Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…

काही वेळातच या वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले. नशेत असलेल्या संशयित अमोल गायकवाड याने रागाच्या भरात जवळ असलेले धारदार हत्यार काढून विशालवर सपासप वार केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 27, 2026 | 08:45 AM
पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक...

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक...

Follow Us
Follow Us:

नाशिकरोड : शहरात गुन्हेगारांचे धाडस दिवसेंदिवस वाढतच चालले असून, आता उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवळाली गावात एका ३७ वर्षीय तरुणाची जुन्या वादाची कुरापत काढून धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशाल सीताराम माळवे (वय ३७, रा. सुवर्ण सोसायटी, देवळाली गाव) असे मृत युवकाचे नाव आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. उपनगर पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

मृत विशाल माळवे आणि त्याचा मित्र अमोल गायकवाड (वय ३९) हे दोघे (दि. २५) रात्री उशिरापर्यंत एकत्र पार्टी करत बसले होते. पार्टी सुरू असतानाच त्यांच्यात जुन्या कारणावरून अचानक वाद सुरू झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले. नशेत असलेल्या संशयित अमोल गायकवाड याने रागाच्या भरात जवळ असलेले धारदार हत्यार काढून विशालवर सपासप वार केले. या भीषण आणि जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला विशाल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. दरम्यान, संशयित आरोपी अमोल गायकवाड हा खून करून पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलिसांनी घरात लपून बसलेल्या अमोल गायकवाड याला घरझडती घेताना ताब्यात घेतले.

अवैध धंद्यांवर लगाम घाला

नाशिकरोड, उपनगर परिसरात अवैद्य धंद्यांमध्ये वाढ झालेली आहे. नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे रात्रीच्या वेळेस काही ठिकाणी जुगाराचे प्रकार खेळले जातात व इतर प्रकारचे पण अवैध धंदे तसेच दारू मिळते, यामुळे रात्रीच्या वेळेस स्टेशन भागात काही अनूचित प्रकार घडू शकतो, यावर पोलिसांनी त्वरित लक्ष देण्यात यावे, अशी नागरिकांनी व रिक्षा चालक, रेल्वे व बस प्रवासी संघटनेने मागणी केली आहे.

Ketan Agrawal Murder Case : लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी

Web Title: Man murders friend with a sharp weapon due to past enmity incident in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Nagpur News

संबंधित बातम्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
1

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
2

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
3

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
4

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.