Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: आम्हाला मारून टाकणार होते…; गाडी अडवून काचा फोडल्या, टोलनाक्याचे बॅरिकेड तोडून पर्यटक कुटुंबाने वाचवला जीव

नाशिकच्या भावली धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटक कुटुंबावर चार ठिकाणी जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेला छेडणाऱ्यांना जाब विचारल्यानंतर आरोपींनी गाडीचा पाठलाग करत काचा फोडल्या, दगड-रॉडने हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी कुटुंबाला टोलनाक्याचे बॅरिकेड तोडून पळावे लागले. या प्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 14, 2026 | 01:07 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • महिलेला छेडछाड करणाऱ्यांना जाब विचारल्यानंतर पर्यटक कुटुंबावर सलग चार ठिकाणी हल्ला.
  • आरोपींनी गाडीची तोडफोड करत दगड आणि रॉडने जीवघेणा हल्ला केला; कुटुंबाने बॅरिकेड तोडून जीव वाचवला.
  • पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली असून एक मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.
नाशिक: नाशिकमधील प्रसिद्ध भावली धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या एका पर्यटक कुटुंबासाठी सहलीचे रूपांतर थरारक अनुभवात झाले. महिलेला छेडछाड करणाऱ्यांना जाब विचारल्यानंतर संतप्त झालेल्या काही तरुणांनी कुटुंबाचा तब्बल चार ठिकाणी पाठलाग करत गाडीची तोडफोड केली, दगड-रॉडने जीवघेणा हल्ला केला आणि त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पीडितांनी केला आहे. जीव वाचवण्यासाठी या कुटुंबाला टोलनाक्याचे बॅरिकेड तोडून पळ काढावा लागल्याचा धक्कादायक खुलासा कुटुंबांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली असून एक मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

बाबा फर्जनच्या जुन्या घराची झाडाझडती, मुलगा, युनियन पदाधिकारी अन् पत्नीची चौकशी; चौकशीत काय उघड झाले?

कुटुंबीयांनी काय सांगितलं?

हा थरारक अनुभव आल्यांनतर कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी महिलेने सांगितले की आम्ही भावली धबधब्यावर परवा फिरायला गेलो होतो, 12 तारखेला आम्ही तिथं दोन अडीच वाजता पोहोचलो, आम्ही बिर्याणी वगैरे नेली होती, आम्ही जेवण वगैरे केलं. पाण्यात एन्जॉय केलं. मुलं पाण्यात खेळत होती, ते सगळं झालं त्याच्यानंतर मी चेंज करायला गेली, मला थंडी भरून आली होती आणि मागे दीर आणि नवरा पाठीमागून येत होते, तिथे जो छोटा ब्रिज आहे, भावली धरणाच्या इथला तिथे दोन जण टू-व्हीलरवर उभे होते, तिथून मी जात असताना त्यांनी शिट्टी वाजवली, त्यांनी कमेंट पास केली, मी ऐकल्यानंतर मी तिकडे जाऊन त्यांना एक दोन शिवी दिली की काय म्हटलं तुम्ही असं लेडीजला काहीही बोलता, तुम्हाला शोभत काय, एवढाच विषय तिथं झाला त्याच्यानंतर तो मला परत काहीतरी बोलला तर मी थोड इग्नोर केलं, माझा नवरा आणि दीर मागून आले. ते म्हणाले अरे तुम्हाला काही कळतं का नाही, काय करतो तू लेडीज आहे, असं बोलू नये, माझ्या नवऱ्याने त्याच्या डोक्यात असं मारलं तर तो घाबरून तिथून पळून गेला.

इगो हर्ट आणि…

त्यांनतर त्याच्या बाजूला जी दुसरी गाडी होती, तिथं काही सामान विकत होते, तिथे आठ दहा मुलं उभे होते, तर त्यांनी पाहिलं आणि त्यांचा इगो हर्ट झाला की, आमच्या गावातल्या मुलाला तुम्ही काय दादागिरी करताय, आम्ही दादागिरी केलीच नाही, ना त्याला मारलं, काहीच नाही फक्त बोलणं झालं, त्याच्यानंतर पण हे लोक आमच्यावर धावून आले, अंगावर शिव्या गाळ करायला लागले, मग त्यांना शिवीगाळ केली तिथं थोडी आमची हातापायी झाली, तिथल्या पब्लिक लोकांनी आम्हाला वाचवलं, चला चला, सोडा सोडा, जा वगैरे, आम्ही तेवढं केलं तिथून आम्ही आमच्या गाडीत निघालो फक्त त्याच्यातला एक मुलगा आहे, त्याचं नाव नाही माहिती, पण त्यांनी असा इशारा करून गेला आम्हाला की, बघतो तुम्हाला पुढे असं, पण आम्हाला ते डोक्यात नाही आलं की, तो पुढे जाऊन आमच्यावर काय करेल, असंही त्यांनी म्हटलं.

टोलनाक्याचे बॅरिकेड तोडून….

