Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: भिंतीला भगदाड… गॅसकटरने लॉकर फोडला; पुण्यातील सराफी पेढीत लाखोंची धाडसी चोरी

पुण्यातील मांजरी परिसरातील सराफी पेढीत शेजारच्या खोलीतून भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी 35 तोळे सोने आणि सव्वा किलो चांदीची धाडसी चोरी केली. गॅसकटरने लॉकर फोडून आरोपी फरार झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार रखवालदारासह आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 14, 2026 | 10:13 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शेजारच्या खोलीतून भिंत फोडून सराफी दुकानात प्रवेश करत 35 तोळे सोने व सव्वा किलो चांदीची चोरी.
  • चोरट्यांनी गॅसकटरच्या सहाय्याने लॉकर फोडून दागिने लंपास केले.
  • नेपाळी रखवालदार फरार असून पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू.
पुणे: पुण्यातील मांजरी परिसरात चोरट्यांनी सराफी पेढी फोडण्यासाठी अक्षरशः सिनेस्टाईल डाव आखल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारच्या खोलीतून दुकानाच्या भिंतीला मोठे भगदाड पाडत चोरट्यांनी थेट सराफी दुकानात प्रवेश केला आणि गॅसकटरच्या सहाय्याने लॉकर फोडून 35 तोळे सोने आणि सव्वा किलो चांदीचे दागिने लंपास केले. या धाडसी चोरीमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.

काय घडलं नेमकं?

घडलेली घटना मुंढवा रस्ता, म्हसोबावस्ती येथील ‘आराध्या ज्वेलर्स’मध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. चोरट्यांनी आधी सराफी दुकानाच्या लागत असलेली खोली गाठली. त्यांनतर त्या खोलीतून दुकानाच्या पाठीमागील भिंतीला मोठा भगदाड पाडले आणि थेट सराफा दुकानात प्रवेश केला. गॅसकटरचा वापर करत दुकानातील लॉकर आणि दागिन्यांचे कपाट फोडले. गॅसकटरच्या साहाय्याने लॉकर तोडून त्यांनी दुकानातील ३५ तोळे सोने आणि सव्वा किलो चांदीचे दागिने चोरले व तेथून पसार झाले. पोलिसांना घटनास्थळी चोरीसाठी वापरलेले एक गॅसकटर मिळून आले आहे. हा संपूर्ण चोरीचा प्रकार सोमवारी सकाळी जेव्हा दुकान मालकाने दुकान उघडले, तेव्हा उघडकीस आला.

Jalgaon Crime: लग्नाला अवघे 6 दिवस… हातावरची मेहंदी अजूनही तशीच होती; माहेरी निघालेल्या नववधूला काळाने गाठलं!

सोसायटीचा रखवालदार फरार

दोन महिन्यांपूर्वीच संबंधित सोसायटीने एका नेपाळी रखवालदाराला कामावर ठेवले होते. त्याची राहण्याची खोली नेमकी या सराफी दुकानाच्या मागेच होती; आणि याच खोलीतून भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्यात आली आहे. सध्या हा रखवालदार फरार असून धक्कादायक म्हणजे सोसायटीकडे त्याचे आधार कार्ड किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती उपलब्ध नाही. मूळचा पहिला रखवालदार काही दिवसांपूर्वी गावाला गेला होता, त्यानेच जाण्यापूर्वी या दुसऱ्या रखवालदाराची सोय केली होती. सध्या हे दोन्ही रखवालदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

तपास सुरु

पोलिसांना चोरीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासासाठी गुन्हे शाखेचे पथक, श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. कॅमेऱ्यात काही चोरटे कैद झाले आहेत, मात्र त्यांनी आपले चेहरे झाकलेले असल्यामुळे आणि फुटेज अस्पष्ट असल्यामुळे चोरट्यांची ओळख पटवणे कठीण आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

Mumbai News : मुंबईतील ताज हाॅटेलला उडवण्याची धमकी नक्की कुणी दिली? दाऊद इब्राहिमशी जोडलं जातंय नाव…

💡

Frequently Asked Questions

  • Que: चोरी कुठे घडली?

    Ans: पुण्यातील मांजरी परिसरातील 'आराध्या ज्वेलर्स'मध्ये.

  • Que: चोरट्यांनी काय लंपास केले?

    Ans: 35 तोळे सोने आणि सव्वा किलो चांदीचे दागिने.

  • Que: या प्रकरणात पोलिसांचा संशय कोणावर आहे?

    Ans: फरार नेपाळी रखवालदारासह संबंधित आरोपींवर.

Web Title: Pune crime wall breached locker cut open with a gas cutter daring heist worth lakhs at a pune jewelry shop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pune Crime News: ३ वर्षांपासून फरार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात!; मॉडर्न कॉलेज परिसरातून अभिषेक काळेला ठोकल्या बेड्या
1

Pune Crime News: ३ वर्षांपासून फरार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात!; मॉडर्न कॉलेज परिसरातून अभिषेक काळेला ठोकल्या बेड्या

पोलिस ठाण्यात बोलावून दुकानदाराला दिला त्रास, गुन्ह्याची धमकी देत उकळली खंडणी; पुण्यात खळबळ
2

पोलिस ठाण्यात बोलावून दुकानदाराला दिला त्रास, गुन्ह्याची धमकी देत उकळली खंडणी; पुण्यात खळबळ

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा
4

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.