Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: प्रियकराने मैत्रिणीच्या केसांची स्तुती केल्याचा राग! प्रेयसीने थेट तिचे केस कापून ‘हेअर नो हेअर’ म्हणत केले चित्रीकरण

वर्सोव्यात प्रियकराने मैत्रिणीच्या केसांची स्तुती केल्याच्या रागातून तरुणीने पीडितेच्या घरी घुसून तिचे केस कापले. या प्रकाराचा व्हिडिओ काढून ‘हेअर नो हेअर’ म्हणत व्हायरलची धमकी दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 27, 2026 | 12:20 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • केसांच्या कौतुकावरून तरुणीवर हल्ला
  • घरात घुसून केस कापले, व्हिडिओ शूट केला
  • ‘हेअर नो हेअर’ म्हणत व्हायरलची धमकी
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने आपल्या मैत्रिणीच्या केसांची स्तुती केल्याचा राग मनात धरून प्रेयसीने आपल्या दोन मैत्रिणींसह घरात घुसून तिचे केस कापल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर या संपूर्ण प्रकाराचे ‘हेअर, नो हेअर’ म्हणत चित्रीकरण केले.या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी आरोपी तरुणींसह तिच्या तीन मैत्रिणीवर २६ मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय तरुणीची ओळख काही काळापूर्वी आरोपी तरुणी आणि तिच्या प्रियकराशी झाली होती. आरोपीचा प्रियकर इंस्टाग्रामवरून पिडीतेच्या संपर्कात होता. संवादादरम्यान त्याने पीडितेच्या केसांचे कौतुक आपल्या प्रेयसीसमोर केले. इतकेच नाही तर, “मी तुझ्या मैत्रिणीला भेटायला जाणार आहे,” असे त्याने सांगितल्याने प्रेयसी प्रचंड संतापली.

Hyderabad Crime: वर्षभर बेपत्ता महिला घरातच पुरलेली, सांगाडा सापडताच खळबळ; नेमकं प्रकरण काय?

घरात घुसले आणि…

७ मार्च रोजी आरोपी तरुणीने पीडितेचा मोबाईल तपासाला होता. पण तेव्हा तिला काहीही संशयास्पद आढळले नव्हते. मात्र, मनात राग धरून तिने २५ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास टोकाचे पाऊल उचलले. आईस्क्रीमची डिलिव्हरी आली असावी, असे वाटून पीडितेने दरवाजा उघडताच प्रेयसीने तिला बाहेर ओढले आणि कात्रीने तिचे केस कापण्यास सुरुवात केली. या प्रकरणाचा व्हिडीओ आरोपीच्या मैत्रिणीने काढले. केस कापल्यानंतर “हेअर, नो हेअर” असे म्हणत हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. इतकेच नाही तर कापलेले काही केस सोबत घेऊन ती तिथून निघून गेली.

गुन्हा दाखल

यावेळी पीडितेने आरडाओरडा केल्याने इमारतीतील नागरिक जमा झाले. मात्र तोपर्यंत प्रेयसी आणि तिच्या मैत्रिणीनं पसार झाल्या होत्या. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून प्रियकर आणि पीडित यांच्यातील संबंधाच्या संशयातून हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी व तिच्या दोन मैत्रिणींनी इमारतीत विनापरवानगी प्रवेश करून हे कृत्य केलं.

Baramati Crime: देवदर्शन ठरलं मृत्यूचं कारण! भररस्त्यात मारहाण करून कारखाली चिरडलं; बारामतीतील घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: हल्ल्याचं कारण काय होतं?

    Ans: प्रियकराने पीडितेच्या केसांची स्तुती केल्याचा राग.

  • Que: घटना कशी घडली?

    Ans: आरोपीने घरात घुसून कात्रीने केस कापले व व्हिडिओ केला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Web Title: Mumbai enraged that her boyfriend praised a female friends hair a woman chopped off her own hair and filmed the act while chanting hair no hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: बापाची चौकशी अन् २४ तासांत पोराला बेड्या! मुंबई लोकल मर्डर प्रकरणातील मारेकरी Roshan Suvarna पोलिसांच्या जाळ्यात
1

Mumbai Crime: बापाची चौकशी अन् २४ तासांत पोराला बेड्या! मुंबई लोकल मर्डर प्रकरणातील मारेकरी Roshan Suvarna पोलिसांच्या जाळ्यात

Kalyan Crime: अल्पवयीन मुली सुरक्षित नाहीत? पुन्हा 7 वर्षीय चिमुरडीवर 55 वर्षाच्या नराधमांकडून बलात्कार
2

Kalyan Crime: अल्पवयीन मुली सुरक्षित नाहीत? पुन्हा 7 वर्षीय चिमुरडीवर 55 वर्षाच्या नराधमांकडून बलात्कार

VIRAR : मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये तरुणाची हत्या, धारदार चाकूने वार करत पाडला रक्ताचा सडा
3

VIRAR : मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये तरुणाची हत्या, धारदार चाकूने वार करत पाडला रक्ताचा सडा

Jaipur Crime News: आत्या बेपत्ता अन् भाचा शोध घेत होता… पण सत्य समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला
4

Jaipur Crime News: आत्या बेपत्ता अन् भाचा शोध घेत होता… पण सत्य समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.