Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime : सीवूड हत्या प्रकरणाचा २४ तासांत छडा; भिवंडीतून आरोपीला अटक, लाकडी दांडक्याने हत्या केल्याची कबुली

नवी मुंबईतील सीवूड हत्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. भिवंडीतून आरोपीला अटक करण्यात आली असून, दारूच्या नशेत झालेल्या शिवीगाळ आणि धक्काबुक्कीतून वाद वाढल्याने लाकडी दांडक्याने डोक्यावर वार करून हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 18, 2026 | 02:57 PM
सीवूड हत्या प्रकरणाचा २४ तासांत छडा; भिवंडीतून आरोपीला अटक, लाकडी दांडक्याने हत्या केल्याची कबुली

सीवूड हत्या प्रकरणाचा २४ तासांत छडा; भिवंडीतून आरोपीला अटक, लाकडी दांडक्याने हत्या केल्याची कबुली

Follow Us
Follow Us:
  • सीवूड हत्या प्रकरण २४ तासांत उघड
  • भिवंडीतून आरोपीला अटक
  • दारूच्या नशेत शिवीगाळ व धक्काबुक्कीतून वाद
  • लाकडी दांडक्याने डोक्यात वार करून हत्या केल्याची कबुली
सावन वैश्य, नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड येथून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सीवूड सेक्टर-१५ येथील डीमार्टलगत बेलापूर येथील आरुष हॉटेल समोर अज्ञात तरुणाची डोक्यात वार करून झालेल्या हत्येचा गुन्हा नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष-२ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणी भिवंडी येथून मोहम्मद इरफान मोहम्मद हुसेन अन्सारी (वय ३६) याला अटक करण्यात आली असून, दारू पिताना झालेल्या वादातून लाकडी दांडक्याने डोक्यात वार करून हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.

Nilanga Murder : शेतीच्या वादातून चुलत्याचा निघृण खून; दगड व काठीने मारहाण करुन जागेवरच संपवलं

एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला मृताची ओळख पटलेली नव्हती. गुन्हे शाखा कक्ष-२ ने समांतर तपास सुरू ठेवत तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे मृताची ओळख सलमान अन्वर शेख (रा. गोवंडी, मुंबई) अशी निश्चित केली. सलमान शेख हा भंगाराचा व्यवसाय करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

तपासादरम्यान सलमान शेख आणि आरोपी मोहम्मद इरफान अन्सारी हे एकत्र दारू पित असताना दोघांमध्ये शिवीगाळ व धक्काबुक्की झाली होती. या रागातून आरोपीने लाकडी दांडक्याने सलमानच्या डोक्यावर जोरदार प्रहार करून त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने भिवंडी येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पुढील तपासासाठी त्याला एनआरआय सागरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

या कारवाईत गुन्हे शाखा कक्ष-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, विश्वनाथ पांचाळ, लक्ष्मण कोपरकर, राजकुमार दुधाळ, दिनेश जोशी तसेच विनायक गायकवाड, राजेश मोरे, पुरुषोत्तम भोये आणि संतोष तांदळे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि मजबूत गोपनीय माहितीच्या जाळ्याच्या मदतीने अल्पावधीत आरोपीपर्यंत पोहोचत सीवूड व बेलापूर मधील गाजलेल्या हत्या प्रकरणाचा छडा लावला असून, पुढील तपास एनआरआय सागरी पोलीस करीत आहेत.

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! PGमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या; आरोपीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत

Web Title: Seawoods murder case solved in 24 hours accused arrested from bhiwandi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Navi Mumbai News : खाद्यपदार्थांच्या एक्सपायरी डेटमध्ये फेरफार; 75 लाखांचा माल जप्त, दोन आरोपींसह 11 कंपन्यांवर कारवाई
1

Navi Mumbai News : खाद्यपदार्थांच्या एक्सपायरी डेटमध्ये फेरफार; 75 लाखांचा माल जप्त, दोन आरोपींसह 11 कंपन्यांवर कारवाई

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
2

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Mamata Banerjee यांच्या भाचीचा मृत्यू की घातपात? घरात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ, शिक्षक भरती प्रकरणानंतर गेली होती नोकरी
3

Mamata Banerjee यांच्या भाचीचा मृत्यू की घातपात? घरात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ, शिक्षक भरती प्रकरणानंतर गेली होती नोकरी

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
4

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.