) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • 04 Aug 2025 12:15 PM (IST)

    04 Aug 2025 12:15 PM (IST)

    चोरट्यांची पण कमालच!

    राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरटे राज्यातील वेगवेगळ्या भागात लाखो रुपयांवर डल्ला मारत आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पुणे शहराच्या पूर्व भागात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी हडपसरमधून रिक्षा चोरली आणि त्याच रिक्षाने वाघोलीतील एका भांड्याच्या दुकानात चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या गुन्ह्याचा छडा लावत वाघोली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर, अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि चोरीस गेलेली रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • 04 Aug 2025 12:07 PM (IST)

    04 Aug 2025 12:07 PM (IST)

    संतापजनक! शाळेत जात असतांना बळजबरीने गाडीत बसवलं, विनयभंग केला, पाईपने मारहाण केली

    बीडमधून संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका शाळकरी मुलीला पाईपने मारहाण करत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना बीडच्या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.

  • 04 Aug 2025 12:01 PM (IST)

    04 Aug 2025 12:01 PM (IST)

    ४४ सीसीटीव्हीद्वारे “ताशा”चोर पकडला

    आगामी गणेशोत्सवानिमित्ताने ढोल-ताशा पथकांकडून सराव सुरू आहेत. ठिकठिकाणी पथके रात्री सराव करतात. त्यासाठी या पथकांकडून पत्र्यांचे शेड मारून त्याचठिकाणी ढोल-ताशा ठेवले जातात. बाणेर भागात देखील पाषाण-सुस रोड येथील नवचैतन्य हास्यक्लब येथे नादलव्य वाद्य पथकाकडून सराव सुरू आहे. मात्र, सरावानंतर ढोल-ताशा ठेवून गेले असता अज्ञाताने येथून ३० ताशा चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बाणेर पोलिसांकडून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. पथकाने या भागातील ४४ सीसीटीव्ही तपासले. त्यातून चोरटा वसिम हसिबूर शेख (वय २२, रा. सुसगांव) याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १२ ताशा जप्त केले असून उर्वरित ताशाबाबत चौकशी सुरू केली आहे.-

  • 04 Aug 2025 11:42 AM (IST)

    04 Aug 2025 11:42 AM (IST)

    बाणेर पोलिसांची मोठी कारवाई

    पुण्यातून चोरीसंदर्भात एक बातमी आली आहे. पुणे शहरात चैन स्नॅचिंग तसेच मोबाईल हिसकावण्याच्या घडत असतानाच बाणेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मोबाईल चोर आणि चैन स्नॅचरच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले चैन व मोबाईल जप्त केला आहे. पहिल्या चैन चोरीच्या घटनेत शफिक मोदीन शेख (वय २६, रा. तलवडे) तसेच मोबाईल चोरीप्रकरणात फिरोज अब्दुल कुददुसशहा (वय २१, रा. गणेशनगर, वाकड) या दोघांना अटक केली आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग व त्यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Maharashtra crime news in marathi live updates kothrud news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Kothrud News

संबंधित बातम्या

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान
1

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
2

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
3

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
4

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.