Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suicide Twist: नाशिकमध्ये निवृत्त RTO अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! ‘ती शेवटची तारीख ठरेल’ अशी धमकी

Suicide Twist: "न्यायालयात गेल्यास ती शेवटची तारीख ठरेल..." नाशिकमधील निवृत्त RTO अधिकारी हेमंत हेमाडे यांच्या आत्महत्येमागे धक्कादायक वळण! दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून चौघांवर गुन्हा दाखल; पोलिसांचा तपास सुरू!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 22, 2026 | 02:30 PM
Suicide Twist: नाशिकमध्ये निवृत्त RTO अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! 'ती शेवटची तारीख ठरेल' अशी धमकी

Suicide Twist: नाशिकमध्ये निवृत्त RTO अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! 'ती शेवटची तारीख ठरेल' अशी धमकी

Follow Us
Follow Us:
  • निवृत्त RTO अधिकारी मृत्यू प्रकरणात कोर्टात गेल्यास धमकी दिल्याची दुसऱ्या पत्नीची तक्रार
  • मालमत्ता वाद व खटले मागे घेण्यासाठी मुलांकडून दबाव व कोंडी केल्याने आत्महत्या
  • गंगापूर पोलिसांनी चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे व धमकीचा गुन्हा दाखल
Suicide Twist: नाशिकमधील सिटी सेंटर मॉलजवळील उच्चभ्रू उषा किरण सोसायटीत निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेत आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात दुसऱ्या पत्नीने धक्कादायक खुलासा करत, न्यायालयात गेल्यास ती शेवटची तारीख ठरेल अशी जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत केला आहे. या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: ड्राय डेच्या आदेशाला केराची टोपली! नवी मुंबईत ब्लॅकने दारूविक्री जोमात; अधिकारी गायब?

गुरुवारी रात्री दोन वाजता काय घडले?

उषा किरण सोसायटीत गुरुवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. एका निवृत्त अधिकाऱ्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर आता दुसऱ्या पत्नीने फिर्याद नोंदवली असून, यश हेमाडे, भाग्यश्री हेमाडे, प्रियंका खोपकर आणि मल्लिकार्जुन उमदी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ वर्षांपूर्वी दुसरे लग्न; मालमत्तेवरून वाद व दबाव

गंगापूर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि धमकी देण्यासह विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर हेमाडे यांनी १५ वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले होते. या निर्णयावरून पहिल्या पत्नीची दोन्ही विवाहित मुले त्यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जाते. दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीनुसार, राहता बंगला व मालमत्तेवरील हक्काचा वाद आणि सुरू असलेले न्यायालयीन खटले मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता.

हेही वाचा: राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

“पर्याय उरला नव्हता…” फिर्यादीत गंभीर आरोप

राहता बंगला आणि मालमत्तेवरून पत्नी व मुलांमध्ये वाद सुरू असल्याची बाब यापूर्वीच समोर आली होती. आता दुसऱ्या पत्नीने तक्रारीत मुलांवरच जबाबदारी ढकलत, सततच्या त्रासातून हेमाडे यांची सर्व बाजूंनी कोंडी करण्यात आल्याचे म्हटले आहे. “माझ्या नवऱ्याकडं पर्याय उरला नव्हता…” असे सांगत त्यांना आयुष्य संपवण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नसल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे यांनी कोठे आत्महत्या केली?

    Ans: त्यांनी नाशिकमधील सिटी सेंटर मॉलजवळील उषा किरण सोसायटीत गुरुवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

  • Que: या प्रकरणात कोणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे?

    Ans: दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात यश हेमाडे, भाग्यश्री हेमाडे, प्रियंका खोपकर आणि मल्लिकार्जुन उमदी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: दुसऱ्या पत्नीने तक्रारीत कोणते प्रमुख आरोप केले आहेत?

    Ans: मालमत्तेवरील वाद व न्यायालयीन खटले मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात होता, न्यायालयात गेल्यास ती शेवटची तारीख ठरेल अशी धमकी दिली जात होती आणि सततच्या त्रासातून कोंडी झाल्याने नवऱ्याकडे पर्याय उरला नव्हता, असा आरोप त्यांनी केला आहे.

Web Title: Nashik rto officer suicide twist second wife complaint gangapur police sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Crime in Nashik
  • RTO
  • Suicide case

संबंधित बातम्या

Buldhana: दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदीचा धमाका; बुलढाण्यात १,२४४ वाहनांची नोंदणी; ३ कोटींहून अधिक उलाढाल
1

Buldhana: दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदीचा धमाका; बुलढाण्यात १,२४४ वाहनांची नोंदणी; ३ कोटींहून अधिक उलाढाल

Nashik Crime News: राहत्या घरातच झाडली स्वतःवर गोळी… निवृत्त सहाय्यक RTO अधिकाऱ्याचा धक्कादायक अंत!
2

Nashik Crime News: राहत्या घरातच झाडली स्वतःवर गोळी… निवृत्त सहाय्यक RTO अधिकाऱ्याचा धक्कादायक अंत!

Suicide Case: इन्स्टाग्रामवरील प्रेम अन् लिव्ह-इन नात्याचा भयावह अंत! पार्टनरच्या टोमण्यांना कंटाळून २४ वर्षीय तरुणी…
3

Suicide Case: इन्स्टाग्रामवरील प्रेम अन् लिव्ह-इन नात्याचा भयावह अंत! पार्टनरच्या टोमण्यांना कंटाळून २४ वर्षीय तरुणी…

Nashik Case: अशोक खरात प्रकरणाची पुनरावृत्ती? “पती दोन महिन्यांत मरेल! भोंदूबाबाने “प्रेमविवाह मोडण्यासाठी  रचला काळाकुट्ट कट!
4

Nashik Case: अशोक खरात प्रकरणाची पुनरावृत्ती? “पती दोन महिन्यांत मरेल! भोंदूबाबाने “प्रेमविवाह मोडण्यासाठी  रचला काळाकुट्ट कट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.