Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar Crime : चाकू हल्ला प्रकरणात आता ATS ची एन्ट्री, आरोपीच्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती उघड

जीवघेण्या चाकू हल्ल्याच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, या प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र ATS ने प्रवेश केला आहे. आरोपी जैब जुबैर अन्सारी याच्या मोबाईल व इतर डिव्हाइसची तपासणीत नवी माहिती उघड झाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 28, 2026 | 12:29 PM
Mira Bhayandar Crime : चाकू हल्ला प्रकरणात आता ATS ची एन्ट्री, आरोपीच्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती उघड
Follow Us
Follow Us:
  • चाकू हल्ला प्रकरणात आता ATS ची एन्ट्री,
  • आरोपीच्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती उघड
भाईंदर/विजय काते : मीरा रोडच्या नया नगर परिसरात दोन सुरक्षा रक्षकांवर झालेल्या जीवघेण्या चाकू हल्ल्याच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, या प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र अँटी टेररिझम स्क्वॉड (ATS )ने प्रवेश केला आहे. आरोपी जैब जुबैर अन्सारी (वय 31) याच्या मोबाईल व इतर डिव्हाइसची तपासणी करताना काही संशयास्पद सामग्री आढळल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर एटीएसकडून विविध कोनातून तपास सुरू असून, संभाव्य दहशतवादी कनेक्शनच्या दृष्टीनेही चौकशी केली जात आहे.

पहाटेची धक्कादायक घटना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास नया नगर येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत ही घटना घडली. आरोपी जैब अन्सारी हा तेथे पोहोचला आणि ड्युटीवर असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांशी, सुब्रतो सेन आणि राजकुमार मिश्रा यांच्याशी संवाद साधत असताना अचानक त्यांच्यावर चाकूने हल्ला केला.

या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, राजकुमार मिश्रा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे, तर सुब्रतो सेन हे उपचारानंतर धोका टळल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच नया नगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि काही तासांतच आरोपीला अटक करण्यात आली.
ATS कडून सखोल तपासघटनेचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र एटीएसने तपासात सहभाग घेतला आहे.

Mira Bhayander Crime : वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार कोण ? नया नगरमध्ये दोन सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला

आरोपीच्या मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत असून, त्यामध्ये काश्मीरमधील पहलगाम परिसराशी संबंधित काही व्हिडिओ आणि माहिती आढळल्याचे प्राथमिक संकेत मिळाले आहेत. या सामग्रीची सत्यता, स्रोत आणि संभाव्य उद्देश यांची सखोल चौकशी सुरू आहे.
ATS आणि स्थानिक पोलिसांची संयुक्त पथके आरोपीची मानसिक स्थिती, त्याची पार्श्वभूमी, परदेशातील वास्तव्य आणि कोणत्याही संघटनांशी असलेले संभाव्य संबंध या सर्व बाबींची तपासणी करत आहेत.

आरोपीची पार्श्वभूमी
प्राथमिक चौकशीत आरोपी जैब अन्सारी हा उच्च शिक्षित असल्याचे समोर आले आहे. तो सुमारे 2000 साली अमेरिकेत गेला होता आणि 2019 मध्ये भारतात परतला. त्यानंतर तो मीरा रोड परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती आहे. हल्ल्याच्या दिवशी तो अचानक घटनास्थळी पोहोचला आणि काही वेळ संवाद साधल्यानंतर त्याने हल्ला केल्याचे सांगितले जाते.काही सूत्रांच्या मते, आरोपीने हल्ल्यापूर्वी धर्माशी संबंधित प्रश्न विचारल्याची माहिती समोर येत असली, तरी याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

न्यायालयीन प्रक्रिया
अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला 8 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात तपास यंत्रणा आरोपीकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत.सर्व अंगांनी तपास सुरूसध्या या प्रकरणाकडे केवळ हल्ला म्हणून नव्हे, तर संभाव्य कट किंवा इतर गंभीर हेतूंच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे. एटीएस आणि पोलीस यंत्रणा सर्व शक्य कोन तपासत असून, लवकरच या प्रकरणातील अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

Mumbai Crime: मुंबई हादरली! वाढदिवसाच्या व्हिडिओसाठी रस्त्यावर लावली आग; कार डीलर पोलिसांच्या ताब्यात

 

Web Title: Mira bhayandar crime ats now enters into knife attack case shocking information revealed from accuseds mobile phone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • crime news
  • mira bhayandar
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Case: एवढं जीवापाड प्रेम करूनही होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला; केतन अग्रवालचा ‘तो’ शेवटचा रोमँटिक Video व्हायरल
1

Ketan Agrawal Case: एवढं जीवापाड प्रेम करूनही होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला; केतन अग्रवालचा ‘तो’ शेवटचा रोमँटिक Video व्हायरल

तीन वर्षे शारीरिक संबंध, मारहाण अन्…; क्रिकेटपटू Abhishek Porel कायद्याच्या कचाट्यात, गंभीर प्रकरण काय?
2

तीन वर्षे शारीरिक संबंध, मारहाण अन्…; क्रिकेटपटू Abhishek Porel कायद्याच्या कचाट्यात, गंभीर प्रकरण काय?

Delhi : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, लैंगिक अत्याचारानंतर चिमुकलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा एनकाउंटर
3

Delhi : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, लैंगिक अत्याचारानंतर चिमुकलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा एनकाउंटर

Hit and Run Case : नागपुरात ‘हिट अँड रन’; दोघांचा मृत्यू, अपघातानंतर चालक पसार
4

Hit and Run Case : नागपुरात ‘हिट अँड रन’; दोघांचा मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.