
crime (फोटो सौजन्य: social media)
पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 25 कोटींचे अमली पदार्थ पकडले
काय घडलं नेमकं?
शुभमचे वडील बाळासाहेब व्यापारी हे फळव्यवसाय करत होते. त्यांचा एका अपघातात मृत्यू झाला होता. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी दहावा आणि तेरावा असे धार्मिक विधी पार पाडले होते. त्यांनतर अवघ्या दोन दिवसात १५ जानेवारी रोजी मतदान असल्याने अनेक नातेवाईक आपापल्या कामानिमित्त बाहेर गेले होते. याच दरम्यान शुभम घरातून अचानक बेपत्ता झाला. त्याचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी सुरुवात केली. मात्र तो सापडला नाही.
चार दिवसानंतर सापडला मृतदेह
अखेर चार दिवसानंतर रविवारी (दि. 19) रोजी सकाळच्या सुमारास सिडकोतील खांडे मळा परिसरातील एका विहिरीत शुभमचा मृतदेह तरंगताना नागरिकांच्या निदर्शनास आला. नागरिकांनी याची माहिती तात्काळ अंबड पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्तळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर नातेवाईकांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. मृतदेह शुभम व्यापारी याचा असल्याची खात्री झाली. शुभमच्या मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
कारण अद्याप अस्पष्ट
शुभमने आत्महत्या का केली. यामागचे नेमके कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. वडिलांच्या निधनानंतर तो मानसिक तणावात होता का, याचा तपास पोलीस करत आहे. अंबड पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
Ans: सिडको परिसरातील खांडे मळा भागातील एका विहिरीत.
Ans: सिडकोतील लक्ष्मीनगर भागात राहणारा २१ वर्षीय शुभम बाळासाहेब व्यापारी.
Ans: कारण अद्याप स्पष्ट नाही; वडिलांच्या निधनानंतर मानसिक तणाव होता का, याचा तपास सुरू आहे.