नाशिकमध्ये २२ जूनच्या पहाटेच्या सुमारास पंचवटी – म्हसरूळ शिवारातील चामरलेण्याच्या पायथ्याशी एका ट्रकचालकाचा मृतदेह आढळून आला होता. मृतकाच्या डोक्यात व चेहऱ्यावर धारदाहर चाकूने व दगडाने वार केल्याचे आढळून आले. उमेश आंबिगार (वय ३४, रा. मरकुंडा, ता. बिदर, कर्नाटक) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या हत्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट एकला मोठे यश मिळाले असून, खून प्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.
११ वर्षीय मुलाचा लैंगिक छळ; शाळेतील कर्मचाऱ्याने बनवली अश्लील चित्रफीत आणि….
नेमके काय घडले
गुन्हे शाखा युनिट एकच्या अधिकाऱ्याकडून घटनास्थळातील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून मिळालेल्या माहितीवरून व गुप्त बातमीदारांच्या मदतीने पथकाने संशयित विजय मधुकर खराटे (वय २०),संतोष सुरेश गुंबाडे (२६), अविनाश नामनाथ कापसे (२०) आणि रवी सोमनाथ शेवरे (२८) यांना ताब्यात घेतले/ त्यांची चौलकशी करण्यात आली असता, संशयितांनी हा खून केल्याचे समोर आले.
आरोपी रवी शेवरे याने आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ उभ्या असलेल्या ट्रक चालक उमेश आंबिगार याची रेकी केली. त्यानंतर चारही संशयितांनी सिगारेट पेटविण्याच्या बहाण्याने उमेश यास ट्रकमधून खाली बोलावले. त्यानंतर कॅबिनमध्ये घुसून पैशांची मागणी केली. विरोध केल्यावर संतोष गुंबाडे याने टोकदार दगडाने डोक्यावर वार केला व इतरांनी मारहाण केली. तसेच उमेश कडील एटीएम कार्ड्स काढून घेत त्याचा पिन घेतला.
संतोष गुंबाडे यांनी चुकीचा पिन दिल्याने पैसे न मिळयासाने संतापून पुन्हा मारहाण करण्यात आली. दुचाकीवरून अवतार पॉईंटजवळील एटीएमवर नेले, पण पैसे निघाले नाहीत.त्यामुळे चौघांनी मिळून उमेश यास चामर लेणीच्या पायथ्याशी नेले. तेथे दांडके, दगड, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डबक्यात बुडवून गळा दाबून त्याची हत्या केली असल्याचे सांगितले.
या हत्येचा तपास गुन्हे शाखा युनिट एकच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक हिरामण भोये, जया तारडे, चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, किरण शिरसाठ, वाघमारे, म्हसदे, भांड, मरकड, काठे, गायकवाड, देवरे, परदेशी, साळुंके, लिलके, पवार, कोळी, आढाव यांनी ही कामगिरी केली आहे.
जन्मदात्यांनी 40 दिवसांच्या लेकीला पैशासाठी विकलं; पुण्यातील मन सुन्न करणारी घटना