Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime: गुन्ह्यामध्ये मुलांची नावे कमी करण्यासाठी दहा ते पंधरा कोटींची मागणी – किरण चिचकर यांची तक्रार

नवी मुंबईतील गुरुनाथ चिचकर आत्महत्या प्रकरणात एनसीबी अधिकाऱ्यांवर छळ, खंडणी व धमक्यांचे गंभीर आरोप झाले आहेत. पत्नीच्या तक्रारीनंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला असून तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 29, 2026 | 01:56 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • एनसीबी अधिकाऱ्यांवर छळ व पैशांची मागणीचे आरोप
  • उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तक्रार दाखल
  • प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष
नवी मुंबई/सावन वैश्य :- गुरुनाथ चिचकर यांनी 25 एप्रिल 2025 रोजी राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. सुसाईड नोट लिहित चिचकर यांनी आत्महत्या केली होती. एनसीबी मुंबई व एनसीबी नवी मुंबई या कार्यालयातून सततचा छळ, खंडणी स्वरूपात पैशांची मागणी, शिवीगाळ, खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवल्याच्या नैराश्येतून गुरुनाथ चीचकर यांनी आत्महत्या केली असल्याच, त्यांच्या पत्नी डॉक्टर किरण चिचकर यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत म्हटल आहे. किरण चीचकर या उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी गेल्या असत्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मागील वर्षी एप्रिल महिन्यात गुरुनाथ चिचकर यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. गुरुनाथ चिचकर यांचा मुलगा नवीन चीचकर याला अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यात अमली पदार्थ गुन्हे कक्षाने ताब्यात घेतले होते. एनसीबी मुंबईचे अधिकारी आकाश मलिक व त्यांचं 15 ते 20 जणांचे पथक गुरुनाथ चीचकर यांच्या घरी आले होते. चिचकर यांनी त्यांना प्रश्न विचारले असता, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकत नाही असं म्हणत त्यांचे मोबाईल हिसकावून घेतले व त्यांच्या घराची झडती घेत कार्यालयातील काही मूळ फाईल्स, बँक स्टेटमेंट व २ लाख रुपये रोख रक्कम, किमती घड्याळ जप्त केले व पंचनामाची प्रत न देता त्यावर जबरदस्तीने सह्या घेऊन निघून गेले.

Buldhana Accident: मेहकरजवळ भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; 2 ठार, 23 जखमी

तसेच मुंबई एमसीबी कार्यालयात भेटण्यासाठी बोलवले असता दोघेही मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांना भेट दिली असता, त्यांनी सदरच्या प्रकरणातून मुलांची नावे वगळण्यासाठी 10 ते 15 कोटी रुपयांची मागणी केली असल्याच डॉक्टर किरण चीचकर यांनी तक्रारीत म्हटल आहे. तसेच एनसीबी नवी मुंबईचे अधिकारी संदीप निगडे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. निगडे यांनी गुरुनाथ चिचकर यांना पोलीस ठाण्यात बोलवून पैशांची मागणी केली. तसेच तुम्ही मुलांना हजर करा, नाहीतर पैसे आणून द्या. तुम्ही पैसे नाही दिले तर तुमच्या व तुमच्या पत्नीला जेलमध्ये टाकावे लागेल, अशी धमकी देत संदीप निगडे यांनी पैशाची मागणी केली असल्याचे किरण चिचकर यांनी तक्रारीत म्हटल आहे.

उच्च न्यायालयाचे आदेशानुसार डॉक्टर किरणचकर यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात एनसीबी अधिकाऱ्यांच्या सततच्या मानसिक त्रास, पैशांची मागणी, व खोट्या गुन्ह्यांची धमकी या त्रासामुळे गुरुनाथ चिचकर यांनी आत्महत्या केली असल्याचे म्हटले आहे. त्यातच या प्रकरणात अधिकाऱ्यांवर पैसे मागितल्याचे आरोप झाल्याने या प्रकरणातील तपासकडे व त्याच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.

चौकट…
नवीन चिचकर प्रकरणात नवी मुंबईतील सचिन भालेराव व संजय फुलकर या दोघांचा सहभाग आढळून आल्याने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दोघांचेही निलंबन केलं होतं. मात्र गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्या प्रकरणात डॉक्टर किरण चिचकर यांनी नवी मुंबई अमली पदार्थ कक्षाचे वरिष्ठ अधिकारी संदीप निगडे यांचं नावं तक्रारीत नमूद केल्याने या अधिकाऱ्यावर आयुक्त भारंबे कश्याप्रकारे कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

जुन्या वादातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण; रत्नागिरीतील राजीवडा पूल येथील घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुरुनाथ चिचकर यांनी आत्महत्या का केली असल्याचा आरोप आहे?

    Ans: एनसीबी अधिकाऱ्यांच्या मानसिक छळ, खंडणी मागणी व धमक्यांमुळे आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

  • Que: तक्रार कोणी दाखल केली?

    Ans: त्यांची पत्नी डॉ. किरण चिचकर यांनी तक्रार दाखल केली.

  • Que: या प्रकरणात पुढे काय घडलं?

    Ans: उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

Web Title: Navi mumbai crime demand for 1015 crore to remove sons names from case kiran chichkars complaint

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

Buldhana Accident: मेहकरजवळ भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; 2 ठार, 23 जखमी
1

Buldhana Accident: मेहकरजवळ भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; 2 ठार, 23 जखमी

Pune Crime: नोकरी गेल्याचा ताण! गजबजलेल्या एफसी रोडवर व्यक्तीने गळ्यावर ब्लेडने केला वार; काय घडलं नेमकं?
2

Pune Crime: नोकरी गेल्याचा ताण! गजबजलेल्या एफसी रोडवर व्यक्तीने गळ्यावर ब्लेडने केला वार; काय घडलं नेमकं?

Jalgaon Crime: शेतात पती-पत्नीने एकाच दोरीने घेतला गळफास, दोन चिमुकली पोरकी; गावात हळहळ
3

Jalgaon Crime: शेतात पती-पत्नीने एकाच दोरीने घेतला गळफास, दोन चिमुकली पोरकी; गावात हळहळ

Solapur Crime: 14 दिवसांपासून बेपत्ता… अखेर जिम ट्रेनर मृतावस्थेत सापडला; गळफास की घातपात?
4

Solapur Crime: 14 दिवसांपासून बेपत्ता… अखेर जिम ट्रेनर मृतावस्थेत सापडला; गळफास की घातपात?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.