Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र विधान परिषदचे उपसभापति सचिन अहीरेंच्या घरी २.६५ कोटींची चोरी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्रातील एका वरिष्ठ राजकीय नेत्याच्या निवासस्थानी झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कथित चोरीच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 26, 2026 | 09:57 AM
महाराष्ट्र विधान परिषदचे उपसभापति सचिन अहीरेंच्या घरी २,६५ कोटींची चोरी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्र विधान परिषदचे उपसभापति सचिन अहीरेंच्या घरी २,६५ कोटींची चोरी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Follow Us
Follow Us:
  • अनेक वर्षे सुरू असलेल्या कथित चोरीचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली.
  • एका संशयिताला अटक करण्यात आली असून इतर संबंधितांचा पोलीस शोध घेत आहेत.
  • तपासादरम्यान घरातील सदस्यांनीही काही संशयास्पद बाबी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.
महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापति सचिन अहिरे यांच्या घरातून गेल्या ५ वर्षांत २.६५ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे प्रकरण समोर येत आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर एका आरोपीला अटक केली असून यात सामील असलेल्या अन्य तीन आरोपींचा शोध घेतला जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती पदावर सचिन अहिरे कार्यरत आहेत. चोरी गेलेल्या वस्तूंमध्ये १०० ग्रॅम सोन्याची बिस्किटे, हिरेजडित सोन्याचे ब्रेसलेट, हिऱ्याची अंगठी, पाच हिऱ्यांचे हार, चांदीची थाळी आणि चांदीचे वाट्यांचा समावेश आहे.

धक्कादायक ! आई आणि मुलाने केली आत्महत्या; विष प्राशन करून संपवलं जीवन

१३ ऑक्टोबर, २०२५ रोजी, शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घराचे नुकसान झाले. यानंतर कुटुबियांना वाटले की, आगीत जळून सर्व नष्ट झालं आहे. पण सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर खरं सत्य समोर आलं. पोलसांच्या तपासात समोर आलं की, सीसीटीव्ही फुटेजमधील काही क्लिप्स या गायब होत्या ज्यामुळे चोरीचा संशय आणखी वाढला. या चोरीचे मुख्य सूत्रधार हे घरातील पाच नोकर असल्याचे समोर येत आहे. मागील पाच वर्षांत पद्धतशीरपणे त्यांनी घरातील माैल्यवान वस्तू आणि दागिने लंपास केले.

मुंबई पोलिसांनी चोरीच्या या प्रकरणात घरातील नोकर प्रवीण रमेश सोलंकी याला अटक केली असून न्यायालयाने आरोपीला ३० जुलैपर्यंत गुन्हे शाखेची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे अन्य चोरांना पकडण्यासाठी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.

Kalyan Crime: 16 वार करून ‘पेंद्या भाई’ची हत्या; आरोपींची पोलिसांनी भर रस्त्यात काढली धिंड

पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, सोलंकीने चाैकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला आहे. चोरी केलेल्या वस्तू विकून त्याची रक्कम सर्व आरोपींनी आपआपसात वाटून घेतल्याचे त्याने सांगितले. तर दुसरीकडे, बचाव पक्षाचे वकिल अजय उमापति दुबे यांनी सोलंकी निर्दोष असून त्याला या प्रकरणात खोट्या आरोपांखाली अडकवले जात असल्याचा दावा केला आहे.कुटुंबीयांनी सांगितले की, चोरीपूर्वी त्यांना चक्कर येणे आणि सुस्ती जाणवत होती. त्यामुळे अन्न किंवा पेयामध्ये गुंगीचे औषध मिसळण्यात आले होते का, याचाही पोलीस तपास करत आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ राजकारण्याच्या घरी कोट्यवधींची चोरी झाल्याने राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे.

 

 

Web Title: Maharashtra mlc deputy chairman sachin ahir house theft rs 2 65 crore servants arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • crime news
  • Sachin Ahir
  • shivsena shinde group

संबंधित बातम्या

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
1

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
2

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
3

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त
4

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.