
crime (फोटो सौजन्य: social media)
तर काल (1 डिसेंबर) सक्षम ताटे याचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या चार दिवसापूर्वीच त्याच्यासोबत घात झाला. दरम्यान, यावर बोलताना प्रेयसी आंचलने जाड अंतःकरणाने जुन्या आठवणींना उजाळा देत आज तो नाहीये पण त्याच्या आठवणी माझ्या मनात नेहमी राहणार असल्याचे आचलने सांगितले. सोबतच आंचलने काही धक्कादायक माहितीही दिली आहे.
आंचलने केले धक्कदायक खुलासे
सक्षमचा (1 डिसेंबर) रोजी वाढदिवस होता. वाढदीवसानंतर आम्ही पळून जाऊन लग्न करणार होतो. आम्ही जेव्हा जेव्हा पण भेटायचो त्यावेळी मी त्याला लग्नासंदर्भात बोलत होते. आम्ही त्याच्या वाढदिवसानंतर पळून जाऊन लग्न करण्याचे ठरवले होते. मात्र, तो नेहमी माझ्या वडिलांचा कायम आदर करत आपण सर्वांच्या परवानगीने लग्न करू असा विश्वास तो मला देत होता. परंतु जसेच माझ्या घरच्यांना या घटनेबद्दल समजले तसेच त्यांनी विरोध करत घात केला. सक्षम माझ्यासाठी धर्म स्वीकारणार होता. असे धक्कादायक खुलासे सक्षमच्या प्रेयसी आंचलने केले.
आमच्या पोरीपासून दूर राहा…
सक्षमची हत्या होण्याच्या दोन तासाआधी आंचलची आई जयश्री मामीडवार ही सक्षमच्या घरी गेली होती. तिने तिथे जाऊन सक्षमला धमकी दिली आणि आमच्या पोरींपासून दूर राहा, असे सांगितले. यानंतर अवघ्या दोन तासांनी सक्षम ताटे याची आंचल मामीडवार हिच्या वडिलांनी आणि भावांनी हत्या केली.
५ आरोपींना अटक
पोलिसांनी या प्रकरणी वडील गजानन मामीडवार यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जयश्री मदनसिंह ठाकूर,गजानन बालाजीराव मामीलवाड,साहील ठाकूर,सोमाश लखे, वेदांत अशी आरोपींची नावे आहेत. आंचल मामीडवार हिने तिच्या आरोपी वडिलांना आणि दोन्ही भावांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. “माझ्यामुळे त्यांचा मुलगा गेला, आता मी त्यांच्या परिवाराची साथ सोडणार नाही,” असा निर्धार आचलने व्यक्त केला आहे. सक्षमच्या आईनेही आचलला आपली मुलगी मानून तिचा स्वीकार केला.
Pune Crime: धक्कादायक!अनैतिक संबंधाच्या संशयातून चुलत भावाची सुपारी देऊन हत्या; पुण्यातील प्रकरण
Ans: आंतरजातीय प्रेमसंबंधांना आंचलच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे तिच्या वडिलांनी व भावांनी मिळून सक्षमचा खून केल्याचा आरोप आहे.
Ans: दोघेही गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते.
Ans: प्रेयसी आंचलने स्वतः सांगितले की तो तिच्यासाठी धर्म स्वीकारण्यासाठी तयार होता.