Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: भीषण प्रकार! जळत्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; स्त्री-पुरुष ओळखणंही कठीण

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी परिसरात एका शेतातील जळत्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्धवट जळालेला मानवी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह इतका जळाला होता की स्त्री-पुरुष ओळखणेही कठीण झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून डीएनए तपासणीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 28, 2026 | 09:20 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पारशिवनीतील शेतात जळत्या कचऱ्यात मानवी मृतदेह आढळला.
  • मृतदेह अर्धवट जळाल्याने ओळख पटवणे कठीण झाले आहे.
  • हत्या, आत्महत्या किंवा अपघात या सर्व शक्यतांवर पोलिसांचा तपास सुरू.
नागपूर: नागपूर जिल्ह्यातून एक भीषण प्रकार समोर आला आहे. एका शेतातील जळत्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. मृतदेह एवढा जळाला की स्त्री-पुरुष ओळखणंही कठीण झाले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना पारशिवनी परिसरातील आहे.

काय घडलं नेमकं?

पारशिवनी परिसरातील एका शेतामध्ये कचऱ्याला आग लागल्याचे समोर आले होते. या जळत्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून अचानक प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे लक्ष तिथे गेले. नागरिकांनी जळत्या कचऱ्याच्या जवळ जाऊन पाहिले तेव्हा तिथे एक मानवी मृतदेह जळत असल्याचे दिसले. हे बघून नागरिकांमध्ये खळबळ उडाली. तातडीने याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

Beed Crime: केजमध्ये अमानुषतेचा कळस! अत्याचारपीडित अल्पवयीन मुलीला रुग्णालयात 10 तास, पोलीस ठाण्यात रात्रभर ताटकळत ठेवले

स्त्री-पुरुष ओळखणंही कठीण

या घटनेची माहिती पारशिवनी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. कचऱ्यामध्ये हा मृतदेह इतक्या वाईट रीतीने जळाला आहे की, मृत व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हे ओळखणेही कठीण झाले आहे. मृत व्यक्तीचे वय ५० ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांना घटनास्थळी कोणतेही ओळखपत्र, संशयास्पद साहित्य अथवा पुरावे सापडलेले नाहीत. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पुढील टप्प्यात डीएनए तपासणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हत्या आहे की आत्महत्या?

पोलीस आता या घटनेचा तपास करत असून आत्महत्या आहे की हत्या? हत्या असेल तर कोणी केली, या मागचं कारण काय? अश्या सगळ्या बाजूंनी पारशिवनी पोलीस तपास करत आहे. या घटने परिसरात खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आला आहे.

Chandigarh Crime: ‘धुरंधर’च्या प्रॉडक्शन डिझायनरवर गंभीर आरोप, आरोपीची जामिनावर सुटका; काय नेमकं प्रकरण?

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृतदेह कुठे आढळला?

    Ans: नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी परिसरातील एका शेतातील जळत्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मृतदेह आढळला.

  • Que: मृतदेहाची ओळख का पटू शकली नाही?

    Ans: मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाल्यामुळे तो स्त्री आहे की पुरुष हेही ओळखणे कठीण झाले.

  • Que: पोलिसांकडून पुढे कोणती कारवाई केली जात आहे?

    Ans: पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून डीएनए तपासणीसह विविध अंगांनी तपास सुरू केला आहे.

Web Title: Nagpur crime horrific incident partially burnt body found in a burning pile of garbage gender indistinguishable

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur

संबंधित बातम्या

Nagpur News: तिरंगा फडकवणे गुन्हा झालाय का? Abhijeet Dipke यांचा मोदी सरकारवर संताप
1

Nagpur News: तिरंगा फडकवणे गुन्हा झालाय का? Abhijeet Dipke यांचा मोदी सरकारवर संताप

Nagpur News: नागपुरात भाजपाला दिलासा! अनिल सोले यांचा उमेदवारांना पाठिंबा
2

Nagpur News: नागपुरात भाजपाला दिलासा! अनिल सोले यांचा उमेदवारांना पाठिंबा

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
4

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.