पंचवटी : सातपूर गावातील (Satpur Village) गोरक्षनाथरोड मळे परिसरातील काश्मिरे व सोनवणे यांच्या मळ्यातील चाळीत रहाणाऱ्या परप्रांतीय (People From Other State) तरुणांमध्ये मंगळवारी रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास वाद झाला. वादाचे पर्यावसान थेट हाणामारीत होऊन यामध्ये संतोष जयस्वाल (Santosh Jaiswal) या परप्रांतीय तरुणाचा खून (Murder) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेवरून परप्रांतीय मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे असून या परप्रांतीय तरुणांची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात मालकाने दिली होती (House Owner Not Given Information To The Local Poilce Station) का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संतोष जयस्वाल याने फेसबुकवर फोटो पोस्ट (Facebook Photo Post) केल्यानंतर संशयित रामकिशन निषाद (Ramkishan Nishad) याने हसल्याची कमेंट टाकली होती. या किरकोळ कारणावरून दोघांचे वाद असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
[read_also content=”मोठी बातमी! महिलेची छेड काढणारे औरंगाबादचे एसीपी विशाल ढुमेंचं अखेर निलंबन; पीडित महिलेच्या पतीलाही केली होती मारहाण https://www.navarashtra.com/crime/big-news-aurangabad-crime-acp-vishal-dhume-finally-suspended-for-molesting-woman-victims-husband-was-also-beaten-nrvb-362782.html”]
सोनवणे चाळीतील रामकिशन निषाद नामक परप्रांतीय संशयित युवकाने काश्मिरे चाळीतील संतोष जयस्वाल (३०, मूळगाव आझमगढ) या युवकास लोखंडी रॉडने डोक्यात गंभीर मारहाण केली. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने तो मृत झाल्याचे घोषित केले. माहिती मिळताच पोलिसांची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
दरम्यान संतोष जयस्वाल मयत झाल्याचे समजताच मारहाण करणारा संशयित रामकिशन निषाद व त्याचे अन्य साथीदार फरार झाले असून, पोलिस प्रशासन संशयितांचा शोध घेत त्यांच्या मागावर गेले असून, या गुन्ह्याचा तपास सातपूर पोलिस करीत आहे.
सातपूर, अंबड, नाशिकरोड, पंचवटी, आडगाव, इंदिरानगर, चिंचोळे शिवार, पाथर्डी गाव, कामगार नगर, श्रमिक नगर, अशोक नगर, कामटवाडे आदी परिसरात औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये का करण्यासाठी उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार आदी राज्यांसह विविध राज्यातून अनेक कामगार काम करण्यासाठी येत असतात.
[read_also content=”मुंबईकरांनो, उद्या मेट्रोने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचून मगच निर्णय घ्या, अन्यथा घरी परतताना होऊ शकतो मनस्ताप https://www.navarashtra.com/maharashtra/pm-narendra-modi-mumbai-visit-tomorrow-19-january-due-to-security-reasons-metro-services-will-be-suspended-for-two-hours-nrvb-362773.html”]
याठिकाणी अनेकांनी जागा घेऊन त्यामध्ये खोल्यांची निर्मिती करून भाडे तत्वावर परप्रांतीय कामगारांना दिलेल्या आहे. मात्र, या भाडेकरूंची कुठलीच माहिती स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये दिली जात नसल्याने अशी काही दुर्घटना घडल्यास संशयित आरोपीचा शोध घेताना पोलिसाना मोठी कसरत करावी लागते. या घटनेत देखील या परप्रांतीय तरुणांची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला होती का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.