Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Water Crisis: नागरिकांनो, पाणी जपून वापरा! धरणांत अवघा ६.४४ टक्के पाणीसाठा; पुढील १० महिने पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dharashiv Water Crisis: धाराशिव जिल्ह्यात आगामी काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ११ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ ६.४४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 13, 2026 | 11:41 AM
नागरिकांनो, पाणी जपून वापरा! धरणांत अवघा ६.४४ टक्के पाणीसाठा; पुढील १० महिने पाणी जपून वापरण्याचे आवाहन

नागरिकांनो, पाणी जपून वापरा! धरणांत अवघा ६.४४ टक्के पाणीसाठा; पुढील १० महिने पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Follow Us
Follow Us:
  • धाराशिवमध्ये पाणी आणीबाणीचे सावट!
  • धरणांत अवघा ६.४४ टक्के पाणीसाठा
  • पुढील १० महिने पाणी जपून वापरण्याचे आवाहन
Dharashiv Water Crisis: पावसाळा संपत आला तरी धाराशिव जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. वाढते तापमान, वेगाने होणारे बाष्पीभवन आणि खालावणारी भूजलपातळी यामुळे आगामी उन्हाळ्यात जिल्ह्यात पाण्याचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये ११ ऑक्टोबर रोजी केवळ ६.४४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला असून, पुढील १० महिने हे पाणी पुरवून वापरावे लागणार आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. (Dharashiv Water Crisis)

Nagpur News : पुन्हा २४ तास शटडाऊन ;काटकसरीचा दिला सल्ला; मनपा-ओसीडब्ल्यूचे अपयश

४१ दिवसांत जलसाठ्यात झपाट्याने घट

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता सुमारे ७२५ दशलक्ष घनमीटर (दलघमी) आहे. १ सप्टेंबर रोजी या प्रकल्पांमध्ये ५९.६ दलघमी पाणी उपलब्ध होते. मात्र, अवघ्या ४१ दिवसांत (११ ऑक्टोबरपर्यंत) यात १२.८५ दलघमीची घट होऊन हा साठा आता फक्त ४६.७५ दलघमीवर (६.४४ टक्के) आला आहे. ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्याचे कमाल तापमान साधारणतः ३० ते ३१ अंश सेल्सिअस असते; परंतु यंदा ते ३४ ते ३५ अंशांपर्यंत पोहोचल्याने बाष्पीभवन वेगाने होत आहे.

भूजलपातळी तब्बल ८.६६ मीटरने खालावली

१ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील भूजलपातळीतील घसरण ६ मीटर होती, ती ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात थेट ८.६६ मीटरपर्यंत खाली गेली आहे. त्यामुळे विहिरी आणि बोअरवेलच्या पाणी उपलब्धतेवरही मोठा परिणाम होण्याची भीती आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे.

२०१५ च्या भीषण टंचाईची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नियोजन

यापूर्वी २०१५ मध्ये जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती, तेव्हा जलसाठा १२ दलघमीपर्यंत घसरला होता आणि प्रशासनाला ४६८ टँकर सुरू करावे लागले होते. तशीच परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून आतापासूनच नियोजन सुरू करण्यात आले आहे. संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक गावात ‘नोडल अधिकारी’ नियुक्त करण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याचे नियोजन, जनावरांसाठी चारा-पाणी उपलब्धता आणि ग्रामीण भागात रोजगार मिळवून देण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

“पाणीटंचाईचा सामना करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीयांनी सामूहिक जबाबदारीने काम करावे आणि नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा.” अशी माहिती आमदार, राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

Washim: आठवड्यात दोनवेळा पाणीपुरवठा करा, तंटामुक्त समिती अध्यक्षांचे ग्रामपंचायतला निवेदन

Web Title: Dharashiv water crisis alert mla ranajagjitsinh patil appeals to save water for next 10 months sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra
  • Water Crisis

संबंधित बातम्या

मद्यप्रेमींमध्ये खळबळ… Old Monk विक्री थांबली! महाराष्ट्र सरकारलाच बसला 350 कोटींचा फटका
1

मद्यप्रेमींमध्ये खळबळ… Old Monk विक्री थांबली! महाराष्ट्र सरकारलाच बसला 350 कोटींचा फटका

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत
3

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत

Gondiya News: गोंदियात ६२१ सर्वजनिक दुर्गामूर्तीची स्थापना! गरबा-दांडियाचा उत्साह; नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त
4

Gondiya News: गोंदियात ६२१ सर्वजनिक दुर्गामूर्तीची स्थापना! गरबा-दांडियाचा उत्साह; नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.