Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gauri Garje Palve Case: “तो कोणाचा पीए असो वा…”; गौरी गर्जे प्रकरणात पंकज भोयर यांचा थेट इशारा

Crime News: मंत्री पंकजा मुंडे यांचे वैयक्तिक सहाय्यक अनंत गर्जे याला वरळी पोलिसांनी अटक केली आहे. ही अटक मध्यरात्री सुमारे एक वाजता करण्यात आली.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 24, 2025 | 06:10 PM
Gauri Garje Palve Case: "तो कोणाचा पीए असो वा..."; गौरी गर्जे प्रकरणात पंकज भोयर यांचा थेट इशारा

Gauri Garje Palve Case: "तो कोणाचा पीए असो वा..."; गौरी गर्जे प्रकरणात पंकज भोयर यांचा थेट इशारा

Follow Us
Close
Follow Us:

मंत्री पंकजा मुंडे याचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांना अटक 
कायदा हा सगळ्यांकरता सारखा आहे-  मंत्री पंकज भोयर 
अनंत गर्जेवर गौरी पालवे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

Crime News: राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे- गर्जे यांनी राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवलं. त्याच्यावर त्याच्या पत्नीला आत्महत्या करण्यासाठी  प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी काही वेळेतच अनंत गर्जे याला अटक केली आहे. या प्रकरणात आता मंत्री पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय आहे प्रकरण?

२ फेब्रुवारी २०२५ रोजी डॉ. गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले होते. गौरी नायर हॉस्पिटलमध्ये डेंटीस्ट म्हणून कार्यरत होत्या. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, अनंत गर्जे यांनी गौरीचा सातत्याने छळ केला. सप्टेंबरमध्ये घर शिफ्ट करताना गौरीला घरात अनंतच्या अफेअरशी संबंधित काही कागदपत्रे सापडली, ज्यामुळे तिला अनंतबद्दल संशय निर्माण झाला. कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, याच परिस्थितीमुळे गौरीने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे.

Gauri garje-palve Case: ‘श्रीमंतांच्या नादी लागू नका..; गौरीला अखेरचा निरोप देताना वडिलांनी हंबरडा फोडला

काय म्हणाले मंत्री पंकज भोयर?

आरोपी कोणत्या मंत्र्याचा पीए असो वा कोणाचा भाऊ असो किंवा कुणाचा नातेवाईक, कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे. गौरी गर्जे प्रकरणात कायद्याने योग्य ती कारवाई केली जाईल. फॉरेन्सिकची टीम त्या ठिकाणी जाऊन आली आहे. या घटनेचा पोलिस तपास सुरू आहे. या प्रकरणात निश्चितपणे कठोरात कठोर कारवाई केली जाईल.

गौरी पालवे प्रकरणात वरळी पोलिसांकडून अनंत गर्जेला अटक

मंत्री पंकजा मुंडे यांचे वैयक्तिक सहाय्यक अनंत गर्जे याला वरळी पोलिसांनी अटक केली आहे. ही अटक मध्यरात्री सुमारे एक वाजता करण्यात आली. गौरी पालवे (गौरी गर्जे) यांच्या आत्महत्येच्या प्रकरणातील तपासात पोलिसांनी अनंत गर्जे याला बेड्या ठोकल्या आहेत. अनंत पालवे यांच्या पत्नी   डॉ. गौरी गरजे यांनी दोन दिवसांपूर्वी राहत्या घरात आत्महत्या केली. या प्रकरणी  गौरी यांच्या कुटुंबियांनी  अनंत गर्जेवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांप्रकरणी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Dr. Gauri Palve Case update: गौरी पालवे प्रकरणात वरळी पोलिसांकडून अनंत गर्जेला अटक

अनंत गर्जेला २४ तासांत अटक, राज्यात संतप्त प्रतिक्रिया

गौरी पालवे आत्महत्या प्रकरणानंतर रविवारी राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. गौरीच्या कुटुंबीयांनी वरळी पोलिसांत अनंत गर्जे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. पोलिसांनी २४ तासांच्या आत अनंत गर्जे यांना अटक करण्यात आली.  कुटुंबीयांच्या खूनाच्या आरोपानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली असून तपासाला वेग आला आहे. घटनास्थळी आणि संबंधित व्यक्तींच्या संवादाची माहिती गोळा करून पोलिस सत्यता शोधण्याचे काम करत आहेत. वरळी पोलिस प्रकरणाचे सखोल तपास करत आहेत आणि पुढील माहिती लवकरच सार्वजनिक केली जाईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अनंत गर्जेवर आरोप काय?

    Ans: अनंत गर्जेवर आपल्या पत्नीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

  • Que: अनंत गर्जे कोण आहे?

    Ans: अनंत गर्जे हा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए आहे.

Web Title: Minister pankaj bhoyar statement on dr gauri garje palve case anant garje pankaja munde crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 06:05 PM

Topics:  

  • crime news
  • Pankaja Munde
  • Sucide News

संबंधित बातम्या

Crime News : विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकाकडून अत्याचार; असुरक्षिततेबाबत पालकांमध्ये घबराट
1

Crime News : विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकाकडून अत्याचार; असुरक्षिततेबाबत पालकांमध्ये घबराट

Crime News: रात्रीस दरोडा पडे! राजापूरमधील ‘या’ गावात 6 जणांची टोळी थेट घरात घुसली अन्…
2

Crime News: रात्रीस दरोडा पडे! राजापूरमधील ‘या’ गावात 6 जणांची टोळी थेट घरात घुसली अन्…

Gauri Garje News: डॉ. गौरी गर्जेच्या आत्महत्या प्रकरणाची सेटलमेंट; वरळी पोलिस स्टेशनमध्ये आलेला ‘तो’ व्यक्ती कोण?
3

Gauri Garje News: डॉ. गौरी गर्जेच्या आत्महत्या प्रकरणाची सेटलमेंट; वरळी पोलिस स्टेशनमध्ये आलेला ‘तो’ व्यक्ती कोण?

सायबर चोरट्यांना बँक खाते वापरण्यास देणाऱ्याला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
4

सायबर चोरट्यांना बँक खाते वापरण्यास देणाऱ्याला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.