Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jharkhand Crime: सिया गोयल प्रकरणासारखीच आणखी एक घटना; लग्नाआधीच होणाऱ्या पतीची हत्या, कारण ऐकून धक्का बसेल!

झारखंडमध्ये लग्नाला अवघे तीन दिवस बाकी असताना एका तरुणीने तिच्या प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ओळख लपवण्यासाठी मृतदेह बिहारमधील जंगलात फेकण्यात आला. एसआयटीच्या तपासातून कट उघड झाला असून आरोपी तरुणी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 14, 2026 | 12:14 PM
धक्कादायक ! 9 मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; आधी वाद झाला अन् नंतर...

धक्कादायक ! 9 मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; आधी वाद झाला अन् नंतर...

Follow Us
Follow Us:
  • लग्नाच्या तीन दिवस आधी होणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचा आरोप.
  • मृतदेह बिहारमधील जंगलात फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न.
  • एसआयटीच्या तांत्रिक तपासातून प्रकरणाचा उलगडा; दोन्ही आरोपी अटकेत.
झारखंड: पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने अख्या देशाला हादरवून टाकलं. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतन अग्रवालला लोहगडावरून ढकलून देत हत्या केली. पोलीस याचा तपास करत आहे. आता अशीच एक घटना झारखंडमधून समोर आले आहे. लग्न फक्त तीन दिवसांवर आले होते, मात्र त्या आधीच नवरीने तिच्या होणाऱ्या पतीची हत्या केली. घडलेली घटना गिरिडीह जिल्ह्यातील जमुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेने संपूर्ण राज्य हादरला आहे.

काय घडलं नेमकं?

नीरज हाजरा असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो भिखोडीह गावचा रहिवासी आहे. ५ जुलै रोजी नीरज अचानक बेपत्ता झाला. त्याचे वडील, सुभाष हाजरा यांनी जमुआ पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. सुरुवातीला, पोलिसांनी हे एक सामान्य बेपत्ता होण्याचे प्रकरण समजून तपास सुरू केला. मात्र, नीरजचे अपहरण झाल्याचा कुटुंबाला संशय आला. त्यानंतर, ८ जुलै रोजी विविध कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत विशेष तपास पथक स्थापन करत सुरू करण्यात आला.

Pune Crime: भिंतीला भगदाड… गॅसकटरने लॉकर फोडला; पुण्यातील सराफी पेढीत लाखोंची धाडसी चोरी

या तपास पथकाने मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्सच्या आधारे तपासाला सुरुवात केली. पोलिसांना महत्वाचे धागेदोरे सापडले. यामुळे हे पथक बिहारमधील जमुई जिल्ह्यातील बिचकोडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेला जंगलात पोहोचले. तिथे सापडलेला एक अज्ञात मृतदेह नीरज हाजरा यांचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सखोल तपासणी करत नीरजची होणारी पत्नी उर्मिला कुमारी हीला ताब्यात घेतले.

धक्कादायक माहिती समोर

पोलिसांनी उर्मिला कुमारीची चौकशी केली. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिचे दाजी सुभाष पासवान याच्यासोबत प्रेमसंबंध होते. ते दोघे बऱ्याच काळापासून संपर्कात होते. उर्मिलाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न नीरज हाजरासोबत ठरवले. त्यांच्या लग्नाला फक्त तीन दिवस उरले होते. उर्मिला आणि तिचा प्रियकर या नात्यामुळे आनंदी नव्हते. या दोघांनी नीरजची हत्या करण्याचे ठरवले. नीरजची हत्या केल्यांनतर ओळख लपवण्यासाठी आणि गुन्ह्याचे पुरावे मिटवण्यासाठी मृतदेह एका जंगलात फेकून देण्यात आला.

पोलीस तपास सुरु

पोलिसांनी त्या तरुणीला आणि तिचा प्रियकर दाजीला दोघांनाही अटक केली. इतर संशयितांच्या शोधासाठी झारखंड आणि बिहारमध्ये छापे टाकले जात आहेत. आरोपींनी हत्या कशी केली? याची माहिती अद्याप समोर आली नाही आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

Mumbai News : मुंबईतील ताज हाॅटेलला उडवण्याची धमकी नक्की कुणी दिली? दाऊद इब्राहिमशी जोडलं जातंय नाव…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात.

  • Que: हत्येमागील कथित कारण काय होते?

    Ans: तरुणीचे तिच्या दाजीसोबत प्रेमसंबंध होते आणि होणारा पती त्यात अडथळा ठरत होता.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा कसा केला?

    Ans: एसआयटीने मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा केला.

Web Title: Jharkhand crime another incident similar to the siya goyal case a would be husband murdered before the weddingthe reason will shock you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • crime
  • Jharkhand
  • Jharkhand Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
1

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल
2

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
3

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल
4

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.