Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: नाशिकमध्ये दिवसाढवळ्या थरार! मिरची पूड टाकून महिलेने कोयत्याने तरुणावर केले सपासप केला वार; व्हिडीओ समोर

नाशिकमध्ये महामार्गावर एका महिलेने युवकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चॉपरने हल्ला केला. सूरज सोलंकी गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी महिला व साथीदार फरार; पोलिस तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 14, 2026 | 01:35 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मिरची पूड टाकून चॉपरने जीवघेणा हल्ला
  • युवक गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू
  • आरोपी महिला व साथीदार फरार, तपास सुरू
नाशिक: नाशिक येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुपारी मुंबई- आग्रा महामार्गावर एका तरुणावर भीषण हल्ला झाल्याचे समोर आले आहे. एका महिलेने अत्यंत क्रूरपणे एका व्यक्तीवर चॉपरने सपासप वार केले. हल्ल्यापूर्वी संबंधित महिलेने पीडित तरुणाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याला असहाय्य केले आणि त्यानंतर तो बेशुद्ध होण्याच्या स्थितीत असताना त्याच्यावर चाकू व चॉपरने मानेवर व डोक्यावर प्रहार केले. हा सर्व प्रकार महामार्गावरून जाणाऱ्या एका कार चालकाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे.

Karnataka Crime: प्रेयसीचा लग्न जुळलं, प्रियकराने खाजगी फोटो व्हायरल करून लग्न मोडले; तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील हल्ल्यात सूरज कुमार मोहनलाल सोलंकी असे आहे. सुरज हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सूरज कुमार हा मूळचा अहमदाबादचा रहिवासी असून तो सध्या जुन्या नाशिकमधील नानावली येथे आपल्या वहिनीकडे राहण्यासाठी आला होता. तो वाडीवरे गावातील पेलिकन कंपनीत कामाला होता.

सोमवारी दुपारी साधारण 3:30 च्या सुमारास सूरजचा फोनवर कोणासोबत तरी जोरदार वाद झाला होता. “तू मला सकाळपासून त्रास देतोयस” असे रागात बोलून तो घराबाहेर पडला. यावेळी त्याची वहिनी मेघा गोपाल सोलंकी यांनी त्याला थांबवचाण्या प्रयत्न केला, मात्र तो संतापलेल्या अवस्थेत कोणाचेही न ऐकता निघून गेला. या घटनेच्या साधारण एका तासानंतर त्याचा मोबाईल बंद झाला आणि त्यानंतर महामार्गावर त्याच्यावर हल्ला झाला.

सोशल मीडियावर हल्ल्याचा व्हिडीओ वायरल

एका तरुणीने अत्यंत क्रूरपणे सुरजवर कोयत्याने सपासप वार केले. हल्ल्यापूर्वी संबंधित महिलेने पीडित तरुणाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याला असहाय्य केले आणि त्यानंतर तो बेशुद्ध होण्याच्या स्थितीत असताना त्याच्यावर चाकू व चॉपरने मानेवर व डोक्यावर प्रहार केले. त्यावेळी एक काळ्या रंगाचा शर्ट घातलेला एक तरुण देखील होता. तो शांतपणे उभा राहून महिला करत असलेल्या हा वार पाहत होता. जखमी सूरज कुमार जेव्हा जमिनीवर पडला, तेव्हा ही महिला त्याच्यावर वार करत होती आणि तो उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहत होता. कृत्य केल्यानंतर ही महिला त्या तरुणासोबत मोटारसायकलवर बसून मुंबईच्या दिशेने पसार झाली. आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी मोटारसायकलची नंबर प्लेट एका कापडाने झाकून ठेवली होती. हा सर्व प्रकार महामार्गावरून जाणाऱ्या एका कार चालकाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे.

Nashik Crime : नाशिक : महिलेने डोळ्यात चटणी टाकून चिरलं, तरुणावर कोयत्याने सपासप वार; कार चालकाने व्हिडीओ केला शूट pic.twitter.com/AI8hDEaQed — Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) April 14, 2026

पोलीस तपास सुरु

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासवाला सुरु केली. सूरजच्या वैयक्तिक वादातून किंवा कामाच्या ठिकाणच्या भांडणातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुरजवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांकडून त्याचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत असून हल्ल्यामागचं कारण देखील शोधत आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सूरज कुमारला मधुमेह (Diabetes) असून त्याच्या पायाला आधीच मोठी दुखापत झाली होती, ज्यामुळे पुढील 2 दिवसांत त्याच्या पायाची मोठी शस्त्रक्रिया होणार होती, मात्र त्याआधीच त्याच्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला.

Dharashiv Crime: धाराशिवमध्ये भाड्याच्या वादातून थरार! घरमालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; 26 टाके, आरोपी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: हल्ला कसा करण्यात आला?

    Ans: आधी मिरची पूड टाकून नंतर चॉपरने वार करण्यात आले.

  • Que: जखमी व्यक्तीची स्थिती काय आहे?

    Ans: तो गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार घेत आहे.

  • Que: पोलिस काय करत आहेत?

    Ans: सीसीटीव्ही व व्हिडिओच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: Nashik crime daylight drama in nashik woman throws chili powder and repeatedly strikes youth with a machete video surfaces

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव
1

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! घरावर नारळाचं झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
2

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! घरावर नारळाचं झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

Ram Temple Security Alert: अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती
3

Ram Temple Security Alert: अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती

Ketan Agarwal Muder Case: लोहगड हत्याकांडाचा थरारक खुलासा; 3 प्लॅन, ‘डेथ पॉईंट’ आणि सिग्नल मिळताच चेतनने…
4

Ketan Agarwal Muder Case: लोहगड हत्याकांडाचा थरारक खुलासा; 3 प्लॅन, ‘डेथ पॉईंट’ आणि सिग्नल मिळताच चेतनने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.