Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: सुवर्णपदक जिंकून दोनच दिवस झाले होते; 24 वर्षीय पॅरा ॲथलीटचा गोळ्या झाडून खून

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये 24 वर्षीय पॅरा ॲथलीट चिराग त्यागी याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एशियन गेम्ससाठी निवड झालेल्या चिरागने नुकतेच राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. सहकारी खेळाडू यश खटीकने जुन्या वादातून बदला घेण्यासाठी हत्या केल्याची कबुली दिली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 31, 2026 | 02:56 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पॅरा एशियन गेम्ससाठी निवड झालेल्या चिराग त्यागीची गोळ्या झाडून हत्या.
  • सहकारी पॅरा खेळाडू यश खटीकला अटक; त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
  • कागदपत्र पडताळणीतील तक्रारीमुळे करिअर बुडाल्याच्या रागातून हत्येचा कट रचल्याचा आरोप.
उत्तरप्रदेश: देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका होतकरू पॅरा ॲथलीटचा प्रवास दुर्दैवीरीत्या संपला आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून अवघ्या दोनच दिवसांत 24 वर्षीय पॅरा खेळाडू चिराग त्यागी याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

काय घडलं नेमकं?

गाझियाबादमधील साई कुंज परिसरात चिराग त्यागी याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक तपासात चिरागवर अगदी जवळून गोळी झाडण्यात आल्याचे समोर आले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यश खटिक असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

Hyderabad : 4 दिवस मृत मुलासोबत राहत होते अंध आई-वडिल, दुर्गंधी येताच सत्य झालं उघड; पोलिसांकडून तपास सुरु

का केली हत्या?

चिरागची हत्या करणारा आरोपी यश खटीक हा दुसरा कोणी नसून त्याचाच एक जुना सहकारी पॅरा ऑलिम्पिक खेळाडू निघाला. हे दोघेही ‘ब्लाइंड कॅटेगरी’ (दृष्टीहीन प्रवर्ग) अंतर्गत ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये एकत्र सराव करायचे. चौकशीत यशने सांगितले की, काही काळापूर्वी कागदपत्रांच्या पडताळणीदरम्यान चिरागने यशविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमुळे यशचे क्वालिफिकेशन रद्द झाले आणि त्याला क्रीडा स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. याच अपमानाचा आणि करिअर उद्ध्वस्त झाल्याचा बदला घेण्यासाठी यशने पिस्तुलची व्यवस्था केली आणि संधी साधून चिरागचा हत्या केली.

पोलीस तपास सुरु

पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून तसेच या गुन्ह्यात यशसोबत इतर कोणाचा सहभाग आहे का? याचाही तपास सुरु आहे. कुटुंबियांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरला आहे.

माणुसकीला काळिमा! लग्नाला नकार दिल्याचा राग; झोपेत असलेल्या कुटुंबावर अ‍ॅसिड हल्ला, 4 जण गंभीर

उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला नकार दिल्याने एका व्यक्तीने विवाहित महिलेसह तिच्या संपूर्ण कुटुंबावर रात्री झोपेत असताना ॲसिड फेकून हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात विवाहित महिला तिचा पती आणि दोन निष्पाप लहान मुले गंभीररित्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसाचा पासून सुरु करत आहेत. घडलेली घटना बरेली जिल्ह्यातील शेरगड परिसरात घडली आहे.

Beed Crime: अंतरवाली सराटीतून परतताना भीषण अपघात; उभ्या ट्रकला कारची धडक, इंदापूरच्या मराठा आंदोलकाचा मृत्यू, दोघे गंभीर

💡

Frequently Asked Questions

  • Que: चिराग त्यागी कोण होता?

    Ans: चिराग त्यागी हा 24 वर्षीय पॅरा ॲथलीट असून त्याची पॅरा एशियन गेम्ससाठी निवड झाली होती.

  • Que: हत्येमागील कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: चिरागने केलेल्या तक्रारीमुळे आपले क्वालिफिकेशन रद्द झाल्याचा राग आरोपी यश खटीकच्या मनात होता.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी यश खटीकला ताब्यात घेऊन अटक केली असून हत्येसाठी वापरलेल्या पिस्तुलाचा आणि इतर संभाव्य आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Uttarpradesh crime gold medal would have been awarded for two days 24 year old para athlete shoots blood

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Hyderabad Crime: संतापजनक! 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच काका आणि दोन सावत्र भावांनी केला अत्याचार
1

Hyderabad Crime: संतापजनक! 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच काका आणि दोन सावत्र भावांनी केला अत्याचार

Nashik Crime: आषाढीला फराळ वाटप करून घरी निघाले अन्…; जमिनीच्या वादातून 65 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
2

Nashik Crime: आषाढीला फराळ वाटप करून घरी निघाले अन्…; जमिनीच्या वादातून 65 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

Akola Crime: रक्षकच ठरला भक्षक! लग्नाचे आमिष अन्… पोलिस कर्मचाऱ्याच्या अत्याचाराला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
3

Akola Crime: रक्षकच ठरला भक्षक! लग्नाचे आमिष अन्… पोलिस कर्मचाऱ्याच्या अत्याचाराला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

Akola News: अपघात की घातपात? शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षाच्या मृत्यूनंतर राजकीय खळबळ; माजी जिल्हाप्रमुखावर गंभीर आरोप
4

Akola News: अपघात की घातपात? शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षाच्या मृत्यूनंतर राजकीय खळबळ; माजी जिल्हाप्रमुखावर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.