सौजन्य फोटो - सोशल मिडीया
हेही वाचा: ड्राय डेच्या आदेशाला केराची टोपली! नवी मुंबईत ब्लॅकने दारूविक्री जोमात; अधिकारी गायब?
उषा किरण सोसायटीत गुरुवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. एका निवृत्त अधिकाऱ्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर आता दुसऱ्या पत्नीने फिर्याद नोंदवली असून, यश हेमाडे, भाग्यश्री हेमाडे, प्रियंका खोपकर आणि मल्लिकार्जुन उमदी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगापूर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि धमकी देण्यासह विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर हेमाडे यांनी १५ वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले होते. या निर्णयावरून पहिल्या पत्नीची दोन्ही विवाहित मुले त्यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जाते. दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीनुसार, राहता बंगला व मालमत्तेवरील हक्काचा वाद आणि सुरू असलेले न्यायालयीन खटले मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता.
हेही वाचा: राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
राहता बंगला आणि मालमत्तेवरून पत्नी व मुलांमध्ये वाद सुरू असल्याची बाब यापूर्वीच समोर आली होती. आता दुसऱ्या पत्नीने तक्रारीत मुलांवरच जबाबदारी ढकलत, सततच्या त्रासातून हेमाडे यांची सर्व बाजूंनी कोंडी करण्यात आल्याचे म्हटले आहे. “माझ्या नवऱ्याकडं पर्याय उरला नव्हता…” असे सांगत त्यांना आयुष्य संपवण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नसल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Ans: त्यांनी नाशिकमधील सिटी सेंटर मॉलजवळील उषा किरण सोसायटीत गुरुवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
Ans: दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात यश हेमाडे, भाग्यश्री हेमाडे, प्रियंका खोपकर आणि मल्लिकार्जुन उमदी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: मालमत्तेवरील वाद व न्यायालयीन खटले मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात होता, न्यायालयात गेल्यास ती शेवटची तारीख ठरेल अशी धमकी दिली जात होती आणि सततच्या त्रासातून कोंडी झाल्याने नवऱ्याकडे पर्याय उरला नव्हता, असा आरोप त्यांनी केला आहे.






