Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

Navarashtra Impact: मिरा रोडच्या जे.पी. रोड परिसरात भरधाव आणि बेदरकारपणे वाहन चालवत नागरिकांना धडक देणाऱ्या कारचालकाला काशीगाव पोलिसांनी अखेर अटक केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नवराष्ट्र डिजिटलने हा प्रकार सर्वप्रथम समोर आणल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 21, 2026 | 11:34 AM
नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

Follow Us
Follow Us:
  • मिरा रोडवर भरधाव वाहनाने नागरिकांना दिली धडक
  • नवराष्ट्र डिजिटलच्या बातमीनंतर चालक अटकेत
  • बेदरकार कारचालकावर गुन्हा दाखल
विजय काते, मीरा-भाईंदर: मिरा-भाईंदर शहरात भरधाव आणि बेदरकारपणे वाहन चालविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर या घटनेची नवराष्ट्र डिजिटलने सर्वप्रथम दखल घेत बातमी प्रसिद्ध केली होती. मिरा रोड येथील जे.पी. रोडच्या पाठीमागील रस्त्यावर एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना धडक दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

व्हिडिओमध्ये वाहनचालक अत्यंत वेगाने वाहन चालवत असल्याचे आणि त्यानंतर वाहनाचा नागरिकांना धक्का बसल्याचे दिसून आले होते. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. सार्वजनिक रस्त्यावर अशा पद्धतीने वाहन चालविणे नागरिकांच्या जीवितासाठी धोकादायक असल्याने संबंधित चालकावर कारवाई करण्याची मागणी होत होती.

Navarashtra Impact: करंजी घाटातील धोकादायक रस्त्याची दखल; ‘नवराष्ट्र’च्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची तातडीची कारवाई

नवराष्ट्र डिजिटलच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई

या गंभीर प्रकाराची दखल घेत काशीगाव पोलिसांनी संबंधित कारचालकाला अखेर अटक केली आहे. चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडून माफीनामा घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.

व्हायरल व्हिडिओमुळे प्रकार उघडकीस

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मिरा-भाईंदरमधील नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. सार्वजनिक रस्त्यांवर वाहन चालविताना चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, या घटनेत भरधाव वाहनामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला.

नवराष्ट्र डिजिटलने हा प्रकार सर्वप्रथम बातमीच्या माध्यमातून समोर आणत संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर काशीगाव पोलिसांनी कारवाई करत चालकाला अटक केल्याने, मिरा-भाईंदरमध्ये या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.

बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी

शहरातील वाढती वाहतूक आणि वाहनांची संख्या पाहता बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या चालकांवर पोलिस व वाहतूक विभागाने कठोर कारवाई करण्याची गरज आहे. विशेषतः गर्दीच्या आणि रहिवासी भागांमध्ये भरधाव वाहनांमुळे पादचारी तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Navarashtra Impact : नवराष्ट्रच्या बातमीचा धसका! चोरीला गेलेले कारचे तीन टायर अवघ्या २४ तासांत पुन्हा जागेवर

Web Title: Navarashtra digital impact mira road speeding car driver arrested kashigaon police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • Accident
  • crime
  • Mira Road
  • Navarashtra Impact

संबंधित बातम्या

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त
1

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त

Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत
2

Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
3

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
4

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.