नाशिक: नाशिक मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने कुत्रे-मांजरींना विष देऊन संपवल्याचे समोर आले आहे. जवळपास 20 पेक्षा जास्त भटके श्वान आणि काही मांजरी ठार केल्याचे समोर आले आहे. हे करण्यामागचं उद्देशष्य केवळ इतकंच की डुक्करांचे रक्षण, डुकरांना त्रास होऊ नये. ही घटना नाशिकच्या सटाणा तालुक्यातील अंबासन गावात समोर आला आहे. डुक्कर पालकाने आपल्या डुक्करांचे रक्षण करण्यासाठी शांत डोक्याने हे क्रूर कृत्य केलं आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
अँब्सन परिसरात डुक्करांची संख्या मोठी आहे. हे मोकाट डुक्करे गावात इकडून तिकडे हुंदडून पिकांचे नुकसान करीत असल्याने ग्रामस्थ व शेतकरी हैराण असतात. डुकरांना कुत्र्याचा त्रास होऊ नये यासाठी डुक्कर मालकाने कुत्र्यांना विषारी औषध टाकले. यात कुत्रा आणि मांजरे मृत्युमुखी पडले. गावात दुर्गंधी पसरल्याने हा सर्व प्रकार समोर आला आहे. या घटनेत २० पेक्षा अधिक कुत्रे तर काही मांजरी ठार झाले. विशेष म्हणजे हे विषारी औषध गावातील मुख्य चौकात आणि अंगणवाडीजवळ टाकले होते. एखाद्या लहान मुलांनी ते औषध खाल्ले असते तर मोठा अनर्थ घडला असता. विषारी औषधं सेवन केल्याने काही लेकुरवाळी मादी दगावल्याने पिल्ले पोरकी झाली आहे. काही प्राणीप्रेमी या पिलांचा सांभाळ करीत आहे.
या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली असून प्राण्यांची निर्दयीपणे हत्या करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. डुक्कर मालक सुरेश शामराव शिंदे आणि त्याचा मुलगा अंबादास सुरेश शिंदे या संशयितांना जायखेडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची गंभोर दाखल घेत ७ दिवसांत डुक्करांची विल्हेवाट लावावी असा अल्टिमेटम दिला आहे. स्वतःच्या फायद्यासाठी मुक्या जीवांचा बळी घेणाऱ्या डुक्कर मालकांविरुद्ध संताप व्यक्त होत असून मुक्या जीवांचा बळी घेणारा विकृत मानसिकतेला आता कायद्याने धडा शिकविण्याची गरज आहे.
अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीची तुरूंगातून सुटका ‘या’ प्रकरणात भोगली १८ वर्षांची शिक्षा
गेल्या १८ वर्षांपासून अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका कऱण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कारागृहाच्या मागच्या गेटने मीडियापासून लपवत पोलिसांनी अरुण गवळीची सुटका केली. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज त्याची सुटका करण्यात आली. मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा करण्यात आली होती.
अरुण गवळी २००४ मध्ये मुंबई विधानसभा मतदारसंघातून आमदारही झाले. २०१२ मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने २००७ मध्ये मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नंतर त्यांना नागपूर तुरुंगात पाठवण्यात आले. न्यायालयाने त्यांना १७ लाख रुपयांचा दंडही ठोठावला.
अमली पदार्थ खरेदी व्यवहारातून वाद; टोळक्याकडून तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार