Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Blast News: दिल्ली स्फोटासाठी उमर नबीला कार पुरवणाऱ्याला अटक; महत्त्वाचे खुलासे समोर येणार

आतापर्यंतच्या तपासानुसार, शोएबने १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार बॉम्बस्फोटापूर्वी उमरला आश्रय आणि लॉजिस्टिक सपोर्ट पुरवला होता. यात अनेक लोक मृत्युमुखी पडले, तर अनेकजण जखमी झाले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 26, 2025 | 04:45 PM
Delhi Bomb Blast:

Delhi Bomb Blast:

Follow Us
Close
Follow Us:
  • दिल्ली ब्लास्ट प्रकरणात महत्त्वाची अपडेट
  • लाल किल्ल्याजवळील कार बॉम्बस्फोट हा ठरवून घडवून आणल्याचा संशय
  • दिल्ली स्फोट घटनेमागील संपूर्ण कट उलगडण्यासाठी प्रयत्न सुरू
Delhi Blast News: दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ला मोठे यश मिळाले आहे. आत्मघाती हल्लेखोर उमर नबीच्या साथीदाराला अटक करण्यात आली असून त्याची ओळख शोएब अशी झाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.

लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने पोलिसांसह सर्व तपास व गुप्तचर यंत्रणेला धक्का बसला होता. घटनेनंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका संशयास्पद पोस्टरची चौकशी सुरू केली. पुढील तपासात धागेदोरे फरिदाबादपर्यंत पोहोचले आणि तिथे नव्या ‘व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल’चा पर्दाफाश झाला.

“मी राज्यपालपदाचा किंवा राज्यसभेत….”; माजी CJI राजकारणात येणार? पहा काय म्हणाले भूषण गवई

फरिदाबादमध्ये तपास पथकाला तब्बल ३,००० किलो स्फोटक सामग्री आढळून आली, ज्यामुळे दहशतवादी संघटनांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. प्राथमिक तपासानुसार, लाल किल्ल्याजवळील कार बॉम्बस्फोट हा ठरवून घडवून आणल्याचा संशय आहे. या भीषण स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तपास सुरू असून एनआयए आणखी आरोपींचा शोध घेत आहे.

NIA कडून उमरच्या सहकाऱ्याला अटक

दिल्लीत झालेल्यया बॉम्बस्फोटाच्या काही काळापूर्वी दहशतवादी उमर नबीला आश्रय दिल्याच्या आणि मदत केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) फरिदाबादमधील एका व्यक्तीला अटक केली आहे. संबंधित व्यक्तीचे नाव शोएब असे असून तो फरिदाबाद येथील धौज येथील रहिवासी आहे.

शोएबने लॉजिस्टिक सपोर्ट पुरवला

आतापर्यंतच्या तपासानुसार, शोएबने १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार बॉम्बस्फोटापूर्वी उमरला आश्रय आणि लॉजिस्टिक सपोर्ट पुरवला होता. यात अनेक लोक मृत्युमुखी पडले, तर अनेकजण जखमी झाले. एनआयएने यापूर्वी उमरच्या सहा साथीदारांना केस क्रमांक आरसी-२१/२०२५/एनआयए/डीएलआय मध्ये अटक केली आहे.

Weather Update : इथिओपियातील ज्वालामुखीच्या उद्रेकाचा दिल्लीवर कसा झाला परिणाम? IMDने दिली एक मोठी अपडेट

आत्मघातकी हल्ल्यामागील संपूर्ण कट उलगडण्यासाठी एजन्सी अनेक धाग्यांवर काम करत आहे. दिल्ली कार बॉम्बस्फोट प्रकरणात, तपास एजन्सी विविध राज्यांमधील स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने हल्ल्यात सहभागी असलेल्या उर्वरित व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी शोध घेत आहे.

दिल्लीतील लाल किल्ला कार बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए वेगाने तपास सुरू आहे. एनआयएने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, या भीषण स्फोटामागील संपूर्ण कट उलगडण्यासाठी सर्वांगीण चौकशी सुरू असून लवकरच महत्त्वाचे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. कटाची सखोल माहिती मिळवण्यासाठी तपास पथक शोएबची विस्तृत चौकशी करणार आहे.

फरिदाबादहून अटक केलेल्या शोएबच्या अटकेमुळे तपासाला निर्णायक वळण मिळाले आहे. शोएबने आत्मघाती हल्लेखोर उमर नबीला लॉजिस्टिक मदत दिल्याचा आरोप असून, दिल्ली कार बॉम्बस्फोट प्रकरणातील तो सातवा आरोपी ठरला आहे. तपास यंत्रणेनुसार, शोएबने उमरला एक कार उपलब्ध करून दिली होती.

याशिवाय, शोएब हा उमरला लाल किल्ल्याजवळ घेऊन जाणारा आणि फरिदाबादमधील ‘दहशतवादी मॉड्यूल’ची बैठक आयोजित करणारा व्यक्ती असल्याचा तपासात प्राथमिक निष्कर्ष आहे. अटक केलेल्या शोएबला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात येणार असून, एनआयए त्याच्या रिमांडची मागणी करणार आहे. या चौकशीमुळे स्फोटकटातील आणखी दुवे व सूत्रे समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Man who provided car to umar nabi for delhi blast arrested important revelations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 04:45 PM

Topics:  

  • Delhi blast
  • national news
  • terror attack

संबंधित बातम्या

Delhi Blast:दहशतवाद्यांच्या भरतीसाठी मौलवींकडून तीन पद्धतीचा अवलंब; नमाजी मुस्लिमांना नेहमी करत होता ‘टार्गेट’
1

Delhi Blast:दहशतवाद्यांच्या भरतीसाठी मौलवींकडून तीन पद्धतीचा अवलंब; नमाजी मुस्लिमांना नेहमी करत होता ‘टार्गेट’

President’s rule in Manipur: इम्फाळमध्ये भाजपाची बंद दाराआड नेत्यांशी बैठक ; मणिपुरमध्ये राष्ट्रपती राजवट संपुष्टात येणार
2

President’s rule in Manipur: इम्फाळमध्ये भाजपाची बंद दाराआड नेत्यांशी बैठक ; मणिपुरमध्ये राष्ट्रपती राजवट संपुष्टात येणार

Delhi Bomb Blast प्रकरणात मोठी घडामोड; आरोपी जसीर वाणीची न्यायालयात विशेष मागणी, NIAकडून काटेकोर तपास सुरू
3

Delhi Bomb Blast प्रकरणात मोठी घडामोड; आरोपी जसीर वाणीची न्यायालयात विशेष मागणी, NIAकडून काटेकोर तपास सुरू

दिल्ली बॉम्बस्फोटाचा आरोपी डॉ. उमरचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आले समोर; थेट तुर्कीमध्ये झाले दहशतवादी ट्रेनिंग?
4

दिल्ली बॉम्बस्फोटाचा आरोपी डॉ. उमरचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आले समोर; थेट तुर्कीमध्ये झाले दहशतवादी ट्रेनिंग?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.