Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: बीडमध्ये मध्यरात्री थरार! किरकोळ वादातून 21 वर्षीय तरुणाचा चाकूने निर्घृण खून

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे किरकोळ वादातून 21 वर्षीय ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे याची धारदार चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात त्याचा एक मित्र गंभीर जखमी झाला, तर दुसऱ्याने पळ काढून जीव वाचवला. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 12, 2026 | 11:49 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घाटनांदूरच्या साठे चौकात किरकोळ वादातून 21 वर्षीय ज्ञानेश्वर वाकडेचा चाकूने खून.
  • हल्ल्यात एक मित्र गंभीर जखमी, तर दुसरा मित्र घटनास्थळावरून पळून बचावला.
  • अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
बीड: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे मध्यरात्री किरकोळ वादाचे रूपांतर रक्तरंजित हत्याकांडात झाले. साठे चौकात काही जणांनी 21 वर्षीय ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे याच्यावर धारदार चाकूने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केली. या हल्ल्यात त्याचा एक मित्र गंभीर जखमी झाला असून, दुसऱ्या मित्राने प्रसंगावधान राखत घटनास्थळावरून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Pune Crime News: पत्नीशी वादानंतर पतीने घर पेटवलं; पत्नी वाचली मात्र तीन पाळीव मांजरांचा होरपळून मृत्यू

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव ज्ञानेश्वर वाकडे असे आहे. गेल्या एक वर्षांपासून लातूर जवळील हायवेवर एका हॉटेलमध्ये ‘कूक’ म्हणून काम करत होता. शनिवारी (११ जुलै) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर हा अंबाजोगाईवरून घाटनांदूरच्या दिशेने स्वतःच्या बाईकवरून जात होता. या प्रवासादरम्यान त्याच्यासोबत त्याचे इतर दोन मित्रही मोटारसायकलवर स्वार होते. ते घटनांदूर येथील साठे चौकात पोहोचले असता, तिथे उपस्थित असलेल्या काही जणांसोबत त्याची कोणत्यातरी कारणावरून बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला आणि आरोपींनी आपल्याजवळील धारदार चाकू काढून ज्ञानेश्वरवर एकापाठोपाठ एक सपासप वार केले. यात ज्ञानेश्वरचा घटनास्थळीच जागीच मृत्यू झाला.

एक मित्र बचावले आणि…

यावेळी ज्ञानेश्वरसोबत असलेल्या दोन मित्रांपैकी एकाने प्रसंगावधान राखले. त्याने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला त्यामुळे तो या जीवघेण्या हल्ल्यातून सुदैवाने बचावला आहे. मात्र, त्यांचा दुसरा मित्र या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून मृत ज्ञानेश्वरचा मृतदेहही शवविच्छेदनासाठी याच रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.

आमच्या पाहुण्याला कामावर का नेतोस? म्हणत कात्रीने दात पाडले, डोकं फोडले आणि…

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात किरकोळ कारणावरून मुकादमावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मजुराला कामावर घेऊन जात असल्याच्या कारणावरून झालेला वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने मुकादमाला कात्रीने मारहाण केली, त्याचे दात पाडले आणि जमिनीवर आपटून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

आधी बिर्याणी खाल्ली आणि मग १७ वर्षीय प्रेयसीची केली हत्या, १२ वेळा चाकूने वार अन्… प्रश्नपत्रिकेच्या मदतीने प्रियकराला अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: घाटनांदूर, ता. अंबाजोगाई, जि. बीड.

  • Que: या हल्ल्यात आणखी काय घडले?

    Ans: एक मित्र गंभीर जखमी झाला, तर दुसऱ्याने पळ काढून जीव वाचवला.

Web Title: Beed crime midnight terror in beed 21 year old youth brutally stabbed to death following a minor dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Navarashtra Impact: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर कारवाई
1

Navarashtra Impact: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर कारवाई

Navi Mumbai Crime: प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले; तुर्भे सेक्टर 19 मधील बांधकाम साईट सील
2

Navi Mumbai Crime: प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले; तुर्भे सेक्टर 19 मधील बांधकाम साईट सील

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ
3

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
4

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.