Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: पत्नीशी वादानंतर पतीने घर पेटवलं; पत्नी वाचली मात्र तीन पाळीव मांजरांचा होरपळून मृत्यू

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात पत्नीशी झालेल्या वादाच्या रागातून एका पतीने घराला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत घरातील संपूर्ण संसार जळून खाक झाला, तर तीन पाळीव मांजरांचा होरपळून मृत्यू झाला. आरोपीविरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 12, 2026 | 11:08 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पत्नीशी झालेल्या कौटुंबिक वादानंतर पतीने संतापाच्या भरात घराला आग लावली.
  • आगीत घरातील सर्व गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले आणि तीन पाळीव मांजरांचा मृत्यू झाला.
  • आरोपी पतीविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
पुणे : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातून कौटुंबिक वादाचे भीषण रूप समोर आले आहे. पत्नीशी झालेल्या वादाच्या संतापातून एका पतीने स्वतःच्याच घराला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत घरातील संपूर्ण संसार जळून खाक झाला, तर तीन निष्पाप पाळीव मांजरांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Gujrat News: गिरनारमध्ये सिंहाचा थरार! गर्दीतून सिंहाने 11 वर्षीय मुलाला उचलून नेलं; हल्ल्यात मृत्यू

काय घडलं नेमकं?

आरोपीचं नाव दयानंद आनंता कसबे (वय ३८) असे आहे. तर मोहिनी दयानंद कसबे (वय ३६, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रस्ता) असे फिर्याद देणार्या आणि आरोपीच्या पत्नीचा नाव आहे. आरोपी दयानंद याची एका अनोळखी महिलेशी असलेली मैत्री फिर्यादी पत्नीला मान्य नव्हती. या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये सतत खटके उडत होते. मोहिनीच्या मुलाने वडिलांना संबंधित महिलेशी बोलताना पाहिले आणि ही गोष्ट आपल्या आईला म्हणजेच मोहिनीला सांगितली. त्यानंतर पत्नीने त्या महिलेला जाब विचारला असता, संबंधित महिलेने आरोपी दयानंदला फोन करून या प्रकाराबाबत सुनावले.

महिला वाचली पण…

याच प्रकरणाचा राग मनात धरून ९ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पती-पत्नीमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. यावेळी संतापाच्या भरात दयानंदने घरातील साहित्याला आग लावली. आग भडकल्याचे पाहताच मोहिनीने जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळ काढला, ज्यामुळे ती सुदैवाने बचावली. मात्र, या भीषण आगीत घरातील सर्व संसार जळून भस्मसात झाला आणि निष्पाप तीन पाळीव मांजरांचा होरपळून मृत्यू झाला. आग लावल्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून पसार झाला आहे.

पोलीस तपास सुरु

या प्रकरणी मोहिनी दयानंद कसबे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आग लावल्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून पसार झाला असून, पर्वती पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांकडून सध्या या घटनेची चौकशी केली जात आहे.

Ghaziabad Crime News: बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये 7 वर्षीय चिमुरडीचा मृतदेह; हत्येपूर्वी…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील सावित्रीबाई फुले वसाहतीत.

  • Que: आग लावण्यामागील कारण काय होते?

    Ans: पत्नीशी झालेला कौटुंबिक वाद आणि एका महिलेच्या मैत्रीवरून निर्माण झालेला राग.

  • Que: या घटनेत काय नुकसान झाले?

    Ans: घरातील संपूर्ण संसार जळून खाक झाला आणि तीन पाळीव मांजरांचा होरपळून मृत्यू झाला.

Web Title: Pune crime news husband sets house on fire after argument with wife wife survives but three pet cats burn to death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pune Crime News: ३ वर्षांपासून फरार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात!; मॉडर्न कॉलेज परिसरातून अभिषेक काळेला ठोकल्या बेड्या
1

Pune Crime News: ३ वर्षांपासून फरार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात!; मॉडर्न कॉलेज परिसरातून अभिषेक काळेला ठोकल्या बेड्या

पोलिस ठाण्यात बोलावून दुकानदाराला दिला त्रास, गुन्ह्याची धमकी देत उकळली खंडणी; पुण्यात खळबळ
2

पोलिस ठाण्यात बोलावून दुकानदाराला दिला त्रास, गुन्ह्याची धमकी देत उकळली खंडणी; पुण्यात खळबळ

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा
4

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.