काय घडलं नेमकं?
नाशिकरोड परिसरातील पिंपळगाव खांब (वडनेर रोड) भागात राहणाऱ्या एका 18 वर्षीय विद्यार्थिनीची ‘स्नॅपचॅट’ वर सोशल मीडिया ऍपद्वारे संशयित स्वरूप अमोल संधान (रा. सह्याद्रीनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत संशयित स्वरूप अमोल संधान याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत संशयिताने तरुणीशी जवळीक साधली, प्रेमसंबंध निर्माण केले आणि तिला लग्नाचे खोटे आश्वासन दिले.
जातीचा उल्लेख करून हीन वागणूक
डिसेंबर २०२५ ते जून २०२६ या कालावधीत संशयित आरोपी स्वरूप संधान याने पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, पीडित तरुणीने जेव्हा संशयिताकडे लग्नाबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने तिच्या जातीचा उल्लेख करून तिला हीन वागणूक दिली आणि लग्न करण्यास साफ नकार दिला.
संशयित आरोपी फरार
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेच्या कालावधीत पिडीतेचे वय विचारात घेऊन पोलिसांनी या प्रकरणात पोक्सो कायद्याची कलमेही जोडली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमेध सोनोने करत आहेत. संशयित आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका; सहा महिन्यात तब्बल…
नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वाढत्या ‘स्ट्रिट क्राईम’ मुळे शहरात धास्तावलेल्या नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा कडक मोहीम हाती घेतली आहे. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड्यावर दारू पिणाऱ्या (ओपन बार) मद्यपींवर पोलिसांनी थेट दंडुका उगारण्यास सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानुसार, शहरातील १४ ही पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांची पथके हद्दीतील दारू दुकानांबाहेर, वाईन शॉप्स आणि मोकळ्या जागांवर गस्त घालून कडक कारवाई करत आहेत.
Amravati Crime: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू
Ans: ही घटना नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Ans: दोघांची ओळख Snapchat या सोशल मीडिया ॲपवर झाली होती.
Ans: पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून POCSO कायद्याची कलमे जोडली आहेत.






