Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime News: महिलेच्या गळ्याला सुरा अन् रोखली पिस्तूल, पोलिसाच्या घरावर दरोड्याचा थरार,नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime News: नशिराबाद येथील भादली रोडवरील मुक्तेश्वरनगर भागात बुधवारी रात्री पोलिस कर्मचाऱ्याच्या घरावर दोन सशस्त्र दरोडेखोरांनी दरोड्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांनी पिस्तूल रोखून तसेच गृहिणीच्या गळ्याला सुरा लावत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड मागितली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 21, 2026 | 11:38 AM
Crime News : खंडणी न दिल्याने रचला हत्येचा डाव; पोलिसांनाच धक्काबुक्की, दोघे अटकेत

Crime News : खंडणी न दिल्याने रचला हत्येचा डाव; पोलिसांनाच धक्काबुक्की, दोघे अटकेत

Follow Us
Follow Us:
  • पोलिस कर्मचाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न.
  • गृहिणीच्या गळ्याला सुरा लावून दागिने-रोकड मागितली.
  • ‘डायल ११२’वर संपर्क केल्याने मोठा अनर्थ टळला.
 

Jalgaon News: नशिराबाद येथील भादली रोडवरील मुक्तेश्वरनगर भागात बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरावर दोन अज्ञात सशख दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली. दरोडेखोरांनी पिस्तुल ताणून आणि गृहिणीच्या गळ्याला थेट सुरी लावून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस कर्मचाऱ्याने दाखवलेले प्रसंगावधान आणि ‘डायल ११२’ या आपत्कालीन हेल्पलाइनवर साधलेला संपर्क यांमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

अंत्यसंस्कारासाठी आले अन् घरात घुसले दरोडेखोर

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मुक्तेश्वरनगर भागातील रहिवासी आणि सध्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील विष्णूनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक गणेश साहेबराव कोळी हे एका नातेवाईकाच्या निधनामुळे अंत्यसंस्कारासाठी नशिराबाद येथे आले होते. बुधवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास कोळी कुटुंबीय घरात असताना अचानक दोन अज्ञात दरोडेखोरांनी घरात घुसखोरी केली. घरात शिरताच एका दरोडेखोराने गणेश कोळी यांच्या पत्नी सुनिता यांच्या गळ्याला थेट सुरा लावला, तर दुसऱ्याने हातातील रिव्हॉल्व्हर ताणून धरले. त्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रकमेची मागणी करत संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. Jalgaon Crime News:

बाथरूममधून ‘डायल ११२’ वर संपर्क

घटनेच्या वेळी गणेश कोळी यांच्या अंगावर सोन्याचे दागिने व हातात अंगठ्या होत्या. दरोडेखोरांचे लक्ष आपल्याकडे जाण्यापूर्वीच त्यांनी अत्यंत चलाखीने स्वतःला घरातील बाथरूममध्ये कोंडून घेतले. यामुळे संतापलेल्या दरोडेखोरांनी बाथरूमचा दरवाजा तोडण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला. परिस्थिती अत्यंत बिकट आणि हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, कोळी यांनी घाबरून न जाता बाथरूममधूनच अत्यंत शांत डोक्याने ‘डायल ११२’ या पोलिस नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधला व घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला.

शेतात सोडून पळाले वाहन; शोधमोहीम सुरू

पोलिस पथक मागावर असल्याचे समजताच दरोडेखोरांनी मन्यारखेडा शिवारातील अंधारात कार सोडून दिली आणि शेतातून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे, पोलिस उपनिरीक्षक विजय कोळी, गुणवंत देशमुख, सागर बीडे, विठ्ठल मुंडे, प्रवीण लोहार, प्रशांत विरणारे, पंकज सोनवणे व भरत बाविस्कर यांनी तत्परता दाखवत मन्यारखेड शिवारातून सदर वाहन ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्ह नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, फरान दरोडेखोरांच्या शोधासाठी विविध भागात पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिस नाईक गणेश कोळी यांनी दाखवलेल्या अद्भुत समयसूचकतेचे व धैर्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Thane Crime : किन्नर बनून घरात शिरला, ‘संतानप्राप्ती’च्या नावाखाली अनुष्ठानाचा बहाणा अन् महिलेवर अत्याचार; पवईतील धक्कादायक घटना

कार घेऊन पसार; पोलिसांनी केला पाठलाग

माहिती मिळताच नियंत्रण कक्षाने नशिराबाद पोलिसांना अलर्ट केले. पोलिस घटनास्थळी पोहोचत असल्याची चाहूल लागताच दरोडेखोरांची घाबरगुंडी उडाली. बाथरूमचा दरवाजा तुटत नसल्याने आणि पोलिस पकडणार या भीतीने दरोडेखोरांनी घरातील टेबलवर पडलेली गणेश कोळी यांच्या कारची (एमएच ०५ सीक्यू ७१२१) चावी उचलली आणि ते कार घेऊन थेट भादली रोडने पोलिसांना गुंगारा देवून पसार झाले.

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

Web Title: Nashirabad robbery attempt at police officers house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • crime news in marathi
  • jalgaon Crime
  • Jalgaon News

संबंधित बातम्या

Jalgaon Farmers Face Crisis : मक्याच्या उत्पादनात घट; जळगाव येथील चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकटाची परिस्थिती
1

Jalgaon Farmers Face Crisis : मक्याच्या उत्पादनात घट; जळगाव येथील चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकटाची परिस्थिती

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
2

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी

Jalgaon News: शिकार चार, पण बिबट्या बेपत्ता! अमळनेरमध्ये वनविभागाला ‘खो’ देणाऱ्या बिबट्याची चर्चा
3

Jalgaon News: शिकार चार, पण बिबट्या बेपत्ता! अमळनेरमध्ये वनविभागाला ‘खो’ देणाऱ्या बिबट्याची चर्चा

Jalgaon Crime: आधी खून केला, मग मोबाईल विकायला बाहेर पडले अन् थेट पोलिसांच्या जाळ्यात; जळगावात नेमकं काय घडलं?
4

Jalgaon Crime: आधी खून केला, मग मोबाईल विकायला बाहेर पडले अन् थेट पोलिसांच्या जाळ्यात; जळगावात नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.