Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Crime: ओळखीच्याच तरुणानी केला घात; ५ जणांचा अल्पवयीन मुलीवर अत्य़ाचार,रायगड जिल्ह्यातील संतापजनक प्रकार

रायगडच्या म्हसळा तालुक्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. मुलीच्या तक्रारीनंतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी दोघे अल्पवयीन असल्याची माहिती आहे. मुलीला धमकावून आणि फसवून अत्याचार केल्याचा आरोप असून, घराच्या बांधकामासाठी आलेल्या एका व्यक्तीनेही गैरफायदा घेतल्याचे

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 18, 2026 | 03:21 PM
Raigad Crime: ओळखीच्याच तरुणानी केला घात; ५ जणांचा अल्पवयीन मुलीवर अत्य़ाचार,रायगड जिल्ह्यातील संतापजनक प्रकार

Raigad Crime: ओळखीच्याच तरुणानी केला घात; ५ जणांचा अल्पवयीन मुलीवर अत्य़ाचार,रायगड जिल्ह्यातील संतापजनक प्रकार

Follow Us
Follow Us:
  • १७ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप
  • पाच आरोपींवर गुन्हा दाखल
  • दोन आरोपी अल्पवयीन
रायगड : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या पाच आरोपींपैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

धमकावून अत्याचार केल्याचा आरोप

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या ओळखीच्या काही तरुणांनी तिला धमकावून तसेच फसवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील आणखी एका आरोपीनुसार, एप्रिल ते जून २०२६ या कालावधीत मुलीच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्यावेळी घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत एका ४० वर्षीय मिस्त्रीने जबरदस्तीने घरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीनंतर म्हसळा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक १३१/२०२६ नोंदविला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम ६४(२)(ड), ३७६(२) तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४ आणि ६ अन्वये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.

हेही वाचा: Delhi Crime: दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचारानंतर…

महिनाभरात दुसरी घटना

दरम्यान, म्हसळा तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना यापूर्वीही समोर आली होती. २३ ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर महिनाभराच्या कालावधीतच अशाच स्वरूपाची आणखी एक घटना समोर आल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता, प्रत्येक आरोपीची भूमिका आणि संपूर्ण घटनाक्रम याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. अल्पवयीन पीडितेची ओळख उघड होऊ नये, याची काळजी घेण्यात आली आहे.

Web Title: Mhasla raigad minor girl sexual assault five accused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • a minor girl
  • Crime . Crime News
  • POCSO
  • Raigad Crime
  • Raigad News

संबंधित बातम्या

Delhi Crime: दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार अन् नंतर…
1

Delhi Crime: दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार अन् नंतर…

Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला
2

Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला

Accident News: गणेश विसर्जनाला गेले अन् काळाचा घाला; तलावातील खोल खड्ड्यात बुडून ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू
3

Accident News: गणेश विसर्जनाला गेले अन् काळाचा घाला; तलावातील खोल खड्ड्यात बुडून ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Kolhapur Crime: ‘शांत राहा, नाहीतर…’; कळंबा कारागृहात वरिष्ठ अधिकाऱ्याला कैद्यांकडून मारहाण
4

Kolhapur Crime: ‘शांत राहा, नाहीतर…’; कळंबा कारागृहात वरिष्ठ अधिकाऱ्याला कैद्यांकडून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.