मुंबई: एका ११ वर्षीय शाळकरी मुलाची शाळेच्या सफाई कर्मचाऱ्याने स्वच्छतागृहात अश्लील चित्रफीत तयार करून त्याचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना कांदिवली पूर्वेच्या एका शाळेत घडली आहे. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
काय घडलं नेमकं?
पीडित हा ११ वर्षाचा असून कांदिवली पूर्वेच्या एका शाळेत शिकतो. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पीडित मुलगा शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहात गेला होता. त्यावेळी शाळेचा ३० वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने मुलाचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. याबाबत कुणाला सांगू नये अशी दमदाटी करत अश्लील शब्दात शिवीगाळ केली. याबाबत मुलाने घरी येऊन हा सर्व घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला.
पीडित मुलाच्या पालकांनी याबाबत समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. . या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३५१ (३) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) च्या कलम १० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती सहाय्य्क पोलीस उपयुक्त कैलास बर्वे यांनी दिली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नीट बोलत नाही, भेटत नाही म्हणून शीतपेयात विष देऊन १६ वर्षीय मित्राची हत्या
मुंबईः मुंबईच्या गोवंडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका १९ वर्षीय युवकाने आपल्याच १६ वर्षीय मिटला शीतपेयाच्या विष देऊन हत्या केल्याचे समोर आले आहे. शीतपेय प्यायल्यानंतर १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर १९ वर्षीय तरुणाला मळमळू लागल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिस यांनी तपास केला असता रुग्णालयात दाखल असलेल्या १९ वर्षीय तरुणाने शीतपेयात विष मसाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.