Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी मोबाईल फॉरमॅट केला अन् नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली; दिघीत घडला धक्कादायक प्रकार

राहत्या घरात सीट बेल्टच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे सुरुवातीला घरातील सदस्यांना नेमके काय घडले आहे याची कल्पना आली नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 18, 2026 | 12:10 PM
शिक्षकाला शेअर मार्केटमध्ये 1.81 कोटीचे नुकसान; आधी पत्नीसह दोन मुलांना आईस्क्रीममधून विष दिलं अन् नंतर स्वत:..

शिक्षकाला शेअर मार्केटमध्ये 1.81 कोटीचे नुकसान; आधी पत्नीसह दोन मुलांना आईस्क्रीममधून विष दिलं अन् नंतर स्वत:..

Follow Us
Follow Us:

पिंपरी : दिघी परिसरातील गंगोत्री हॉस्पिटलजवळ राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. अथर्व विजय देशमुख असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व हा गंगोत्री हॉस्पिटल परिसरात पार्वती भोजने यांच्या घरी भाड्याने राहत होता.

रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्याने राहत्या घरात सीट बेल्टच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे सुरुवातीला घरातील सदस्यांना नेमके काय घडले आहे याची कल्पना आली नाही. काही वेळ उलटूनही अथर्वकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता आणि दरवाजाही उघडला जात नव्हता. त्यामुळे त्याची आई ज्योती देशमुख यांना संशय आला. त्यांनी वारंवार आवाज देऊन अथर्वला हाक मारली. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

हेदेखील वाचा : Beed Crime: धक्कादायक ! एका ५ वर्षीय चिमुरडीवर १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने केले लैंगिक अत्याचार; आरोपी ताब्यात

यानंतर परिस्थिती संशयास्पद वाटू लागल्याने त्यांनी शेजाऱ्यांना बोलावून घेतले. शेजाऱ्यांच्या मदतीने घराच्या खिडकीतून आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी घरात काहीतरी गंभीर घडल्याचा अंदाज आल्याने खिडकीतून घराची कडी उघडण्यात आली आणि सर्वांनी आत प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर अथर्व गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. ही परिस्थिती पाहताच कुटुंबीय आणि शेजारी घाबरून गेले.

विलंबाशिवाय रुग्णालयात नेलं पण…

तातडीने त्याला खाली उतरवण्यात आले आणि कोणताही विलंब न करता जवळच्या गंगोत्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात आल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्याला तातडीने तेथे नेण्यात आले.

रुग्णालयात उपचारापूर्वी मृत्यू

रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी सखोल तपासणी केली असता अथर्वचा आधीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिघी पोलिसांची तातडीने घेतली धाव

या घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक ती नोंद केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. अथर्वने आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आत्महत्येपूर्वी त्याने आपला मोबाईल फोन फॉरमॅट केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. त्यामुळे या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असून त्याच्या मोबाईलसह इतर बाबींचीही चौकशी करण्यात येत आहे.

Web Title: Man formatted his mobile phone and then committed suicide by hanging himself incident in pimpri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • crime news
  • Pimpri News
  • Suicide case

संबंधित बातम्या

डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या माजी संचालकावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
1

डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या माजी संचालकावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

कपड्यांचे दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या, लष्कर पोलिसांची कारवाई; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
2

कपड्यांचे दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या, लष्कर पोलिसांची कारवाई; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे-इंदूर महामार्गावर मद्यधूंद ट्रकचालकाचा थरार, पादचाऱ्यांना चिरडले; जखमींचा आकडाही आला समोर
3

पुणे-इंदूर महामार्गावर मद्यधूंद ट्रकचालकाचा थरार, पादचाऱ्यांना चिरडले; जखमींचा आकडाही आला समोर

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
4

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.