Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: मुंबई हादरली! पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटरवर पतीने पत्नीचा दगडाने ठेचून केला खून

मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर पतीने पत्नीची दगडाने गळा ठेचून हत्या केली. दारूच्या नशेत दोघांमध्ये झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर ही घटना घडली. पोलिसांनी तात्काळ आरोपी पतीला अटक केली असून हत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 15, 2026 | 09:26 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ओशिवरा पोलीस ठाण्याजवळ पतीने पत्नीची दगडाने निर्घृण हत्या केली.
  • दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर आरोपीने टोकाचे पाऊल उचलले.
  • पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून अटक करून पुढील तपास सुरू केला.
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे आहे. ओशिवरा पोलीस स्टेशनच्या अवघ्या १०० मीटर अंतरावरील सिग्नलवर एका पतीने आपल्या पत्नीची दगडाने गळा ठेचून निर्घृण हत्या केली. थेट पोलीस स्टेशनच्या शेजारीच हा प्रकार घडल्यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

काय घडलं नेमकं?

घडलेली घटना अंधेरी पश्चिम परिसरात घडली आहे. मृत महिला आणि तिचा पती हे दोघे ओशिवरा पोलीस स्टेशनच्या जवळील सिग्नलवर रस्त्यावर भीक मागून आपला उदर्निर्वाह करत होते. मंगळवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास दोघेही दारूच्या नशेत होते. याच दरम्यान दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून जोरदार भांडण सुरु झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात पतीने रस्त्याशेजारी असलेला मोठा दगड उचलला आणि थेट पत्नीच्या गळ्यावर आणि डोक्यावर प्रहार करत तिला जागेवरच ठेचून हत्या केली.

मोठी बातमी ! पुण्यात ATS कडून 65 ठिकाणांवर छापेमारीची कारवाई; तब्बल 50 जणांची पोलिसांकडून चौकशी

आरोपीला अटक

पोलीस स्टेशनच्या अगदी जवळच हा प्रकार घडल्याने घटनेची माहिती मिळताच ओशिवरा पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला ताब्यात घेऊन तात्काळ कपूर रुग्णालयात उपचारासाठी पाठवले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी पतीला घटनास्थळावरून अटक केली आहे. हत्या करणाऱ्या आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

‘एका महिन्यात 50% परतावा’… या एका आमिषाने गमावले तब्बल 1 कोटी रुपये!

एका महिन्यात 50 टक्के परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत मित्राच्या माध्यमातून एका व्यक्तीची तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. ट्रेड प्रॉफिट योजनेच्या नावाखाली आरोपींनी विश्वास संपादन करून रोख रक्कम स्वीकारली आणि काही क्षणांतच ते पसार झाले. या प्रकरणी एल.टी. मार्ग पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मोहोसिन मुलानी यांचा मित्र अदनान इनामदार याने त्यांना ट्रेड प्रॉफिट योजनेची माहिती दिली. या योजनेत किमान 1 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यास अवघ्या एका महिन्यात 50 टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर इनामदारने मोहोसिन यांची शुभम राजूत याच्यासोबत बोरिवली येथे भेट घडवून आणली. शुभम राजूतसह इतर आरोपींनी विश्वास संपादन करत मोठ्या परताव्याचे आश्वासन दिले.

…आणि छाती दाबणे म्हणजे बलात्काराचा प्रयत्न नाही; पटना हायकोर्टाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाची तीव्र नाराजी

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: अंधेरी पश्चिम, ओशिवरा पोलीस ठाण्याजवळ.

  • Que: पत्नीची हत्या कशी करण्यात आली?

    Ans: दगडाने गळा आणि डोक्यावर वार करून.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी पतीला अटक करून तपास सुरू केला.

Web Title: Mumbai crime mumbai shaken husband bludgeons wife to death with a stone just 100 meters from police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला
2

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
4

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.