काय घडलं नेमकं?
१० महिन्यांपासून पीडित मुलीचे एका मुलासोबत संबंध होते. त्याने लग्नाचे आश्वासन देऊन अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. प्रियकराने बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला होता याचा तिला मोठा मानसिक धक्का बसला होता. तसेच त्याच्या दोन मैत्रिणींनीही त्याला साथ दिल्याचा आरोप तिने केला आहे. समाजात बदनामी होईल आणि आपल्या वडिलांना अपमान सहन करावा लागेल, या भीतीने आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचेही तिने चिठ्ठीत नमूद केले आहे. तिने विषप्राशन केले. यांनतर तिने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
सुसाईड नोट मध्ये काय?
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये पीडितेने आपल्या आयुष्यातील घडामोडींचा उल्लेख केला आहे. १० महिन्यांपासून मुलीसोबत संबंध होते. त्याने लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवले. तसेच त्याच्या दोन मैत्रिणींनीही त्याला साथ दिल्याचा आरोप तिने केला आहे. समाजात बदनामी होईल आणि आपल्या वडिलांना अपमान सहन करावा लागेल, मी माझ्या वडिलांवर कोणताही ताण आणू शकत नाही असे लिहित १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केली.
गुन्हा दाखल?
मृत्यूपूर्वी मुलीने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये ज्यांची नावं लिहिली होती त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील शेंदुरजनाघाट पोलिसांनी मुलीचा १७ वर्षीय प्रियकर, त्याच्या दोन मैत्रिणी आणि मित्र यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
Ans: वरुड तालुका, अमरावती.
Ans: प्रियकर व इतर तिघांवर.
Ans: पॉक्सो, बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी.






