
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं प्रकरण काय?
मेघालय पोलिसांनी सोनम रघुवंशीला जामीन मंजूर करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सोनमला नोटीस बजावत तिचा जामीन का रद्द करू नये, याबाबत स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, जामिनाला तात्काळ स्थगिती देण्याची मेघालय पोलिसांची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली.
यानंतर सोनमने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून आपली भूमिका स्पष्ट केली. तिने या प्रकरणात आपल्याला केवळ संशय आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे गोवण्यात आल्याचा दावा केला आहे. “केवळ आरोपांवरून कोणालाही दोषी ठरवता येत नाही. मी तपासापासून ते न्यायालयीन कार्यवाहीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर पूर्ण सहकार्य केले आहे. जामिनाच्या सर्व अटींचे पालन केले असून खटल्याच्या विलंबासाठी मला जबाबदार धरता येणार नाही,” असेही तिने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
मला पुन्हा तुरुंगात पाठवण्यात काहीच अर्थ नाही
सोनमने न्यायालयाला सांगितले की, २७ एप्रिल २०२६ रोजी तिला जामीन मंजूर झाला आणि २८ एप्रिल रोजी तिची तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर तिने जामिनाच्या कोणत्याही अटींचे उल्लंघन केलेले नाही. राज्य सरकारनेही अटींचा भंग केल्याचा कोणताही आरोप केलेला नाही. तसेच, या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असल्याने पुराव्यांमध्ये फेरफार करण्याची किंवा तपासावर परिणाम करण्याची शक्यताही नसल्याचा दावा तिने केला आहे.
Amravati Crime: ‘वडिलांची इज्जत जाऊ नये…’; 17 वर्षीय मुलीचं टोकाचं पाऊल, प्रियकरासह चौघांवर गुन्हा
Ans: आपण निर्दोष असल्याचा.
Ans: जामीन रद्द करण्याची.
Ans: सर्व अटींचे पालन केल्याचे.