Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मद्यप्रेमींमध्ये खळबळ… Old Monk विक्री थांबली! महाराष्ट्र सरकारलाच बसला 350 कोटींचा फटका

Old Monk Ban In Maharashtra : मद्यप्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या 'ओल्ड मंक' या ब्रँडेड रमच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी आली आहे. राज्य सरकारच्या तिजोरीला मोठा फटका बसला आहे. या विक्री बंदीमुळे आणि उत्पादन शुल्क विभागाच्या धोरणात्मक बदलांमुळे राज्य सरकारला तब्बल ३५० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 13, 2026 | 01:17 PM
महाराष्ट्र सरकारलाच लागला 350 कोटींचा फटका ( सौजन्य - सोशल मीडिया )

महाराष्ट्र सरकारलाच लागला 350 कोटींचा फटका ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • मद्यप्रेमींमध्ये खळबळ..
  • Old Monk विक्री थांबली!
  • महाराष्ट्र सरकारलाच 350 कोटींचा फटका
Old Monk Ban In Maharashtra : मद्यप्रेमींमध्ये लोकप्रिय असलेली Old Monk ला महाराष्ट्रात बंदी घातली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींमध्ये नाराजी पाहायला मिळते आहे. पण याचा फटका फक्त मद्यप्रेमींसह कंपनींनाच नाही तर महाराष्ट्र सरकारलाही बसलत असल्याचा पाहायला मिळत आहे. ओल्ड मॉन्क या लोकप्रिय रम ब्रँडच्या विक्रीवरील बंदीचा परिणाम महाराष्ट्र सरकारच्या महसुलावरही होत आहे. नेमका कसा काय सविस्तर जाणून घेऊयात. ( Old Monk Ban In Maharashtra ) 

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांनो, कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर! ‘इतक्या’ शेतकऱ्यांचा समावेश; तुमचंही नाव असेल तर लगेच करा ‘हे’ काम

मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली असून, या बंदीमुळे आपल्याला ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाला अंदाजे ३५० कोटी रुपयांचा महसुली तोटा झाला असल्याचं स्पष्ट केलं आहे.

ओल्ड मॉन्कचा नेमका वाद काय?

हा वाद ओल्ड मॉन्क रममध्ये वापरल्या जाणाऱ्या फ्लेवरिंग्ज आणि बाटलीवरील लेबलिंगच्या माहितीशी संबंधित आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण FSSAI ने काही विशिष्ट मद्य उत्पादनांच्या विक्रीवर आक्षेप घेतला होता. नियामकाच्या मते, जर एखाद्या मद्यामध्ये रम फ्लेवरिंग मिसळले असेल, तर लेबलवर उत्पादनाची अचूक माहिती देणे बंधनकारक आहे. FSSAI ने म्हटले आहे की, अशी उत्पादने सामान्य रमच्या नावाखाली विकल्यास ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते. याच कारणामुळे कंपनीच्या महाराष्ट्र युनिटमधून होणाऱ्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती.

कंपनीने न्यायालयात काय स्पष्टीकरण दिलं?

कंपनीने न्यायालयाला सांगितले की, महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील त्यांच्या उत्पादन युनिटमधील विक्री थांबल्यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कंपनीने असेही सांगितले की, संबंधित युनिटवर बंदी असूनही, राज्यातील इतर युनिट्स त्याच फॉर्म्युल्याने रमची विक्री करत आहेत. कंपनीने या कारवाईला आव्हान दिले असून न्यायालयाकडे दाद मागितली आहे. उत्पादन निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांविषयी आणि प्रक्रियांविषयीच्या नियमांनुसार आपली बाजू मांडण्याची संधी मिळावी, असा त्यांचा दावा आहे.

विक्री पुन्हा सुरू करण्यासाठी अटी काय?

सुनावणीदरम्यान, केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने सांगितले की, जर कंपनी आपल्या उत्पादनाच्या लेबलवर ‘रम’ ऐवजी ‘रम-सदृश उत्पादन’ वापरण्यास सहमत असेल, तर विक्रीच्या परवानगीचा विचार केला जाऊ शकतो. कंपनीने यापूर्वी लेबलमध्ये बदल प्रस्तावित केले होते, परंतु सुधारित लेबलला मंजुरी मिळाली नाही. परिणामी, हा वाद अनिर्णित राहिला आहे.

पुढील सुनावणी २३ ऑक्टोबर रोजी

मुंबई उच्च न्यायालयाने कंपनीला तात्काळ अंतरिम दिलासा दिलेला नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. आता सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या पुढील कार्यवाहीवर आणि लेबल वादाच्या निराकरणावर लागले आहे. या प्रकरणावर अंतिम निर्णय प्रलंबित आहे.

Retail Inflation CPI : बाप रे… सप्टेंबरमध्ये महागाईचा शॉक! थेट 23 महिन्यांचा रेकॉर्ड मोडला; किरकोळ महागाई 5.54 टक्क्यांवर

Web Title: Old monk rum ban in maharashtra causes 350 crore revenue loss ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • maharashtra
  • Old Monk

संबंधित बातम्या

Dharashiv Water Crisis: नागरिकांनो, पाणी जपून वापरा! धरणांत अवघा ६.४४ टक्के पाणीसाठा; पुढील १० महिने पाणी जपून वापरण्याचे आवाहन
1

Dharashiv Water Crisis: नागरिकांनो, पाणी जपून वापरा! धरणांत अवघा ६.४४ टक्के पाणीसाठा; पुढील १० महिने पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत
3

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत

Gondiya News: गोंदियात ६२१ सर्वजनिक दुर्गामूर्तीची स्थापना! गरबा-दांडियाचा उत्साह; नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त
4

Gondiya News: गोंदियात ६२१ सर्वजनिक दुर्गामूर्तीची स्थापना! गरबा-दांडियाचा उत्साह; नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.