Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: भोंदू ‘कॅप्टन’चा काळा चेहरा उघड; बलात्कार प्रकरणात अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त; काय नेमकं प्रकरण?

नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ला अटक करण्यात आली. तपासादरम्यान 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त झाले असून त्यात नामांकित व्यक्तींचा संबंध असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 18, 2026 | 10:50 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बलात्कार प्रकरणात ‘कॅप्टन’ अशोक खरात अटकेत
  • पोलिसांकडून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त
  • सेलिब्रिटी व राजकीय कनेक्शनचा संशय; तपास सुरू
नाशिक: नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोंदूगिरीच्या आड गंभीर गुन्हे केल्याचा आरोप असलेल्या ‘स्वघोषित कॅप्टन’ अशोक खरात याला नाशिक क्राइम ब्रांच युनिट-1 ने अटक केली असून, या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. एका ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले असून, या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला, सेलिब्रिटी तसेच प्रभावशाली व्यक्तींचा संबंध असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या धक्कादायक उघडकीमुळे प्रकरण आणखी गंभीर बनले असून, या संपूर्ण रॅकेटचा तपास आता अधिक सखोलपणे केला जात आहे.

काय नेमकं प्रकरण?

अशोक खरात विरोधात एका ३५ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली होती. धमकी देऊन आणि गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने अशोक खरात उर्फ याला पोलिसांनी अटक केली आहे. आज (बुधवार १८ मार्च) खरात याला पहाटे ३ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. यासंदर्भात सध्या अधिक चौकशी सुरु आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्याकडून जप्त केलेल्या पेन ड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ असून, त्याची सत्यता पडताळण्यात येत आहे.

Mumbai Crime: “आत्महत्या कर, नाहीतर नोकरी घालवू” – धमकीनंतर पोलीस कर्मचाऱ्याचे टोकाचे पाऊल; नेमकं प्रकरण काय?

या व्हिडिओमध्ये नामांकित महिला तसेच सेलिब्रिटी वरिष्ठ अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांची माहिती असल्यास देखील माहिती मिळत आहे. पोलिसांकडून या व्हिडिओची सखोल तपासणी सुरु असून यात अनेक धक्कादायक बाबींचा समावेश आहे. या प्रकरणात भोंदूगिरी करणाऱ्या खरात उर्फ कॅप्टन यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

अशोक खरात उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ कोण आहे?

आरोपी अशोक खरात हा स्वतःला अंकशास्त्रज्ञ आणि आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून सादर करत होता. नाशिकमधील सिंन्नर तालुक्यात मोरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. अनेक राजकीय नेते, उद्योजक आणि सेलिब्रिटी त्याच्याकडे सल्ल्यासाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे.

कॅप्टन अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये २२ वर्षांच्या कारकिर्दीत खरातने १५४ देशांचे दौरे पूर्ण केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याचे मानले जाते.

खरातने आपले लक्ष ‘कॉस्मॉलॉजी’ (विश्वशास्त्र) नावाच्या विज्ञानशाखेच्या अभ्यासाकडे वळवले, तेव्हा त्याच्या आयुष्याला रंजक वळण मिळालं. कॉस्मॉलॉजीने गेल्या १०० वर्षांत प्रचंड प्रगती साधली आहे. आइन्स्टाईन यांच्या १९१७ मधील विश्वाच्या ‘स्थिर प्रतिमाना’द्वारे (static model) सैद्धांतिक भौतिकशास्त्राची एक शाखा म्हणून याची सुरुवात झाली; आणि सुरुवातीच्या काळात, विशेषतः लेमैत्र (Lemaître) यांच्या कार्यामुळे या शाखेचा विकास झाला.

Pune Crime: शाळेतून घरी आला, खेळायला गेला आणि…, थेट आढळला मृतदेह; हत्या की अपघात?

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: अशोक खरात उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’, जो स्वतःला अंकशास्त्रज्ञ व मांत्रिक म्हणून ओळख करून देत होता.

  • Que: त्याच्यावर कोणता आरोप आहे?

    Ans: एका महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा गंभीर आरोप आहे.

  • Que: तपासात काय आढळले?

    Ans: पोलिसांनी त्याच्याकडून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले असून त्यांची तपासणी सुरू आहे.

Web Title: Nashik crime fraudulent captain exposed arrested in rape case 58 objectionable videos seizedwhat exactly is the case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik News: नाशिकच्या खड्ड्यांना ट्रम्प जबाबदार? ‘महासभेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात ठराव करा’
1

Nashik News: नाशिकच्या खड्ड्यांना ट्रम्प जबाबदार? ‘महासभेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात ठराव करा’

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
2

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
3

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी
4

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.