(फोटो सौजन्य: Pinterest)
मुलांनी उघड केलं सत्य
महिलेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन कुटुंबियांची चाैकशी करण्यास सुरुवात केली. यात ५ ते ७ वर्षांच्या भावा-बहिणीचीही चाैकशी करण्यात आली. आईच्या मृत्यूने मुलं इतकी घाबरली होती की सुरुवातीला त्यांनी पोलिसांना खोटी माहिती सांगितली. चाैकशीत ७ वर्षांची मुलगी आणि ५ वर्षांच्या मुलाने पोलिसांना सुरुवातील सांगितलं की, आदल्या रात्री एक अनोळखी माणूस त्यांच्या आईला दारूच्या नशेत घरी सोडून गेला होता . सकाळी जेव्हा ते घरी आले, तेव्हा त्यांची आई मृत अवस्थेत होती. मुलांच्या या वक्तव्यामुळे सुरुवातीलाच पोलिसांना प्रकरणात काहीतरी संशयास्पद वाटले.
पोलिसांनी या संशयाच्या आधारावरच पुन्हा एकदा सावधानी आणि संवेदनशील पद्धतीत दोन्ही मुलांची चाैकशी केली. पोलिसांनी त्यांना धीर दिला आणि सामंज्यास्याने समजावत त्यांच्याकडून सर्व खरं बाहेर काढण्यात आलं. यावेळी मुलांनी आईच्या हत्येची खरी कहाणी सांगितली. त्यांनी म्हटले की, त्यांचे वडील बन्शिलाल कोरकू यांनी त्यांच्या आईला मारहाण केली होती आणि त्यांना खोटे बोलण्यासाठी धमकावले होते. मुलांचा हा जबाब आणि काही अन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आपला तपास सुरुच ठेवला आणि नंतर आरोपी पतीला अटक केली.
पतीला मिळाली पोलीस कोठडीची शिक्षा
पोलीस अधीक्षक अमित कुमार मिश्रा यांनी सांगितले की, मुलांकडून मिळालेल्या माहिती आणि पुराव्यांच्या आधारे हे स्पष्ट झालं की, महिलेची हत्या पती बंशीलाल कोरकू याने केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात आरोपीला दोषी ठरवण्यात आलं असून त्याला न्यायालयीन कोठडीची शिक्षा ठोठावण्यात आली.






