भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई
भूषण गवई सरन्यायाधीश पदावरून झाले निवृत्त
गवई यांनी ६ महिने सांभाळला सरन्यायाधीशपदाचा पदभात
राजकारणात येण्याबाबत केले महत्वाचे विधान
भूषण गवई हे भारताचे सरन्यायाधीश या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांनी एकूण ६ महिने सरन्यायाधीश पदाचा पदभार सांभाळला. भूषण गवई हे नुकतेच या पदावरून निवृत्त झाले आहे. १४ मे रोजी त्यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली होती. गवई निवृत्त झाल्यावर न्यायधीश सूर्यकांत यांनी देशाचे सरन्यायाधीश म्ह्णून शपथ घेतली आहे. दरम्यान माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एका मुलाखतीमध्ये राजकारण आणि अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
सरन्यायाधीश पदावर कार्यरत असताना भूषण गवई हे ३३० पेक्षा जास्त निर्णयांमध्ये समाविष्ट होते. त्यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्ह्णून १४ मी रोजी पदभार स्वीकारला होता. एका मुलाखतीमध्ये भूषण गवई यांना राजकारणात येण्याची आवड आहे का? निवृत्त झाल्यावर नोकरी करणार का? असे प्रश्न विचारले असता भूषण गवई यांनी यावर भाष्य केले आहे.
काय म्हणाले भूषण गवई?
भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, ‘मला विचाराल तर, कोणत्याही न्यायाधिकरणाच्या प्रमुख पद किंवा राज्यपालपदाचा स्वीकार करणार नाही. मी राज्यसभेत कोणतेही नामांकित पद स्वीकारणार नाही. याबाबत माझे स्पष्ट मत आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत असतील भारताचे ५३ वे सरन्यायाधीश
केंद्र सरकारने गुरुवारी न्यायमूर्ती सूर्यकांत (Justice Surya Kant) यांची भारताचे ५३ वे सरन्यायाधीश (Chief Justice of India – CJI) म्हणून नियुक्ती केली आहे. कायदा मंत्रालयाच्या न्याय विभागाने यासंबंधीची अधिसूचना जारी केली. न्यायमूर्ती सूर्यकांत हे विद्यमान सरन्यायाधीश बीआर गवई यांच्या जागी पदभार स्वीकारतील, ज्यांचा कार्यकाळ २३ नोव्हेंबर २०२५ रोजी संपत आहे. केंद्रीय कायदा मंत्री अरुण राम मेघवाल यांनी या नियुक्तीची माहिती सोशल मीडियावर दिली. “भारताच्या संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून, राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांची २४ नोव्हेंबर २०२५ पासून भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. मी त्यांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा देतो.”
मोठी बातमी! न्यायमूर्ती सूर्यकांत असतील भारताचे ५३ वे सरन्यायाधीश; जाणून घ्या कधी स्वीकारणार पदभार
विद्यमान सरन्यायाधीश बीआर गवई हे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होतील. त्यानंतर, न्यायमूर्ती सूर्यकांत २४ नोव्हेंबर रोजी मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतील. ते सुमारे १५ महिने मुख्य न्यायाधीश म्हणून काम करतील. ते वयाच्या ६५ व्या वर्षी ९ फेब्रुवारी २०२७ रोजी निवृत्त होतील.






