Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander Crime : मानसिक छळ आणि धर्मांतरासाठी जबरदस्ती; मिरा-भाईंदरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार समोर

Mira Bhayander Crime : प्रेमविवाहानंतर पतीने आपले खरे नाव आणि धर्म लपवून विवाह केल्याचा तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकत अनेक वर्षे मानसिक व शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला असून या प्रकरणी भाईंदरमधील नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 23, 2026 | 02:30 PM
mira bhayander crime

mira bhayander crime

Follow Us
Follow Us:
  • मानसिक छळ आणि धर्मांतरासाठी जबरदस्ती
  • मिरा-भाईंदरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार समोर
मिरा-भाईंदर / विजय काते : प्रेमविवाहानंतर पतीने आपले खरे नाव आणि धर्म लपवून विवाह केल्याचा तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकत अनेक वर्षे मानसिक व शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला असून या प्रकरणी भाईंदरमधील नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनंतर आरोपी फरार असल्याचे सांगितले जात असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव परिसरात राहणाऱ्या प्रतिमा मल्हार यांनी सुमारे १६ वर्षांपूर्वी “मनोज” नाव सांगणाऱ्या व्यक्तीसोबत प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर काही वर्षांनी दाम्पत्याला मुलगाही झाला. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे सांगितले जात असताना, लग्नानंतर सुमारे तीन वर्षांनी पतीचे खरे नाव “नूर आलम” असल्याची माहिती मिळाल्याचा दावा महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे.

तक्रारीनुसार, पतीची खरी ओळख समोर आल्यानंतर घरात वाद वाढू लागले. आरोपीने वारंवार धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला तसेच विरोध केल्यास मारहाण, मानसिक त्रास आणि धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेने पुढे असा दावा केला आहे की, सातत्याने होणाऱ्या दबावामुळे आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे अखेर तिने धर्मांतर करून “नसरीन आलम” हे नाव स्वीकारले.महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीकडे असलेल्या बहुतांश ओळखपत्रे आणि कागदपत्रांवर “मनोज” हे नाव नमूद होते. मात्र, व्होटर आयडीवरील “नूर” या नावामुळे संशय निर्माण झाला आणि त्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.याशिवाय, आरोपीकडून अनेक वर्षे मानसिक छळ करण्यात आला असून काही काळापासून त्याने “तू तुझं बघ” असे सांगत पत्नी व कुटुंबापासून दुरावा ठेवल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपी सध्या फरार असल्याची माहिती समोर आली असून भाईंदरमधील राहते घर ईएमआयवर घेतल्याचेही सांगितले जात आहे.

बारामती पोलिसांकडून आंतरराज्यीय गांजा तस्करीचा पर्दाफाश, सात आरोपी जेरबंद; तब्बल…

दरम्यान, महिलेच्या तक्रारीवरून नवघर पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून विवाहाच्या वेळी ओळख लपवणे, धर्मांतरासाठी दबाव आणि कौटुंबिक छळ यांसारख्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नमूद केलेले आरोप हे तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार असून त्याबाबत आरोपीची बाजू अद्याप समोर आलेली नाही. प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष पोलिस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे.

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत मुलगी बेपत्ता, न्याय मागण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांवरच पोलिसांचा गुन्हा

 

Web Title: Mira bhayander mental torture and forced conversion shocking form of love jihad exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • crime news
  • Marathi News
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

शाळेतील वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला, चोपातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
1

शाळेतील वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला, चोपातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

Electric Car Servicing: सर्व्हिसिंगचा खर्च पाहून डोकं फिरलं! पठ्ठ्याने घरीच दुरुस्त केली EV कारची बॅटरी
2

Electric Car Servicing: सर्व्हिसिंगचा खर्च पाहून डोकं फिरलं! पठ्ठ्याने घरीच दुरुस्त केली EV कारची बॅटरी

Karga Tinkle Gongo: ‘आता आम्ही इंडिया….!’ ४ वर्षांच्या ट्विंकलचा क्यूट Video व्हायरल, वेधलं सगळ्यांचं लक्ष
3

Karga Tinkle Gongo: ‘आता आम्ही इंडिया….!’ ४ वर्षांच्या ट्विंकलचा क्यूट Video व्हायरल, वेधलं सगळ्यांचं लक्ष

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?
4

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.