आम्ही आमचं निघालो, मग आम्ही थोड भावलीच्या पुढे गेलो, पुढे गेल्यानंतर एक बलेनो आली फास्टमध्ये आणि त्यांनी आडवी लावली. रस्त्यात नाही लावली, आम्हाला तर जाता पण नसतं आलं, तो गाडीतून उतरला त्याने हाताने काचा फोडल्या, दोन्ही पुढच्या ड्रायव्हसीटच्या बाजूची आणि त्यांच्या मागची, पहिला वार तिथं केला, मी त्यांना म्हणाले आवरा पटकन, गाडी काढा, त्यांना ते सुचना, आता पहिल्यांदा ती गाडी चालवत होते, कशीतरी त्यांनी काढली. तिथं स्पीड ब्रेकर होता, त्यामुळं गाडी उडाली, आम्ही निघालो तिथून आणि नंतर मागे मुलं म्हणाली की, मम्मी अजून एक टू व्हीलर मागे येती आहे आपल्या तू ते बघ, व्हिडिओ काढ म्हटलं त्याला पटकन कोण आहे, कळेल तरी, त्यांच्याकडे रॉड होती, ते व्हिडिओ पाहिलेच असेल, त्यांनी पहिले एक रॉड फेकली, दुसरी रॉड फेकली पण लागली नाही, त्याच्यानंतर ते परत मागे आले, पुढे जाऊन तशी आम्हाला ट्रॅफिक लागलं, आमचा तिसरा स्पॉट टोल नाका होता, त्यांनी म्हणजे सुरुवातीपासून पहिला त्यांनी बाहुली डॅमपाशी अटॅक केला आमच्यावर, दुसरा नाशिक मुंबई हायवे फ्लायओव्हर तिथ दुसरा अटॅक झाला, तिसरा अटॅक गोटीचा टोल नाका आहे, त्यांनी आम्ही लेनमध्ये आलो, आमच्या पुढे दोन गाड्या होत्या, तर दोन गाड्या असल्यामुळे मला पास करता येणार नव्हता लगेच टोलनाका, ते माझ्या शेजारच्या लेनमध्ये आले आणि आमच्या अंगावर अटॅक करायला पळत होते, दगड घेऊन, आम्ही तिथून गाडी रिव्हर्स घेतली, त्यांनी परत दगड मारले, आम्ही चौथ्या लेनमधून बॅरिकेड तोडून पळालो होतो, आम्ही फक्त जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, त्याच्या पुढं दोन चार किलोमीटर एक रस्ता शॉर्ट होता, तिथे ट्रॅफिक असते नेहमी, तर तिथे येऊन त्यांनी परत आमच्यावर अटॅक केला, आमच्या गाडीच्या पुढे आले, आम्हाला ब्लॉक केलं, आम्ही पुढे नाही जाऊ शकणार अशा परिस्थिती, तिथं कशीतरी थोडी रिव्हर्स गाडी करून इगतपुरीच्या साईडला घेतली, म्हटलं आपण इगतपुरीला पळू, मुंबई साईडला, तर त्यांच्यातला एक मुलगा आमच्या गाडीला लटकला, तो 200 ते 500 मीटर आमच्या गाडीला लटकून होता, माझ्या चुलत भावाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत होता, तर आम्ही गाडी पळवू पण नव्हतो शकत, जर हा गाडी खाली आला, तर आमच्याकडून एखाद्याचा बळी होईल आणि आम्ही थांबू शकत नव्हतो, की जर आम्ही थांबलो, तर आमचा बळी जाईल.

चौथ्या ठिकाणी हल्ला

आमचा जीव धोक्यात असताना आम्ही त्याचे हात झटकत होतो की, हा गाडीतून पडावा म्हणजे लवकर निघा आणि आम्ही पळता यावं 100 ते 200 मीटरवर गेल्यावरती तो सुटला, तो खाली पडला, आम्ही इगतपुरी साईडला पळायला लागलो, पण मला आरश्यामध्ये दिसत होतं की, मागून बलेनो परत पाठलाग करत होती, म्हटलं आपण परत यांच्याच गावाकडे चुकीच्या ठिकाणी चाललोय, परत मी रिव्हर्स मारली म्हणजे टर्न मारून घेतला आणि नाशिक साईडला पळालो, मग त्याच्यापुढे तो चौथा स्पॉट होता, त्याच्यापुढे गोंदे दुमाला आहे तिथं जो फ्लायओवर छोटासा ब्रिज आहे, तो काम चालू आहे, तिथं माझ्या पुढे दोन- चार ट्रक होत्या, तर मला काही पास करायला जागा नाही, पण ते शेजारून परत मागे आले आणि पुढे तर तिथं स्थानिक लोक भरपूर होते, मी सर्वांना रिक्वेस्ट केली, यांनी रडत होते की आम्हाला वाचवा, ते आम्हाला हे मारून टाकणार आहे, त्यानंतर आम्ही तिथून अंबड पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. असा थरारक अनुभव हल्ला झालेल्या पर्यटक कुटुंबीयांनी दिली आहे.

नऊ जण अटकेत

या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातून एक कुख्यात गुन्हेगार अद्याप फरार आहे. पालघर भागात पाळल्याने पोलीस त्यांच्या मागावर आहेत. पर्यटननगरी असलेल्या नाशिक जिल्ह्यात या हल्ल्यामुळे खळबळ माजली होती. व्हायरल व्हिडिओमुळे तातडीने पोलीस सक्रिय झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

चक्क कारवाईच्या नावाखाली ‘वसुली’? दंडात्मक कारवाई टाळून पैशांची देवाणघेवाण; सोशल मीडियावर संताप

💡

Frequently Asked Questions

  • Que: हल्ल्याची सुरुवात कशामुळे झाली?

    Ans: महिलेला छेडछाड करणाऱ्यांना जाब विचारल्यानंतर वाद झाला.

  • Que: पर्यटक कुटुंबाने जीव कसा वाचवला?

    Ans: टोलनाक्याचे बॅरिकेड तोडून तेथून पळ काढला.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: 9 आरोपींना अटक केली असून एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

Web Title: Nashik crime they were going to kill us a tourist family saved their lives by breaking through a toll plaza barricade after their car was intercepted and its windows smashed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
1

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.