• नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.
• निकालानंतर पीडित चिमुकलीच्या वडिलांनी सरकार आणि पोलिसांचे आभार मानले.
• 59 दिवसांच्या फास्टट्रॅक सुनावणीनंतर न्यायालयाने मोठा निर्णय दिला.
पुणे: नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला (वय ६५) मरेपर्यंत फाशीची शिक्षा न्यालयाने सुनावली आहे. आरोपीने भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्दयीपणे हत्या केली. या प्रकरणावर आज कोर्टाकडून महत्वाचा निकाल देण्यात आला. न्यायालयाचा हा ऐतिहासिक निकाल ऐकताच न्यायालयात उपस्थित असलेल्या पीडितेच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. संपूर्ण राज्यात त्याला फाशी होणार कि जन्मठेप याकडे नजरा लागल्या होत्या. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात खटला सुरु होता. २५ जून रोजी झालेल्या सुनावणीत आरोपीला दोषी ठरवण्यात आले होते. आता आज अखेर त्याला फाशी देण्यात आली असून अखेर चिमुकलीला न्याय मिळाला. निकाल वाचन झाल्यांनतर न्यायाधीशाने आरोपीला विटनेस बॉक्समध्ये उभं केलं आणि त्याला म्हंटल आता फासावर चढाव लागेल. अवघ्या ५५ दिवसात या प्रकरणाचा निकाल लागला. सर्वात जलदगतीने निकाल लागणारा हा राज्यातील पहिलाच खटला ठरला आहे.
पीडितेच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया
फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर पीडितेच्या आई वडील हे न्यायालयातून बाहेर आले. पीडित मुलीच्या वडिलांनी सदर निकालावर प्रतिक्रिया दिली. सरकारकडून आम्हाला ज्या अपेक्षा होत्या त्याबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो. पोलीस आणि वकिलांचे मी आभार मानतो. मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं ते पूर्ण होताना दिसतंय. सगळ्यांनी कायद्यावर विश्वास ठेवावा, असं नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांनी सांगितलं. तसेच आरोपीचं वय असं आहे की त्याने हे सगळं करणं लज्जास्पद आहे, असंही पीडित मुलीचे वडील म्हणाले.
Ketan Agrawal Case: लग्नाच्या खरेदीसाठी 1 कोटी घेतले; सियाने एवढ्या पैश्यांचा काय केलं?
नसरापूर प्रकरणातील टाईम लाइन
१ मे ला नसरापूर मध्ये लहान चिमुकलीचा मृतदेह आढळून आला होता.
प्राथमिक तपासात लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं.
२ मे ला पुरावे गोळा करत त्यांनी गुन्हा दाखल केला आणि संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं.
सुरुवातीला तपास करुन आरोपी निश्चित करण्यात आला.
१६ मे ला पुणे पोलिसांनी १५ दिवसात आरोप पत्र दाखल केल.
२८ मे ला आरोप निश्चित करून न्यायालयाने खटला जलद गतीने चालवण्यास मान्यता दिली.
२० जून ला दोन्ही बाजूने युक्तिवाद सुरू झाले.
सरकारी पक्षाने पुरावे न्यायालयासमोर ठेवले.
२५ मे ला कोर्टाने आरोपी दोषी असल्याच सांगितला.
तुला काय शिक्षा हवी आहे कोर्टाने विचारल!
फाशी की जन्मठेप, कोर्टाने शिक्षा वाचून दाखवली.
अजय मिसार यांनी सरकारी वकील म्हणून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
तर वडिलांनी समाजात एक संदेश जाऊ द्या कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
कोर्टाने २५ तारखेला निकाल राखून ठेवला होता.
आज कोर्टाने या प्रकरणाचा निकाल दिला.
२९ जून सोमवारी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात आली.
Ans: आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
Ans: सरकारच्या अपेक्षा पूर्ण झाल्याचे सांगत त्यांनी पोलीस आणि वकिलांचे आभार मानले.
Ans: या प्रकरणाची सुनावणी अवघ्या 59 दिवसांत पूर्ण झाली.






