Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: नदीच्या खोलीचा अंदाज चुकला अन् होत्याचं नव्हतं झालं; बाप-लेकासह तिघांचा नदीत बुडून मृत्यू

नागपूर ग्रामीणमधील कन्हान नदीच्या महादेव घाट परिसरात पिकनिकसाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. 6 वर्षीय मुलगा पाण्यात बुडताना दिसताच त्याला वाचवण्यासाठी वडील आणि मित्र नदीत उतरले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघांचाही मृत्यू झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 08, 2026 | 09:44 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कन्हान नदीत बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू.
  • मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील आणि मित्रही बुडाले.
  • घटनेनंतर परिसरात शोककळा; पोलिसांकडून तपास सुरू.
नागपूर: नागपूर येथून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पिकनिकचा आनंद घ्यायला गेलेल्या ३ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा धक्कादायक प्रकार नागपूरच्या ग्रामीण विभागातील कन्हान नदीच्या महगादेव घाट परिसरात घडला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केले जात आहे.

काय घडलं नेमकं?

या दुर्दैवी घटनेत रोहित कैलास नागदेवे (वय 33), गौतम राजकुमार अंबादे (वय 31) आणि मुलगा चैतन्य गौतम अंबादे (वय 6) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. चैतन्य हा पाण्यात बुडत होता त्यावेळी त्याचे वडील गौतम अंबादे यांनी नदीकडे तातडीने धाव घेतली. त्यावेळी रोहित नागदेवे यांनी देखील त्या मुलाला वाचवण्यासाठी नदीत उतरले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडू लागले आणि त्यांचा मृत्यू झाला.

Mumbai Crime: मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई! ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक

तपास सुरू

या दुर्दैवी घटनेची माहिती पोलिसाना देण्यात आली. अथक प्रयत्नांतून तिघांनाही नदीतून बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अकस्मात निधन असल्याचे सांगत, प्रकरण तपास सुरू ठेवला आहे.

NEET विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर नवा ट्विस्ट; सुसाईड नोटवरून पोलिसांच्याच भूमिकेवर संशय

देशभरात गाजलेल्या ‘नीट’ पेपरफुटी आणि फेरपरीक्षेच्या वादात नागपूरमधील 19 वर्षीय विद्यार्थिनी आकांक्षा चतुर्वेदीच्या आत्महत्येने मोठी खळबळ उडवली होती. मात्र आता या प्रकरणाला आणखी धक्कादायक वळण मिळाले आहे. आकांक्षाने लिहिलेल्या सुसाईड नोटवरून नागपूर पोलिसांच्या तपासातील गंभीर त्रुटी समोर आल्या असून, ही नोट अनेक दिवस लपवून ठेवण्यात आली होती का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात तपास अधिकाऱ्यावरच वरिष्ठांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने संपूर्ण प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.

२० मे रोजी आकांक्षाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर पोस्ट करून एनडीए (NTA) आणि सरकारवर टीका केली होती. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली असता, पोलिसांनी “अशी कोणतीही सुसाईड नोट आमच्याकडे नाही, ती असल्यास चतुर्वेदी कुटुंबाने पोलिसांकडे सुपूर्द करावी,” अशी तोंडी माहिती दिली होती. चार जूनपर्यंत पोलिसांनी हाच दावा केला होता.

मात्र आता ही सुसाईड नोट पहिल्याच दिवसापासून तपास अधिकारी निखिल तव्हाणे यांच्याकडे होती. त्यांनी स्टेशन डायरीमध्ये आणि आत्महत्येशी संबंधित कागदपत्रांमध्ये या सुसाईड नोटची नोंदच केली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी हयगय केल्याचा आरोप करत निखिल तव्हाणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.

Sangli Crime: डोक्यात मारहाण करून हत्या, नंतर अपघाताचा बनाव, मेहुण्यानेच दिली भाऊजींची सुपारी; कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना नागपूर ग्रामीणमधील कन्हान नदीच्या महादेव घाट परिसरात घडली.

  • Que: मृतांमध्ये कोणाचा समावेश आहे?

    Ans: रोहित नागदेवे, गौतम अंबादे आणि 6 वर्षीय चैतन्य अंबादे यांचा मृत्यू झाला.

  • Que: दुर्घटना कशी घडली?

    Ans: मुलगा पाण्यात बुडताना दिसल्याने त्याला वाचवण्यासाठी दोघे नदीत उतरले, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले.

Web Title: Nagpur crime misjudging the rivers depth led to tragedy three people including a father and son drowned

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Sonam Raghuvanshi: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सोनम रघुवंशीचा जामीन रद्द, 3 आठवड्यांत सरेंडरचे निर्देश
1

Sonam Raghuvanshi: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सोनम रघुवंशीचा जामीन रद्द, 3 आठवड्यांत सरेंडरचे निर्देश

Chhatrapati Sambhajinagar Crime: 100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: 100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव

Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला; जळगावातील गूढ मृत्यूने खळबळ
3

Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला; जळगावातील गूढ मृत्यूने खळबळ

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण
4

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.