Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; कराडमध्ये चोरट्यांचा प्रताप

कोयना वसाहत (ता. कराड) येथील कोयना वसाहत ते जखिणवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी धुम स्टाईल लांबवले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 19, 2025 | 01:10 PM
मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; कराडमध्ये चोरट्यांचा प्रताप

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; कराडमध्ये चोरट्यांचा प्रताप

Follow Us
Close
Follow Us:

कराड : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता  कोयना वसाहत (ता. कराड) येथील कोयना वसाहत ते जखिणवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी धुम स्टाईल लांबवले आहे. शुक्रवारी (दि. १७) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत विजय दुर्गावळे यांनी शहर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, विजय दुर्गावळे यांच्या पत्नी छाया दुर्गावळे या शुक्रवारी (दि. १७) सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे कोयना वसाहत-जखिणवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. ७ वाजून २५ मिनिटांनी त्या जखिणवाडी रोडने चालत घराकडे येत होत्या. त्यावेळी दुर्गावळे यांच्या घराच्या गेटसमोर रस्त्यावर तोंडाला रूमाल बांधलेल्या दोन व्यक्ती दुचाकीवर थांबल्या होत्या. समोरून छाया दुर्गावळे येत असताना चोरटयांनी त्यांच्या दिशेने दुचाकीवरून जात त्यांच्यासमोर दुचाकी थांबवली.

यावेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तिने दुर्गावळे यांच्या गळयातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. दुर्गावळे यांनी प्रतिकार करीत मंगळसूत्र हाताने घट्ट पकडून ठेवले. झटापटीत मंगळसुत्र तुटून त्याचे तिन भाग झाले. मंगळसूत्राचा एक भाग चोरटे घेऊन जाण्यात यशस्वी झाले. तर दुसरा भाग दुर्गावळे यांच्या हातात रहिला. तर तिसरा भाग तुटून ओढणीत पडल्याने तो वाचला. अंदाजे ४ ग्रॅम वजनाचे सुमारे २० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र चोरटयांनी धुमस्टाईल लांबवले. याप्रकरणी कराड शहर पोलीस तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : बाल गुन्हेगारीत वाढ, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण; तरुण मुले व्यसनांच्या जाळ्यात

पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?

पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Web Title: Mangalsutra of a woman who went for a morning walk has been stolen by thieves nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 01:07 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Karad news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती
1

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती

मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; सरासरीही गाठली नाही, तर धाराशिवमध्ये…
2

मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; सरासरीही गाठली नाही, तर धाराशिवमध्ये…

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….
3

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….

Ganeshotsav 2025: ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘स्वदेशी’…; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
4

Ganeshotsav 2025: ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘स्वदेशी’…; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.