Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar Crime: धडक दिली… कार मागे घेतली… आणि जखमीच्या अंगावरून पुन्हा घातली; उल्हासनगरातील घटना हादरवणारी

उल्हासनगरमध्ये भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर जखमी व्यक्तीच्या अंगावर पुन्हा कार चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत देवेंद्र सिंह राजपूत यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी गोल्ड व्यावसायिक अविनाश मुथा याला पोलिसांनी अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 14, 2026 | 09:45 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर जखमीच्या अंगावर पुन्हा वाहन चालवल्याचा आरोप.
  • अपघातात देवेंद्र सिंह राजपूत यांचा मृत्यू, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी.
  • गोल्ड व्यावसायिक अविनाश मुथा याला पोलिसांनी अटक केली असून तपास सुरू आहे.
उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये घडलेल्या एका धक्कादायक हिट-अँड-रन प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर जखमी व्यक्तीच्या अंगावर पुन्हा कार चालवत चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याचा आरोप आहे. या भीषण घटनेत एका वयोवृद्धाचा मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी कल्याणमधील गोल्ड व्यावसायिक अविनाश मुथा याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Jalgaon Crime: लग्नाला अवघे 6 दिवस… हातावरची मेहंदी अजूनही तशीच होती; माहेरी निघालेल्या नववधूला काळाने गाठलं!

काय घडलं नेमकं?

या प्रकरणी पोलिसांनी कल्याण येथील गोल्ड व्यावसायिक अविनाश मुथा याला अटक केली. अविनाश मुथा हा प्रकाश मुथा यांचा मुलगा आहे. प्रकाश मुथा हे कल्याणमधील नामांकित बिल्डर, गोल्ड व्यावसायिक आणि अशोक चव्हाण यांच्या निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. उल्हासनगर क्रमांक १ परिसरातील बिर्ला गेटसमोर दोन जण शहाड स्टेशनचा दिशेने जात होते. त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यावर पडले. त्यापैकी एका व्यक्तीच्या अंगावर कार गेली. असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

अपघातानंतर नागरिकांनी आरडाओरडा सुरु केल्यानंतर कार चालकाने वाहन काही अंतरावर थांबवले. मात्र, आरोपानुसार त्याने कार मागे घेत पुन्हा जखमी वयोवृद्धांच्या अंगावरून वाहन चालवत तेथून पलायन केले. या घटनेत देवेंद्र सिंह राजपूत यांच्या मृत्यू झाला आहे आणि त्यांच्या मुलगा संजय सिंग राजपूत हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

तक्रार दाखल

या घटनेनंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्याशी आयोग्य वर्तन केल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी डीसीपी सचिन गोरे यांच्याकडे तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे कल्याण आणि उल्हासनगर परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

FDA Raid: छत्रपती संभाजीनगर हादरले! तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे संशयास्पद तेल जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव काय आहे?

    Ans: देवेंद्र सिंह राजपूत.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी कोणाला अटक केली?

    Ans: गोल्ड व्यावसायिक अविनाश मुथा.

  • Que: या प्रकरणात नेमका आरोप काय आहे?

    Ans: दुचाकीला धडक दिल्यानंतर जखमी व्यक्तीच्या अंगावर पुन्हा कार चालवत घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप आहे.

Web Title: Ulhasnagar crime struck the victim reversed the car and ran over him again a shocking incident in ulhasnagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
1

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल
2

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल

Navarashtra Impact: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर कारवाई
3

Navarashtra Impact: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर कारवाई

Navi Mumbai Crime: प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले; तुर्भे सेक्टर 19 मधील बांधकाम साईट सील
4

Navi Mumbai Crime: प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले; तुर्भे सेक्टर 19 मधील बांधकाम साईट सील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.