Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिलेंडरने डोके फोडून मित्राची हत्या; चार दिवस घरातच पडून होता मृतदेह, दुर्गंधी सुटली अन्…

मृतक अनिल त्रिमूर्ती बारमध्ये तर राजूही जवळच असलेल्या हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. दोन दिवसांपासून अनिलच्या खोलीतून दुर्गंध येत होती. शुक्रवारी रात्री पोलिस पाटील प्रमोद कोंगे यांनी मनोज यांच्याशी संपर्क केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 08, 2025 | 09:59 AM
धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरून सिलेंडरने डोके फोडून मित्राची हत्या; चार दिवस घरातच पडून होता मृतदेह, दुर्गंधी सुटली अन्...

धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरून सिलेंडरने डोके फोडून मित्राची हत्या; चार दिवस घरातच पडून होता मृतदेह, दुर्गंधी सुटली अन्...

Follow Us
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. त्यात नागपुरात धक्कादायक घटना घडली. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून डोक्यावर सिलिंडर आदळून मित्राची हत्या केली. इतकेच नाहीतर हत्येनंतर त्याचा मृतदेह तब्बल चार दिवस घरातच पडून होता. दुर्गंधी सुटल्याने दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता संपूर्ण प्रकार समोर आला.

हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत विहिरगाव परिसरात ही घटना घडली. अनिल मधुकर पवार (वय 36, रा. पिंपळगाव नेर, यवतमाळ, ह.मु. विहीरगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मनोज दळने (वय 44, रा. विहीरगाव) याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत आरोपी मित्र राजू महादेव पवार (वय 34, रा. यवतमाळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येनंतर राजू पवार हा फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू केला जात आहे. शवविच्छेदनानंतर शनिवारी सायंकाळी मृतदेह कुटुंबियांच्या हवाली करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक अनिल त्रिमूर्ती बारमध्ये तर राजूही जवळच असलेल्या हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. दोन दिवसांपासून अनिलच्या खोलीतून दुर्गंध येत होती. शुक्रवारी रात्री पोलिस पाटील प्रमोद कोंगे यांनी मनोज यांच्याशी संपर्क केला. मनोज तत्काळ घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत दुसरे पोलिस पाटील राजू खोरगडेही तेथे पोहोचले होते.

सर्वांनी मिळून दरवाजा तोडला अन्…

सर्वांनी मिळून घराचे दार तोडले. आत जाऊन पाहिले असता मनोज मृतावस्थेत पडून होता. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिस ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. अनिलच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक छोटा सिलिंडर आणि हेल्मेट दिसले. दोघांवरही रक्ताचे डाग होते. सिलिंडर आणि हेल्मेटने डोक्यावर वार करण्यात आले होते.

3 जूनपासून बेपत्ता

चौकशीदरम्यान माहिती मिळाली की, अनिल 1 जून पासून कामावरच गेला नाही तर राजू 3 जून पासून बेपत्ता आहे. शेजारी महिलेने सांगितले की, राजू दाराला कुलूप लावून बॅगसह बाहेर जाताना दिसला होता. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून राजूचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Man murder his friend incident in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 09:59 AM

Topics:  

  • Crime in Nagpur
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Accident News : मध्य प्रदेशात भीषण अपघात; बेदरकार ट्रकने अनेकांना चिरडले, 12 जणांचा जागीच मृत्यू
1

Accident News : मध्य प्रदेशात भीषण अपघात; बेदरकार ट्रकने अनेकांना चिरडले, 12 जणांचा जागीच मृत्यू

भंगार चोरण्यासाठी निघाले अन् बंगल्यातील सोन्यावर मारला डल्ला! तळवडेतील चोरीप्रकरणी तिघांना अटक
2

भंगार चोरण्यासाठी निघाले अन् बंगल्यातील सोन्यावर मारला डल्ला! तळवडेतील चोरीप्रकरणी तिघांना अटक

हिंजवडीत एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त; राजस्थानच्या तरुणासह दोघांना ठोकल्या बेड्या
3

हिंजवडीत एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त; राजस्थानच्या तरुणासह दोघांना ठोकल्या बेड्या

किरकोळ वादातून रक्तरंजित थरार! २१ वर्षीय तरुणाचा खून; वाघोलीतील घटनेनं खळबळ
4

किरकोळ वादातून रक्तरंजित थरार! २१ वर्षीय तरुणाचा खून; वाघोलीतील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.