काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील मध्यप्रदेश येथील १६ वर्षीय मुलगा अरेबिक आणि उर्दू भाषा शिकण्यासाठी ताजबाग येथील तोहित नगरमधील गौसिया कॉलनीत असलेल्या मदरसात आला होता. तो येथील वसतिगृहात इतर मुलांसोबत राहत होता. (Nagpur Crime) पहाटे ३ वाजताच्या सुमारास आरोपी शिक्षित अताय रसूल हा मुलांच्या वसतिगृहात शिरला. तिथे गाढ झोपेत असलेल्या पीडित मुलाचा त्याने विनयभंग केला. जेव्हा या मुलाने दचकून जागा झाला आणि याला तीव्र प्रतिकार केला. आरोपीने त्याला जीवे मारण्याची आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. पीडित मुलाला धमकावल्यानंतर त्याच्या शेजारीच झोपलेल्या दुसऱ्या एका निष्पाप मुलासोबतही असाच विकृत प्रकार केला. (Nagpur Crime)
अॅनेस्थेशियाचा ओव्हरडोज घेत नागपुरात डॉक्टरची आत्महत्या; रात्री ड्युटी केली अन् सकाळी जीवन संपवलं
पीडित मुलाने दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित मुलाने रात्री घडलेला सर्व प्रसंग मदरसा व्यवस्थापकाच्या कानावर घातला. व्यवस्थापकाने तात्काळ अताय रसूल याला बोलावून त्याची कडक शब्दांत कानउघाडणी केली. मात्र, या प्रकरणाची पोलीस तक्रार होणार असल्याचे समजताच आरोपी मदरसा सोडून तिथून पळ काढला.(Nagpur Crime)
तब्बल १० मुलांवर अत्याचार
या प्रकरणी पीडित मुलाच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी तातडीने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच ‘पोक्सो’ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांच्या तपासात मदरसात राहणाऱ्या १० मुलांवर आरोपी अताय रसूल याने अशाच पद्धतीने लैंगिक शोषण केल्याचे समोर आले. पोलीस आरोपीचा शोध घेत असून त्याला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Nagpur Crime)
नदीच्या खोलीचा अंदाज चुकला अन् होत्याचं नव्हतं झालं; बाप-लेकासह तिघांचा नदीत बुडून मृत्यू
नागपूर येथून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पिकनिकचा आनंद घ्यायला गेलेल्या ३ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा धक्कादायक प्रकार नागपूरच्या ग्रामीण विभागातील कन्हान नदीच्या महगादेव घाट परिसरात घडला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केले जात आहे.
Ans: ही घटना नागपूर शहरातील ताजबाग परिसरातील मदरशात घडली.
Ans: आरोपी शिक्षकाचे नाव अताय रसूल ऊर्फ तालिफ असे आहे.
Ans: सक्करदरा पोलिसांनी आरोपीवर POCSO आणि BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.






